
चालू घडामोडी | आंतरराष्ट्रीय आनंद दिन

International Day of Happiness
📚 Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिन (International Day of Happiness) केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 1 मार्च
2. 8 मार्च
3. 14 मार्च
4. 20 मार्च
उत्तर : 20 मार्च
🧐 आंतरराष्ट्रीय आनंद दिन केव्हा आणि का साजरी करतात ?
• दरवर्षी आंतरराष्ट्रीय आनंद दिन 20 मार्च रोजी साजरी करण्यात येतो.
• आनंदी राहणं आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे
• मानसिक आरोग्य आणि लोककल्याण या दोन्ही गोष्टींना प्रत्येक व्यक्तीने आणि प्रशासनाने महत्त्व द्यावे, याची आठवण करुन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
• सरकारे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी मानवी हक्कांचे समर्थन करून आनंदाला आधार देणाऱ्या सोईंसीठी गुंतवणूक करण्याचे आवाहन हा दिवस करतो.
🤔 आंतरराष्ट्रीय आनंद दिन कोणत्या देशाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला ?
🧐 Which country proposed International Happiness Day?
• 1970 च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्रीय आनंदाचे मूल्य ओळखणारा आणि सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा सकल राष्ट्रीय आनंदाचे ध्येय प्रसिद्धपणे स्वीकारणारा भूतान 🇧🇹 या देशाने हा ठराव मांडला होता.
• आंतरराष्ट्रीय आनंद दिन (International Day of Happiness) साजरा करण्याचा प्रस्ताव भूतानच्या राजाने युनायटेड नेशन्सकडे पाठवला होता.
🤔 संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरा करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी केव्हा दिली ?
• संयुक्त राष्ट्रांच्या सभेत 12 जुलै 2012 रोजी झालेल्या ठरावामध्ये 20 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय आनंद दिन (International Day of Happiness) म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली.

🧐 पहिला आंतरराष्ट्रीय आनंद दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• 20 मार्च 2013 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय आनंद दिन साजरी करण्यात आला.
🎯 आंतरराष्ट्रीय आनंद दिन 2026 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
🎯 What is the theme of the International Day of Happiness 2026 ?
• केअरिंग अँड शेअरिंग (Caring and Sharing) ही आंतरराष्ट्रीय आनंद दिन 2026 ची संकल्पना आहे.
• ही संकल्पना समाजामध्ये दयाळूपणा, सहानुभूती आणि एकमेकांना मदत करण्याच्या वृत्तीला प्रोत्साहन देते.
🎯 जागतिक आनंद दिन आणि शाश्वत विकास उद्दिष्ट्ये :
• जागतिक आनंद दिन हा संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास ध्येय (Sustainable Development Goals) संबंधित आहे,
उदाहरणार्थ :
• गरिबी संपवणे
• असमानता कमी करणे
• आरोग्य आणि कल्याणाला प्रोत्साहन देणे
• पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित करणे
• जागतिक भागीदारी मजबूत करणे
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : International Day of Happiness
• आंतरराष्ट्रीय आनंद दिन - 20 मार्च
• घोषणा – 12 जुलै 2012 (संयुक्त राष्ट्र ठराव)
• पहिला साजरा – 20 मार्च 2013
• पुढाकार – भूतान
• मुख्य उद्देश – मानसिक आरोग्य, लोककल्याण आणि आनंदाचे महत्त्व अधोरेखित करणे
• 2026 थीम – “केअरिंग अँड शेअरिंग” (Caring and Sharing)



















