
चालू घडामोडी | ‘सुजल गाव आयडी’ योजना

Sujal Gaon ID is a Scheme
📚 Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘सुजल गाव आयडी’ (Sujal Gaon ID) योजनेचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे ?
1. ग्रामीण भागात नवीन विहिरी खोदण्यासाठी आर्थिक मदत करणे.
2. ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे डिजिटल मॅपिंग व व्यवस्थापन करणे
3. शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोफत वीज पुरवणे.
4. ग्रामीण भागातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी नवीन प्रणाली विकसित करणे.
उत्तर : ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे डिजिटल मॅपिंग व व्यवस्थापन करणे
📰 बातमी काय ?
• केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने ‘सुजल गाव आयडी’ हा डिजिटल उपक्रम सुरू केला आहे.
• हा उपक्रम जल जीवन मिशन 2.0 (Jal Jeevan Mission 2.0) अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांचे डिजिटल ट्रॅकिंग करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.
📌 ‘सुजल गाव आयडी’ म्हणजे नेमकं काय ?
• ‘सुजल गाव आयडी’ म्हणजे प्रत्येक ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेला दिला जाणारा एक युनिक डिजिटल क्रमांक आहे.
• याचा साधा अर्थ असा की, देशभरातील प्रत्येक पाणीपुरवठा यंत्रणा आता “ओळखता येईल” आणि तिची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध राहील.
• पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन : जलस्रोतापासून ते घरापर्यंतच्या नळापर्यंत असलेल्या सर्व मालमत्तांचे (उदा. पंप, टाक्या, पाइपलाइन) डिजिटल रेकॉर्ड ठेवणे.
• पूर्वी एखाद्या गावातील पाणीपुरवठा यंत्रणा नीट चालते का ?, कुठे गळती आहे का ?, सेवा पोहोचते का ? — हे समजणे कठीण होते.
• आता या आयडीमुळे स्रोतापासून नळापर्यंत (Source-to-Tap) संपूर्ण पाणीपुरवठा प्रणाली ट्रॅक करता येते.
🎯 हा उपक्रम का गरजेचा होता ?
• ग्रामीण भागात अनेक पाणी योजना असल्या तरी त्यांचे योग्य रेकॉर्ड, देखभाल आणि मॉनिटरिंग यात कमतरता होती.
• कुठे पाइपलाइन खराब झाली, कुठे पाणी पोहोचत नाही, किंवा कुठे गळती होते — याची अचूक माहिती प्रशासनाला वेळेवर मिळत नव्हती.
• म्हणूनच सरकारने डिजिटल पद्धतीने सर्व माहिती एकत्र आणण्यासाठी हा उपक्रम सुरू केला.
⚙️ हा उपक्रम प्रत्यक्षात कसा काम करेल?
• प्रत्येक पाणीपुरवठा यंत्रणेला एक स्वतंत्र Sujal Gaon ID दिला जातो.
• हा आयडी सुजलम भारत प्लॅटफॉर्म शी (Sujalam Bharat Platform) जोडला जातो, ज्यामुळे त्या योजनेची संपूर्ण माहिती एका ठिकाणी उपलब्ध होते.
• पाणीपुरवठ्याची संपूर्ण माहिती — पाइपलाइन, स्रोत, सेवा क्षेत्र — एकाच प्रणालीमध्ये जोडली जाते.
• यामुळे प्रशासनाला रिअल-टाइममध्ये कळते की कोणती यंत्रणा नीट चालू आहे आणि कुठे समस्या आहेत.
🌍 या उपक्रमाचे महत्त्व काय आहे ?
• हा उपक्रम फक्त डेटा तयार करण्यासाठी नाही, तर पाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी एक मजबूत साधन आहे.
• सरकारला नवीन यंत्रणा कुठे सुरू करायच्या किंवा कुठे सुधारणा करायची हे डेटा पाहून ठरवता येते.
• त्यामुळे दीर्घकालीन पाणी सुरक्षा (water security) मजबूत होते.
⚙️ उपक्रमाची सध्याची प्रगती :
• संपूर्ण देशभरात सुमारे 1.64 लाख ‘सुजल गाव आयडी’ तयार करण्यात आले आहेत.
• हे आयडी 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आले आहेत.
• याशिवाय, या आयडींपैकी सुमारे 67,000 आयडी ‘Sujalam Bharat Platform’ शी लिंक करण्यात आले आहेत.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Sujal Gaon ID
• ‘सुजल गाव आयडी’ – ग्रामीण पाणी योजनांसाठी युनिक डिजिटल आयडी
• मंत्रालय – जलशक्ती मंत्रालय
• अंतर्गत योजना – जल जीवन मिशन 2.0
• उद्देश – डिजिटल मॅपिंग + रिअल-टाइम मॉनिटरिंग
• प्लॅटफॉर्म – सुजलम भारत प्लॅटफॉर्म
• फोकस – संपूर्ण पाणीपुरवठा प्रणाली ट्रॅक करणे


















