
चालू घडामोडी | जागतिक चिमणी दिन

World Sparrow Day
📚 Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक चिमणी दिन कधी साजरा केला जातो ?
(महाराष्ट्र पोलीस, पुणे पोलीस भरती 2021)
1. 21 मार्च
2. 20 मार्च
3. 3 मार्च
4. 1 मार्च
उत्तर : 20 मार्च
📰 बातमी काय ?
• दरवर्षी जागतिक चिमणी दिन 20 मार्च रोजी साजरी केला जातो.
• चिमणीला, हिंदी मध्ये “गोरैया” , तमिळ मध्ये “कुरुवी” आणि उर्दू त “चिरिया” अशा नावानेही ओळखले जाते.
🐣 जागतिक चिमणी दिन का साजरी करतात ?
• चिमणी निसर्गाच्या अन्नसाखळीतला एक महत्त्वाचा घटक आहे.
• वाढतं शहरीकरण, प्रदूषण यांचा परिणाम चिमण्यांच्या संख्येवर होत असून हा पर्यावरणाच्या दृष्टीने धोका आहे.
• चिमण्यांच्या घटत्या संख्येबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्यांचे संरक्षण करणे.
• त्याचप्रमाणे चिमण्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.
🧐 पहिला जागतिक चिमणी दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• पहिला जागतिक चिमणी दिन 20 मार्च 2010 रोजी साजरी करण्यात आला.
• भारताच्या, नेचर फॉरएव्हर सोसायटी आणि फ्रान्सच्या इको-सिस ॲक्शन फाउंडेशनच्या पुढाकाराने 20 मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून अधिकृतपणे साजरा होऊ लागला.
• नेचर फॉरएव्हर सोसायटी या संस्थेची स्थापना भारतातील पर्यावरणतज्ज्ञ मोहम्मद दिलावर यांनी केली.
• मोहम्मद दिलावर यांच्या कार्याची दखल घेऊन टाइम मासिकाने 2008 मध्ये त्यांना “हिरोज ऑफ द एन्व्हायर्नमेंट” सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.

❤️ 2026 या वर्षी जागतिक चिमणी दिनाची संकल्पना (थीम) कोणती ?
• "आय लव्ह स्पॅरोज" (I Love Sparrows) " ही 2026 या वर्षाची जागतिक चिमणी दिनाची संकल्पना आहे.
• या संकल्पनेचा मुख्य उद्देश चिमण्यांशी असलेले मानवी नाते अधिक दृढ करणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी जनसहभाग वाढवणे हा आहे.
🐣 चिमण्यांचे पर्यावरणीय महत्त्व :
• पर्यावरणीय संतुलन राखण्यात चिमण्या महत्त्वाची भूमिका बजावतात.
• जैवविविधता संवर्धन : चिमणी शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात निरोगी परिसंस्थेचे सूचक (Indicators of a Healthy Ecosystem) म्हणून काम करते.
• नैसर्गिक कीटक नियंत्रण : ते कीटक खातात, ज्यामुळे कीटकांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
• परागण आणि बीजप्रसार : त्यांच्या कृतीमुळे परागण आणि बीजप्रसार होऊन विविध वनस्पतींची वाढ होण्यास मदत होते.
🧐 चिमणी कोणत्या राज्याचा/ केंद्र शासित प्रदेशाचा राज्यपक्षी आहे ?
• चिमणी बिहार आणि दिल्लीचा राज्य पक्षी आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : World Sparrow Day
• जागतिक चिमणी दिन - 20 मार्च
• पहिल्यांदा साजरा – 20 मार्च 2010
• पुढाकार – नेचर फॉरएव्हर सोसायटी (भारत)
• नेचर फॉरएव्हर सोसायटी संस्थापक – मोहम्मद दिलावर (नाशिक)
• चिमणी राज्य पक्षी – बिहार व दिल्ली
• 2026 थीम – “आय लव्ह स्पॅरोज” (I Love Sparrows)


















