
चालू घडामोडी | 'प्रारंभ 2026'
PRARAMBH 2026
📚 Subject : GS - अर्थशास्त्र, सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'प्रारंभ 2026' (‘PRARAMBH 2026’) या देशव्यापी उपक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे ?
1. शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे
2. GST दर सुधारणा करणे
3. कस्टम ड्युटी कमी करणे
4. आयकर कायदा 2025 ची अंमलबजावणी सुलभ करणे
उत्तर : आयकर कायदा 2025 ची अंमलबजावणी सुलभ करणे
📰 बातमी काय ?
• भारत सरकारने 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या आयकर कायदा 2025 च्या अंमलबजावणीसाठी 'प्रारंभ 2026' (‘PRARAMBH 2026’) हा देशव्यापी जनजागृती अभियान सुरू केला आहे.

🧐 'प्रारंभ 2026' (PRARAMBH 2026) म्हणजे नेमकं काय ?
• ‘PRARAMBH 2026’ फूल फॅार्म Policy Reform and Responsible Action for Mission Viksit Bharat हा आहे.
• मराठीत - " मिशन विकसित भारतासाठी धोरणात्मक सुधारणा आणि जबाबदार कृती " असा त्याचा अर्थ होतो.
• 'प्रारंभ 2026' हा एक राष्ट्रीय स्तरावरील जागरूकता आणि मार्गदर्शन उपक्रम आहे.
• यामध्ये करदात्यांना नवीन आयकर कायद्याच्या नियमांबद्दल स्पष्ट आणि सोपी माहिती देऊन त्यांना अडचण न येता करप्रणालीशी जुळवून घेता येईल, यावर भर दिला आहे.
🎯 'प्रारंभ 2026' हा उपक्रम का सुरू करण्यात आला ?
• नवीन आयकर कायदा लागू होताना अनेकांना त्यातील बदल समजणे कठीण जाते.
• ही अडचण कमी करून करप्रणाली अधिक पारदर्शक, सोपी आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
⚙️'प्रारंभ 2026' या उपक्रमात कोणत्या संस्था सहभागी आहेत ?
• हा उपक्रम अर्थ मंत्रालया (Ministry of Finance) अंतर्गत राबवला जात असून केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (Central Board of Direct Taxes - CBDT) ही प्रमुख अंमलबजावणी करणारी संस्था आहे.
🧐 'प्रारंभ 2026' या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्ये :
1) जनजागृती मोहीम :
• मुद्रित, टीव्ही, रेडिओ, डिजिटल आणि सोशल मीडिया अशा बहुमाध्यमीय प्रसार माध्यमांद्वारे करसंबंधित माहिती मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचवली जाईल.
2) सोपे मार्गदर्शन :
• वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) आणि मार्गदर्शक साहित्यामुळे जटिल नियम सहज समजतील.
3) AI सहाय्य (Kar Saathi):
• ‘Kar Saathi’ हा AI chatbot करदात्यांच्या प्रश्नांना त्वरित उत्तरे देतो.
4) Income Tax Website 2.0:
• नवीन वेबसाइटमुळे नेव्हिगेशन सोपे झाले असून सेवा जलद आणि user-friendly झाली आहे.
5) सर्वसमावेशकता :
• विविध भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून अधिक लोकांना या प्रणालीचा फायदा मिळेल.
6) कार्यशाळा :
• नवीन कायद्याची कार्यक्षम आणि एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी देशभरातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल.
7) आयकर सेवा केंद्र सहाय्य :
• डिजिटल सुविधा नसलेल्या करदात्यांना सहाय्य करण्यासाठी प्रत्यक्ष मदत केंद्रे उपलब्ध करून देण्यात येतील.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : PRARAMBH 2026
• प्रारंभ 2026 — आयकर कायदा 2025 साठी जागरूकता अभियान
• मंत्रालय — अर्थ मंत्रालय
• प्रमुख साधने — Kar Saathi (AI chatbot), Website 2.0
• उद्देश — करप्रणाली अधिक पारदर्शक, सोपी आणि विश्वासार्ह बनविण्यासाठी


















