
चालू घडामोडी | जागतिक जल दिन
World Water Day
📚 Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक जल दिन कधी साजरा केला जातो ?
1. 31 मार्च
2. 22 मार्च
3. 8 मार्च
4. 1 मार्च
उत्तर : 22 मार्च
📰 बातमी काय ?
• दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो.
🧐 जागतिक जल दिन का साजरी करतात ?
• जागतिक जल दिन गोड्या पाण्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी
• गोड्या पाण्याच्या संसाधनांच्या संवर्धनासाठी आणि शाश्वत व्यवस्थापनासाठी
• तसेच त्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जगभरात साजरा केला जातो.
• हा दिवस शाश्वत विकास ध्येय (SDG) 6 : 2030 पर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता याच्या समर्थनार्थ जागतिक जलसंकटाचा सामना करण्यासाठी कृती करण्याबद्दल प्रोत्साहित करतो.
🤔 जागतिक जल दिन कोणी घोषित केला ?
• जागतिक जल दिनाची कल्पना पहिल्यांदा 1992 मध्ये रिओ दि जानेरो (Rio de Janeiro) येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत (United Nations Conference on Environment and Development) मांडण्यात आली होती.
• संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (United Nations General Assembly ) 22 मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून घोषित केला.
🧐 पहिला जागतिक जल दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• पहिला जागतिक जल दिन 22 मार्च 1993 रोजी साजरी करण्यात आला.
📢 जागतिक जल दिन 2026 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
What is the theme of World Water Day 2026 ?
• जागतिक जल दिन 2026 ची अधिकृत संकल्पना (थीम) "पाणी आणि लिंगभाव" (Water and Gender) अशी आहे.
• या वर्षीच्या मोहिमेचे मुख्य घोषवाक्य "जिथे पाणी वाहते, तिथे समानता वाढते" (Where Water Flows, Equality Grows) हे आहे.

🎯 या संकल्पनेशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत :
• मुख्य उद्देश : जलसंकटाचा महिला आणि मुलींवर होणारा विषम परिणाम अधोरेखित करणे आणि जल व्यवस्थापनात त्यांना समान अधिकार मिळवून देणे हा या संकल्पनेचा मूळ उद्देश आहे.
• महत्त्व : अनेक देशांत महिलांना पाणी भरण्यासाठी दररोज तासनतास खर्च करावे लागतात, ज्यामुळे त्यांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या संधींवर परिणाम होतो. ही संकल्पना या समस्यांकडे जगाचे लक्ष वेधते.
• शाश्वत विकास ध्येय (SDG 6) : यंदाची ही थीम 'सर्वांसाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छता' या 2030 पर्यंतच्या उद्दिष्टाला (Sustainable Development Goal 6) पाठबळ देते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : World Water Day
• जागतिक जल दिन — 22 मार्च
• घोषणा (UNGA) — 1992 (रिओ दि जानेरो परिषद)
• पहिला साजरा — 22 मार्च 1993
• मुख्य उद्देश — गोड्या पाण्याचे संवर्धन + शाश्वत व्यवस्थापन
• 2026 थीम — "पाणी आणि लिंगभाव" (Water and Gender)
• घोषवाक्य — “जिथे पाणी वाहते, तिथे समानता वाढते”




















