
चालू घडामोडी | जागतिक क्षयरोग दिन

World Tuberculosis (TB) Day
📚 Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक क्षयरोग दिन केव्हा असतो ?
1. 24 मार्च
2. 31 मार्च
3. 2 एप्रिल
4. 1 मे
उत्तर : 24 मार्च
🧐 जागतिक क्षयरोग दिन केव्हा असतो ?
🤔 क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणी लावला ?
• इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.
• त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी 24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो.

🤔 क्षयरोग (TB) आजार कसा होतो ?
• क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस (Mycobacterium Tuberculosis) नावाच्या जीवाणूंमुळे (Bacteria) होणारा रोग आहे.
• क्षयरोग (TB) हा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकल्या किंवा शिंकण्यातील लहान थेंबांच्या श्वासाद्वारे पसरणारा एक जिवाणूजन्य आजार आहे.

🦠 क्षयरोग कसा पसरतो ?
• क्षयरोग हा फुफ्फुसात सक्रिय क्षयरोग असलेल्या लोकांनाकडून खोकला, थुंकणे, बोलणे किंवा शिंकताना हवेतून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो.
😥 क्षय रोगाची लक्षणे काय आहेत ?
• दीर्घकाळापर्यंत खोकला (कधीकधी रक्तासह), छातीत दुखणे, अशक्तपणा, थकवा, वजन कमी होणे, ताप, रात्री घाम येणे.

💉 क्षय रोगा वरील उपचार काय आहेत ?
• उपचाराने, TB बरा होऊ शकतो.
• प्रतिजैविकांचा (Antibiotics) कोर्स सहसा 6-18 महिन्यांसाठी घ्यावा लागतो.
🎯 जागतिक क्षयरोग दिन 2026 ची संकल्पना थीम कोणती ?
• "होय! आम्ही क्षयरोग संपवू शकतो (Yes! We Can End TB) ही जागतिक क्षयरोग दिन 2026 ची संकल्पना आहे.
• या वर्षीची संकल्पना प्रामुख्याने देशांचे खंबीर नेतृत्व, नवनवीन उपचारांचा वेगवान वापर आणि लोकसहभागातून क्षयरोग (TB) मुळापासून संपवण्यावर भर देते.

📊WHO च्या जागतिक क्षयरोग (TB) अहवाल 2025 मधील भारताबद्दल IMP माहिती :
WHO Global Tuberculosis Report 2025, -
• भारतात क्षयरोगाचे सर्वाधिक प्रमाण आहे.
• जागतिल एकूण क्षयरोगाच्या रूग्णांपैकी तब्बल 25 % रुग्ण फक्त भारतात आहे.
• गेल्या काही वर्षांत भारताने TB नियंत्रणात लक्षणीय सुधारणा केली आहे.
✍️ उपचार - पूर्वी 2015 मध्ये TB उपचार मिळणाऱ्यांचे प्रमाण केवळ 53% होते, ते आता 2024 मध्ये वाढून 92% झाले आहे. म्हणजेच, आज जास्तीत जास्त रुग्ण उपचाराच्या कक्षेत आले आहेत.
✍️ मृत्यू दरामध्ये घट - 2015 मध्ये TB मुळे होणारे मृत्यू दर 28 प्रति लाख होता, तो आता 2024 मध्ये 21 प्रति लाख इतका कमी झाला आहे, म्हणजे TB मुळे होणारे मृत्यू कमी होत आहेत.
✍️ उपचारात यश - उपचार यश दर देखील वाढून 2024 मध्ये 90% झाला आहे, जो जागतिक सरासरी 88% पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ भारतातील उपचार पद्धती अधिक प्रभावी ठरत आहेत.
✍️ ही सकारात्मक प्रगती विशेषतः पंतप्रधान टीबीमुक्त भारत अभियान (Pradhan Mantri TB Mukt Bharat Abhiyan) अंतर्गत झालेल्या उपाययोजनांमुळे दिसून येते.
🧐 नि:क्षय पोषण योजना काय आहे ?
• नि:क्षय पोषण योजना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission) अंतर्गत सुरू केली होती.
• ही भारतातील राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (National Tuberculosis Elimination Program) अंतर्गत थेट लाभ हस्तांतरण योजना आहे.
• नि:क्षय पोषण योजनेंतर्गत क्षयरुग्णांना थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य दिले जाते.
• आर्थिक सहाय्य : जो रूग्ण TB विरोधी उपचार घेत आहेत, त्याला दर महिन्याला 1000 रूपये या प्रमाणे त्याच्या बॅंक खात्यात पैसे जमा केले जातात.
















