
चालू घडामोडी | स्टॉकहोम वॉटर प्राइज

Stockholm Water Prize
📚 Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) स्टॉकहोम वॉटर प्राइज 2026 कोणाला जाहीर झाला ?
1. डेव्हिड शिंडलर
2. कावेह मदानी
3. बान की मून
4. राजेंद्र सिंह
उत्तर : कावेह मदानी
📰 बातमी काय ?
• 2026 स्टॉकहोम वॉटर प्राइज (Stockholm Water Prize) पर्यावरण शास्त्रज्ञ, प्राध्यापक कावेह मदानी (Professor Kaveh Madani) यांना जाहीर झाला.
• ते हा पुरस्कार जिंकणारे सर्वात तरुण विजेते ठरले आहे.
• जलविज्ञान (Hydrology), धोरण आणि मुत्सद्देगिरी यांना जोडल्याबद्दल तसेच जल व्यवस्थापनातील कावेह मदानी यांच्या नाविन्यपूर्ण संशोधनासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे.

🏆 स्टॉकहोम वॉटर प्राइज म्हणजे काय ?
• स्टॉकहोम वॉटर प्राइज (Stockholm Water Prize) हे जल संसाधन क्षेत्रातील जगातील सर्वात प्रतिष्ठित पारितोषिक आहे.
• या पुरस्काराला 'पाण्याचा नोबेल पुरस्कार' (Nobel Prize of Water) म्हणून ओळखले जाते.
• या पुरस्काराची स्थापना स्टॉकहोम वॉटर फाउंडेशन (Stockholm Water Foundation) ने केली.
• पहिल्यांदा हा पुरस्कार 1991 मध्ये देण्यात आला.
🧐 कोणाला दिला जातो ? (पात्रता) -
• व्यक्ती किंवा संस्था : हा सन्मान एखाद्या संशोधक वैज्ञानिकाला, एखाद्या संस्थेला किंवा पाणी क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेला दिला जाऊ शकतो.
• विविध क्षेत्रे : जलविज्ञान (Hydrology), पर्यावरण अभियांत्रिकी, जल धोरण, शिक्षण, मुत्सद्देगिरी किंवा पाणी व्यवस्थापनात प्रत्यक्ष काम करणाऱ्या व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र असतात.
🎯 या पुरस्काराचा उद्देश काय आहे ?
• जगभरातील पाणी समस्यांवर उपाय शोधणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान करणे हा मुख्य उद्देश आहे.
• तसेच जलसुरक्षा, पर्यावरण संरक्षण आणि धोरणात्मक (policy) उपायांना प्रोत्साहन देणे यावर भर दिला जातो.
• पाण्याचा शाश्वत वापर आणि पाणी व्यवस्थापनात नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणे.
📢 पुरस्कार घोषणा आणि वितरण :
• पुरस्काराची घोषणा दरवर्षी मार्चमध्ये 'जागतिक जल दिनी' (22 मार्च) केली जाते आणि वितरण ऑगस्ट महिन्यात 'जागतिक जल सप्ताह' दरम्यान स्वीडनच्या राजांच्या हस्ते होते.
🏆💰 पुरस्काराचे स्वरूप :
• विजेत्याला 1 दशलक्ष स्वीडिश क्रोना (SEK) आणि एक क्रिस्टल शिल्प प्रदान केले जाते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : स्टॉकहोम वॉटर प्राइज
• ओळख — “पाण्याचा नोबेल पुरस्कार”
• पुरस्काराची स्थापना - स्टॉकहोम वॉटर फाउंडेशन द्वारे
• 2026 विजेता — कावेह मदानी
• पुरस्काराचे स्वरूप : 1 दशलक्ष स्वीडिश क्रोना (SEK) आणि एक क्रिस्टल शिल्प
















