
चालू घडामोडी | सूक्ष्म वित्त संस्थांसाठी क्रेडिट हमी योजना–2.0
Credit Guarantee Scheme for Microfinance Institutions-2.0 (CGSMFI-2.0)
📚 Subject : GS - अर्थशास्त्र, सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'CGSMFI-2.0' ही योजना खालीलपैकी कोणत्या घटकाला कर्ज मिळवून देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे ?
1. मोठ्या उद्योजकांना
2. परदेशी गुंतवणूकदारांना
3. सूक्ष्म वित्त संस्थांमार्फत लहान कर्जदारांना
4. फक्त सरकारी नोकरदारांना
उत्तर : सूक्ष्म वित्त संस्थांमार्फत लहान कर्जदारांना
📰 बातमी काय ?
• भारत सरकारने सूक्ष्म वित्त क्षेत्रात कर्जपुरवठा वाढवण्यासाठी ‘क्रेडिट हमी योजना–2.0’ (CGSMFI-2.0) सुरू केली असून सुमारे ₹20,000 कोटींचे हमी कवच उपलब्ध करून दिले जाणार आहे.
CGSMFI-2.0 ही योजना नेमकी काय आहे ?
• ही एक कर्ज हमी योजना आहे.
• सूक्ष्म वित्त संस्था लहान कर्जदारांना कर्ज देतात, पण या क्षेत्रात जोखीम जास्त असते.
• यामुळे बँका अशा संस्थांना सहज कर्ज देत नाहीत.
• ही योजना त्या जोखमीवर उपाय देते.
• यामध्ये सरकार - बँका आणि वित्तीय संस्थांना हमी देते, जेणेकरून त्या सूक्ष्म वित्त संस्थांना (NBFC-MFIs) कर्ज देऊ शकतील.
• जर कर्जाची परतफेड झाली नाही, तर त्या नुकसानीचा काही भाग सरकार भरून काढते.
• त्यामुळे बँकांचा धोका कमी होतो आणि त्या अधिक प्रमाणात कर्ज देण्यास तयार होतात.
• कर्ज देणे सुरक्षित झाल्यामुळे पैसा शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजेच लहान कर्जदारांपर्यंत पोहोचतो.
⚙️ ही योजना प्रत्यक्षात कशी काम करते ?
• या योजनेत बँकांनी दिलेल्या कर्जावर सरकार हमी देते.
• ही हमी सर्वांसाठी समान नसून संस्थेच्या आकारानुसार बदलते.
• लहान संस्थांसाठी सुमारे 80% पर्यंत संरक्षण मिळते, तर मध्यम संस्थाना 75% आणि मोठ्या संस्थांसाठी 70% हमी असते.
• यामुळे लहान संस्थांना अधिक प्राधान्य दिले जाते.
• तसेच व्याजदरांवरही मर्यादा ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे अंतिम कर्जदारावर जास्त भार पडत नाही.
• ही योजना 30 जून 2026 पर्यंत किंवा ₹20,000 कोटींच्या मर्यादेपर्यंत लागू राहणार आहे.
🌍 या योजनेचे महत्त्व काय आहे ?
• या योजनेमुळे सूक्ष्म वित्त क्षेत्रात कर्जाचा प्रवाह वाढेल.
• याचा थेट फायदा ग्रामीण आणि निम-शहरी भागातील लोकांना होईल, जेथे पारंपरिक बँकिंग सेवा कमी उपलब्ध असतात.
• लहान कर्जदारांना या योजनेचा लाभ होणार असून, यामुळे स्व-रोजगार, महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशन (Financial Inclusion) वाढेल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• सूक्ष्म वित्त संस्थांसाठी क्रेडिट हमी योजना–2.0
• CGSMFI-2.0 — कर्ज हमी योजना
• उद्देश — सूक्ष्म वित्त संस्थांना कर्ज प्रवाह वाढवणे
• वैधता — 30 जून 2026 / ₹20,000 कोटी मर्यादा
• लाभार्थी — लहान कर्जदार





















