
चालू घडामोडी | राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे (NCBC) नवीन अध्यक्ष कोण ?
Who is the new Chairman of National Commission for Backward Classes (NCBC) ?
Subject : GS - राज्यशास्त्र - आयोग
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मार्च 2026 मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या (NCBC) अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
1. प्रणिती शिंदे
2. साध्वी निरंजन ज्योती
3. अश्विनी भिडे
4. लोकेश कुमार प्रजापती
उत्तर : साध्वी निरंजन ज्योती
बातमी काय ?
• साध्वी निरंजन ज्योती यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या (NCBC) अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

• किरण उमेश महाले यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या (NCBC) सदस्यपदाचा कार्यभार स्वीकारला.

राष्ट्रीय मागासवर्ग आयोग म्हणजे काय ?
• राष्ट्रीय मागासवर्ग आयोग (NCBC) ही सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या (OBC) हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी काम करणारी एक घटनात्मक संस्था आहे,
• जी मूळतः 1993 मध्ये वैधानिक संस्थेच्या रूपात स्थापन झाली होती.
राष्ट्रीय मागासवर्ग आयोग ही घटनात्मक संस्था आहे का ?
Is the National Commission for Backward Classes (NCBC) a constitutional body ?
• होय, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग (NCBC) ही घटनात्मक संस्था आहे.
• सुरुवातीला NCBC ची स्थापना 1993 च्या अधिनियमानुसार करण्यात आली होती.
• 2018 मध्ये 102 व्या घटनादुरुस्ती कायद्याने (102nd Constitutional Amendment) राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा (Constitutional Status) देण्यात आला.
• या घटनादुरुस्तीमुळे भारतीय संविधानात कलम 338B आणि 342A समाविष्ट करण्यात आले.
• त्यामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी NCBC ला घटनात्मक अधिकार मिळाले.
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची रचना :
• एकूण सदस्य : 5
• अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य
• नियुक्ती : राष्ट्रपती
🎯 राष्ट्रीय मागासवर्ग आयोगा चे प्रमुख कार्ये :
• सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या समावेश / वगळण्या संदर्भातील प्रकरणांवर सल्ला देणे
• मागास वर्गांच्या हक्कांचे संरक्षण व देखरेख करणे
• त्यांच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीबाबत शिफारसी करणे
• आरक्षणाचा गैरवापर किंवा हक्कभंगाबाबत तक्रारींची चौकशी करणे
• वार्षिक व विशेष अहवाल राष्ट्रपतींना सादर करणे
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : राष्ट्रीय मागासवर्ग आयोग
मूळ स्थापना : 1993 (NCBC अधिनियम, 1993)
• घटनात्मक दर्जा : 2018
• घटनादुरुस्ती : 102 वी घटनादुरुस्ती (102nd Constitutional Amendment)
• नवीन कलमे : 338B आणि 342A
• एकूण सदस्य : 5
• नियुक्ती : राष्ट्रपती

















