
चालू घडामोडी | जागतिक बँक
World Bank
📚 Subject : GS - अर्थशास्त्र - आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक बँक (World Bank) चे मुख्य उद्दिष्ट काय आहे ?
1. आंतरराष्ट्रीय व्यापार नियंत्रित करणे
2. चलन दर ठरवणे
3. गरीब देशांना कर्ज व आर्थिक मदत देणे
4. युद्धग्रस्त देशांना सैन्य मदत देणे
उत्तर : गरीब देशांना कर्ज व आर्थिक मदत देणे
📰 बातमी काय ?
• जागतिक बँकेने मध्य पूर्व संघर्षाचा फटका बसलेल्या देशांसाठी 'फास्ट-ट्रॅक' मदतीची घोषणा केली आहे.
• उद्देश : या मदतीचा उद्देश वस्तूंच्या वाढत्या किमती आणि विस्कळीत पुरवठा साखळीमुळे विकसनशील अर्थव्यवस्थांवर येणारा ताण कमी करणे हा आहे.
🏦 जागतिक बँक म्हणजे नेमकं काय ?
• जागतिक बँक ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे, जी कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना कर्ज, अनुदान आणि तांत्रिक मदत पुरवते.
• याचा मुख्य उद्देश म्हणजे अत्यंत गरिबी कमी करणे (Eradicate Extreme Poverty) आणि सर्वसमावेशक आर्थिक विकास (Shared Prosperity) साध्य करणे हा आहे.
🎯 जागतिक बँकेची मूलभूत माहिती :
• स्थापना - जागतिक बँकेची स्थापना 1944 मध्ये अमेरिकेत झालेल्या ब्रेटन वूड्स परिषदेत (Bretton Woods Conference) झाली.
• मुख्यालय - वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका.
• सदस्य देश : 189
• अट : जागतिक बँकेचे सदस्य होण्यासाठी देशाने प्रथम आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ( International Monetary Fund - IMF) चे सदस्य होणे अनिवार्य असते.
• भारत जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या दोन्ही संस्थांचा संस्थापक सदस्य आहे.
🏦 जागतिक बँक गट (World Bank Group - 5 संस्था)
✍️ जागतिक बँक ही 5 संस्थांचा समूह आहे, ज्याला 'World Bank Group' म्हटले जाते:
1) आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक (International Bank for Reconstruction and Development - IBRD):
• मध्यम उत्पन्न असलेल्या आणि पतपात्र कमी उत्पन्न असलेल्या देशांना कर्ज देते.
2) आंतरराष्ट्रीय विकास संस्था (International Development Association -IDA) :
• जगातील अत्यंत गरीब देशांना बिनव्याजी कर्ज आणि अनुदान देते.
3) आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (International Finance Corporation -IFC) :
• विकसनशील देशांमधील खाजगी क्षेत्राच्या विकासावर लक्ष केंद्रित करते.
4) बहुपक्षीय गुंतवणूक हमी संस्था ( Multilateral Investment Guarantee Agency -MIGA):
• राजकीय जोखीम विमा देऊन थेट परकीय गुंतवणुकीला चालना देते.
5) गुंतवणूक विवादांच्या निराकरणासाठी आंतरराष्ट्रीय केंद्र (International Centre for Settlement of Investment Disputes -ICSID) :
• गुंतवणूकदार आणि देश यांच्यातील वादांचे निराकरण करते.
🤝 जागतिक बँकेचे मुख्य कार्ये कोणते ?
• प्रकल्प वित्तपुरवठा : रस्ते, पूल, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील प्रकल्पांना निधी देणे.
• धोरणात्मक सल्ला : सरकारांना आर्थिक सुधारणांसाठी मार्गदर्शन करणे.
📋 जागतिक बँकेचे प्रमुख अहवाल :
• जागतिक विकास अहवाल (World Development Report)
• ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स (Global Economic Prospects)
🇮🇳 जागतिक बँक आणि भारत :
• भारत हा जागतिक बँकेकडून सर्वाधिक कर्ज घेणाऱ्या देशांपैकी एक आहे.
• पाणीपुरवठा, शिक्षण प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि कौशल्य विकास यांसारख्या क्षेत्रांत भारताला जागतिक बँकेचे मोठे सहकार्य लाभते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : World Bank
• जागतिक बँक स्थापना - 1944 (ब्रेटन वूड्स परिषदेत)
• मुख्यालय - वॉशिंग्टन डी.सी., अमेरिका.
• सदस्य देश - 189
• मुख्य कार्ये - प्रकल्प वित्तपुरवठा+ धोरणात्मक सल्ला
• भारत - जागतिक बँकेचा संस्थापक सदस्य देश




















