
चालू घडामोडी | ओडिशा राज्य स्थापना दिन
Odisha Foundation Day
📚 Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र, इतिहास - कला आणि संस्कृती, भूगोल - पर्यटन
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 1 एप्रिल रोजी कोणते राज्य उत्कल दिवस साजरा करते ?
1. ओडिशा
2. केरळ
3. कर्नाटक
4. आंध्र प्रदेश
उत्तर : ओडिशा (Odisha)
बातमी काय आहे ?
• दरवर्षी 1 एप्रिल हा दिवस ओडिशा राज्य स्थापना दिन किंवा उत्कल दिवस म्हणून साजरा केला जातो.
🤔 कोणत्या राज्याला प्राचीन काळी उत्कल म्हणून ओळखले जात असे ?
• प्राचीन काळी ओडिशाला "उत्कल" असे म्हटले जात असे, ज्याचा अर्थ "कुशल कारागिरांची भूमी" असा होतो.
• 1 एप्रिल हा दिवस ओडिशा राज्य स्थापना दिन किंवा उत्कल दिवस म्हणून साजरा केला जातो.
🧐 ओडिशा राज्याची स्थापना केव्हा झाली ?
• 1 एप्रिल 1936 रोजी ओडिशा राज्याची स्थापना करण्यात आली.
• 1936 मध्ये ब्रिटीश राजवटीतील बिहार, ओडिशा आणि मद्रास प्रांतांमधून काही भाग वेगळे करून ओडिशा हे स्वतंत्र राज्य (एक स्वतंत्र प्रांत) म्हणून स्थापन करण्यात आले.
• राज्याचे पूवीचे नाव "ओरिसा" (Orissa)असे होते.
• 2011 या मध्ये "ओरिसा" (Orissa) चे अधिकृतपणे "ओडिशा" (Odisha) असे नामकरण करण्यात आले.
🤔 कोणत्या युद्धानंतर सम्राट अशोका बौद्ध धर्माचे समर्थक बनले ?
🧐 कलिंग युद्ध कोठे लढले गेले ?
• इ.स.पूर्व तिसऱ्या शतकातील कलिंग युद्ध ओडिशामध्ये लढले गेले.
• सम्राट अशोकाने इ.स.पू. 261 मध्ये कलिंग जिंकले, ज्यामुळे प्रसिद्ध कलिंग युद्ध झाले, कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोक यांनी बुद्धांच्या शिकवणींचा स्वीकार करून ते बौद्ध धर्माचे समर्थक बनले.
🤔 कोणार्क येथील उल्लेखनीय सूर्यमंदिर कोणी बांधले ?
• कोणार्क येथील सूर्य मंदिर हे तेराव्या शतकात बांधलेले हिंदू मंदिर असून या मंदिराची निर्मिती राजा नरसिंहदेव (इ.स. 1238-1264) यांनी करविली.
• हे मंदिर ओडिशा राज्याच्या कोणार्क गावामध्ये आहे.
• कोणार्क मंदिराला "ब्लॅक पॅगोडा" (Black Pagoda) नावानेही ओळखले जाते.
• कोणार्क येथील सूर्य मंदिर हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ (UNESCO world heritage site ) म्हणून प्रसिद्ध आहे.

🧐 भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेले चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
(सरळसेवा भरती, महाराष्ट्र पोलीस भरती, SSC GD 2021)
उत्तर : ओडिशा
🤔 भगवान जगन्नाथांची रथयात्रा कोणत्या राज्यातील प्रसिद्ध उत्सव आहे ?
(सरळसेवा भरती, SSC MTS 2017, 2022)
उत्तर : ओडिशा
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : ओडिशा
• ओडिशाची राजधानी : भुवनेश्वर (Bhubaneswar)
• प्रमुख वारसा स्थळे : कोणार्क सूर्य मंदिर, भगवान जगन्नाथ मंदिर, लिंगराज मंदिर
• प्रमुख स्मारके : उदयगिरी आणि खंडगिरी लेणी, धौली शांती स्तूप,
• प्रमुख नद्या : महानदी, ब्राह्मणी, सुवर्णरेखा, बैतरणी
• राष्ट्रीय उद्याने : सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान, भितरकणिका राष्ट्रीय उद्यान
• वन्यजीव अभयारण्य : चिल्का वन्यजीव अभयारण्य, नंदनकानन वन्यजीव अभयारण्य
• प्रसिद्ध सण आणि उत्सव : रथयात्रा, दुर्गा पूजा, कोणार्क उत्सव
















