
चालू घडामोडी | फार्मर आयडी म्हणजे काय ? तीचा उपयोग काय ?
What is Farmer ID ? What is the use of it ?
📚 Subject : GS - अर्थशास्त्र - कृषी
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडे महाराष्ट्रात रासायनिक खतांचे वितरण अधिक पारदर्शक करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाधारित प्रणालीचा वापर सुरू करण्यात येत आहे ?
1. भू-अभिलेख डिजिटल प्रणाली
2. ई-नाम प्लॅटफॉर्म
3. पीक विमा पोर्टल
4. फार्मर आयडी प्रणाली
उत्तर : फार्मर आयडी
📰 बातमी काय ?
• महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या अनुदानित रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी ‘फार्मर आयडी’चा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
• हा उपक्रम ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत राबवला जाणार असून देशातील पहिला पायलट प्रकल्प म्हणून महाराष्ट्रात याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
🤔 ‘फार्मर आयडी’ म्हणजे नेमकं काय ?
• ‘फार्मर आयडी’ ही शेतकऱ्यांची एक अद्वितीय डिजिटल ओळख (Unique Digital Identity) आहे.
• या आयडीमध्ये शेतकऱ्याची जमीन, पिके, अनुदाने आणि इतर कृषी संबंधित माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध राहते.
🧐 हा उपक्रम का सुरू करण्यात आला ?
• सध्या खतांच्या वितरणात अचूकता नसणे, अनियमितता आणि काही ठिकाणी गैरव्यवहार दिसून येतात.
👉 त्यामुळे शासनाने तंत्रज्ञानाचा वापर करून -
• योग्य शेतकऱ्याला योग्य लाभ मिळावा
• बनावट व्यवहार थांबावेत
• खतांचे वितरण प्रणाली पारदर्शक व्हावी - म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.
⚙️ हा उपक्रम कसा कार्य करेल ?
🎯 फार्मर आयडी'चे महत्त्व (Significance) :
• फार्मर आयडीच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असेल.
• फार्मर आयडी हा जमिनीच्या नोंदी (7/12) आणि पिकांच्या माहितीशी जोडलेला असल्याने, कोणत्या शेतकऱ्याला किती खताची गरज आहे याचे नियोजन करणे सरकारला शक्य होणार आहे.
• फार्मर आयडी'मुळे खत वितरणाची साखळी डिजिटल होईल, ज्यामुळे कंपन्यांना दिले जाणारे अनुदान अधिक अचूक होईल आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खतांचा काळाबाजार थांबेल.
🌱 ॲग्रीस्टॅक (AgriStack) योजना काय आहे ?
• ॲग्रीस्टॅक (AgriStack) ही केंद्र सरकारची 'डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा' (Digital Public Infrastructure - DPI) योजना आहे.
• यात तंत्रज्ञान आणि डिजिटल डेटाबेसचा समूह असून तो प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या माहितीवर लक्ष केंद्रित करतो.
• शेतकऱ्यांची डिजिटल ओळख (Farmer ID) तयार करून त्यांना सरकारी सेवा आणि योजनांचा पारदर्शक लाभ मिळवून देण्यासाठी,
• तसेच सातबारा, आधार आणि पीक माहितीचा समावेश करून डिजिटल शेती स्मार्ट करण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येत आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• फार्मर आयडी → शेतकऱ्यांची डिजिटल ओळख
• उपयोग → खत वितरण पारदर्शक करणे
• योजना → ॲग्रीस्टॅक
• पहिला पायलट प्रकल्प → महाराष्ट्रात
• उद्देश → गैरव्यवहार कमी करणे + कार्यक्षमता वाढविणे


















