
चालू घडामोडी | E20 पेट्रोल
E20 Petrol
📚 Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान, अर्थशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) E20 पेट्रोलच्या वापरामुळे पेट्रोलच्या 'ऑक्टेन रेटिंग'वर काय परिणाम होतो ?
1. ऑक्टेन रेटिंग वाढते
2. ऑक्टेन रेटिंग कमी होते
3. ऑक्टेन रेटिंगमध्ये कोणताही बदल होत नाही.
4. पेट्रोलचे ज्वलन थांबते.
उत्तर : ऑक्टेन रेटिंग वाढते
📰 बातमी काय ?
• पश्चिम आशिया युद्धामुळे ऊर्जा संकट वाढत असताना E20 पेट्रोलची चर्चा सुरू आहे.
• इथेनॉल मिश्रणामुळे भारताचे तेल आयात कमी झाल्याचा पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी दावा केला.
✍️ भारताचे E20 धोरण :
• भारत सरकारने 1 एप्रिल 2025 पासून देशभरातील पेट्रोल पंपांवर E20 पेट्रोलचा वापर अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
⛽️ E20 पेट्रोल म्हणजे नेमकं काय ?
• E20 पेट्रोल म्हणजे एथेनॉल (Ethanol) आणि पेट्रोल यांचे मिश्रण आहे.
• यामध्ये 20% एथेनॉल आणि 80% पेट्रोल असते.
• बायोफ्युएलचा वापर - यातील इथेनॉल हे ऊस, मका, तांदूळ आणि इतर धान्यांपासून मिळवले जाणारे जैवइंधन आहे.
⚙️ E20 पेट्रोल कसे वेगळे आहे ?
• E20 पेट्रोलमध्ये काही विशेष वैशिष्ट्ये आहेत जी ते पारंपरिक पेट्रोलपेक्षा वेगळे बनवतात.
• उच्च ऑक्टेन रेटिंग (High Octane) : सामान्य पेट्रोलचा ऑक्टेन आकडा 91-92 असतो, तर E20 चा ऑक्टेन रेटिंग 95 RON पर्यंत असतो. यामुळे इंजिनमध्ये इंधनाचे ज्वलन अधिक कार्यक्षमतेने होते.
👉 नवीन वाहनांसाठी हे इंधन अधिक योग्य आहे
👉 जुन्या वाहनांमध्ये थोडी fuel efficiency कमी होऊ शकते
🚙 2023 नंतरच्या गाड्या (E20 Compliant) -
• अंमलबजावणी : भारत सरकारने 1 एप्रिल 2023 पासून BS6 Phase 2 (RDE Norms) लागू केले आहेत.
• या नियमांनुसार तयार झालेली सर्व नवीन वाहने (उदा. मारुती सुझुकी, टाटा, ह्युंदाई यांसारख्या कंपन्यांची एप्रिल 2023 नंतरची मॉडेल्स) तांत्रिकदृष्ट्या E20 पेट्रोलसाठी अनुकूल आहेत.
• फायदा : या गाड्यांच्या इंधन प्रणालीत (Fuel System) इथेनॉलमुळे होणारी संभाव्य झीज रोखण्यासाठी आधीच बदल केलेले असतात.
👨🏽🔧 जुन्या वाहनांवरील परिणाम (Pre-2023 Vehicles) :
1) रबर आणि प्लास्टिकची झीज : इथेनॉलमध्ये नैसर्गिकरित्या 'कोरोसिव्ह' (Corrosive) गुणधर्म असतात.
जुन्या गाड्यांमधील रबरच्या नळ्या (Fuel Hoses), प्लास्टिकचे सील आणि गॅस्केट हे इथेनॉलला सहन करू शकत नाहीत, ज्यामुळे ते लवकर खराब होऊ शकतात.
2) गंज लागणे (Corrosion) : इथेनॉल हवेतील ओलावा शोषून घेते (Hygroscopic), ज्यामुळे जुन्या गाड्यांच्या धातूच्या इंधन टाक्यांना आतून गंज लागण्याची शक्यता असते.
3) मायलेजमध्ये कमी : जुन्या गाड्यांमध्ये E20 पेट्रोल वापरल्यास मायलेजमध्ये साधारणतः 6% ते 10% पर्यंत घट जाणवू शकते.
E20 पेट्रोलचे महत्व (फायदे) :
💰परकीय चलनाची बचत :
• भारत कच्च्या तेलाच्या आयातीवर दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खर्च करतो.
• 20% इथेनॉल मिश्रणामुळे या आयातीत मोठी कपात होऊन विदेशी चलन साठवला जाईल.
🔋 ऊर्जा सुरक्षा : जागतिक राजकारणामुळे तेलाच्या किमतीत होणाऱ्या चढ-उतारांपासून भारतीय बाजारपेठेचे संरक्षण करण्यास मदत होईल.
🌽 कृषी क्षेत्राला चालना : इथेनॉलच्या मागणीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना (विशेषतः ऊस आणि मका) हमीभाव आणि नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल.
🌳 पर्यावरणीय महत्त्व : एथेनॉल हा वनस्पतींमधून तयार होतो, त्यामुळे कार्बन उत्सर्जन काही प्रमाणात कमी होईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : E20 पेट्रोल
• E20 — 20% एथेनॉल + 80% पेट्रोल
• अंमलबजावणी — 1 एप्रिल 2025 (भारत)
• उद्देश — Import कमी + Energy Self-Reliance
• इथेनॉल स्रोत — ऊस, मका, तांदूळ (बायोफ्युएल)
• महत्व (फायदे) -
💰परकीय चलनाची बचत
🔋 ऊर्जा सुरक्षा
🌽 कृषी क्षेत्राला चालना
🌳 पर्यावरणीय महत्त्व


















