
चालू घडामोडी | साधना सप्ताह 2026
Sadhna Saptah 2026
📚 Subject : GS - शासन व्यवहार (Governance), सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच ‘साधना सप्ताह 2026’ (Sadhna Saptah 2026) या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला तर ही मोहिम खालील पैकी कशाशी संबंधित आहे ?
1. कृषी उत्पादन वाढवण्यासाठी
2. सरकारी कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी
3. योग आणि आयुर्वेद विकासासाठी
4. महिल आरोग्य सेवा सुधारण्यासाठी
उत्तर : सरकारी कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीसाठी
📰 बातमी काय ?
• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 'मिशन कर्मयोगी' अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी 'साधना सप्ताह 2026' या देशव्यापी मोहिमेचा प्रारंभ केला आहे.
🤔 ‘साधना सप्ताह 2026’ म्हणजे काय ?
• हा केंद्र सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागामार्फत (Department of Personnel and Training - DoPT) राबवला जाणारा एक आठवडाभराचा राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यक्रम आहे.
• केंद्रीय मंत्रालये, विभाग, संस्था आणि राज्य सरकारांमधील सनदी सेवक (Civil Servants) यामध्ये सहभागी होतात.
• हा कार्यक्रम 'मिशन कर्मयोगी' या राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग आहे.
⚙️ ‘साधना सप्ताह 2026’ चे उद्दिष्टे :
• नागरी सेवकांची कार्यक्षमता, कौशल्ये आणि निर्णयक्षमता वाढवणे.
• “विकसित भारत” या दृष्टीकोनाशी सुसंगत अशी प्रशासन व्यवस्था तयार करणे आणि
• भविष्यासाठी सज्ज आणि 'नागरिक-केंद्रित' प्रशासन घडवणे. हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्टे आहेत.
💻 ‘साधना सप्ताह 2026’ कार्यक्रमाची रचना :
1) सहभाग - या उपक्रमात देशभरातील केंद्र आणि राज्य अशा दोन्ही स्तरांवरील अधिकारी सहभागी होतात, त्यामुळे प्रशासनात एकसमान दृष्टिकोन तयार होतो.
2) iGOT प्लॅटफॉर्मचा वापर - प्रशिक्षणासाठी iGOT Karmayogi या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो, ज्यामुळे ऑनलाइन आणि सतत शिक्षणाची सुविधा मिळते.
3) विविध विषयांचे प्रशिक्षण -
• या कार्यक्रमात वर्तनात्मक (Behavioural), कार्यात्मक (Functional) आणि विषय-विशिष्ट (Domain) असे विविध प्रकारचे कोर्सेस समाविष्ट आहेत.
• याशिवाय तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), प्रशासन सुधारणा आणि भारतीय ज्ञान प्रणाली यांसारख्या भविष्योन्मुख विषयांवरही विशेष भर दिला जातो.
✍️ ‘साधना सप्ताह 2026’ उपक्रमाचे महत्त्व :
• हा उपक्रम प्रशासन अधिक कार्यक्षम आणि उत्तरदायी बनवण्यासाठी महत्त्वाचा आहे.
• प्रशिक्षित आणि कौशल्यपूर्ण सनदी अधिकारी असल्यास शासन सेवा अधिक वेगाने आणि पारदर्शकपणे नागरिकांपर्यंत पोहोचतात.
• त्यामुळे नागरिक-केंद्रित (Citizen-Centric) प्रशासनाची संकल्पना अधिक मजबूत होते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : ‘साधना सप्ताह 2026’
• योजना : मिशन कर्मयोगी अंतर्गत
• विभाग : DoPT (कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग).
• मुख्य उद्दिष्टे : भविष्यासाठी सज्ज आणि 'नागरिक-केंद्रित' प्रशासन घडवणे
• सहभाग : केंद्र आणि राज्य सरकारांमधील सनदी सेवक














