
चालू घडामोडी | जन विश्वास (तरतुदींमध्ये सुधारणा) विधेयक, 2026
Jan Vishwas (Amendment of Provisions) Bill, 2026
📚 Subject : GS - राज्यशास्त्र - कायदे, विधेयक
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, 'जन विश्वास (तरतुदींमध्ये सुधारणा) विधेयक, 2026 संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आले तर हे विधेयक खालील पैकी कशाशी संबंधित आहे ?
1. आधार वापराबाबत कायदे तयार करणे.
2. परकीय गुंतवणुकीवर निर्बंध घालणे.
3. किरकोळ गुन्ह्यांचे गुन्हेगारी स्वरूप रद्द करणे
4. निवडणूकीची सर्व माहिती जनतेसाठी उपलब्ध करणे.
उत्तर : किरकोळ गुन्ह्यांचे गुन्हेगारी स्वरूप रद्द करणे.
📰 बातमी काय ?
• नागरिकांवरील कायदेशीर ओझे कमी करण्यासाठी आणि व्यवसायांना चालना देण्यासाठी मांडलेले 'जन विश्वास (तरतुदींमध्ये सुधारणा) विधेयक, 2026 संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर केले आहे.
• हे विधेयक 'कमीतकमी सरकार, जास्तीत जास्त शासन' (Minimum Government, Maximum Governance) या तत्त्वावर आधारित आहे.
📜 विधेयकाची पार्श्वभूमी आणि स्वरूप :
• हे विधेयक 2025 च्या आवृत्तीचे सुधारित स्वरूप आहे.
• श्री. तेजस्वी सूर्या यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने (Select Committee) 80 केंद्रीय कायद्यांमध्ये बदल करण्याची शिफारस यात केली.

🎯 'जन विश्वास (तरतुदींमध्ये सुधारणा) विधेयक, 2026 चा मुख्य उद्देश कोणता ?
• सुमारे 1,000 पेक्षा जास्त गुन्ह्यांचे उदात्तीकरण करणे (Rationalize) आणि किरकोळ चुकांसाठी असलेली तुरुंगवासाची शिक्षा रद्द करणे.
🛡️ 'जन विश्वास (तरतुदींमध्ये सुधारणा) विधेयक, 2026 चे प्रमुख वैशिष्ट्ये :
1) गुन्हेगारीमुक्त (Decriminalization) :
• अनेक तांत्रिक आणि किरकोळ स्वरूपाचे गुन्हे आता 'गुन्हेगारी' (Criminal) समजले जाणार नाहीत, तर ते 'दिवाणी' (Civil) स्वरूपाचे मानले जातील.
• उदाहरणार्थ - 'औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, 1940' अंतर्गत काही उल्लंघनांसाठी पूर्वी तुरुंगवास व्हायचा. आता त्याऐवजी 1 लाख रुपये दंड किंवा जप्त केलेल्या मालाच्या तिप्पट किंमत मोजावी लागेल.
2) तुरुंगवासाची तरतूद रद्द करणे (Removal of Imprisonment) :
• अनेक जुन्या कायद्यांमधील कारावासाची शिक्षा काढून टाकून केवळ आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
• उदाहरणार्थ - 'विद्युत कायदा, 2003' आणि 'भारतीय उत्तराधिकार कायदा, 1925' मधील किरकोळ गुन्ह्यांसाठी आता तुरुंगात जावे लागणार नाही.
3) कालबाह्य गुन्हे वगळणे (Omission of Redundant Offences) :
• काही असे गुन्हे जे आजच्या काळात निरर्थक आहेत, ते पूर्णपणे काढून टाकण्यात आले आहेत.
• उदाहरणार्थ - दिल्ली पोलीस कायद्यांतर्गत खोटी 'फायर अलार्म' देणे किंवा मृत्यू-जन्माची नोंद वेळेत न करणे.
4) सुधारणेची संधी (Warnings and Notices) :
• दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी व्यावसायिक किंवा नागरिकांना स्वतःला सुधारण्याची संधी दिली जाईल.
• ऍडव्हायझरी (Advisories)- शिकाऊ उमेदवारी (Apprentices) कायदा, 1961' अंतर्गत पहिल्या चुकीसाठी फक्त सल्ला दिला जाईल.
• सुधारणा नोटीस (Improvement Notices)- 'लीगल मेट्रोलॉजी कायदा, 2009' अंतर्गत व्यवसायांना त्रुटी सुधारण्यासाठी ठराविक वेळ दिला जाईल.
5) दंडाची स्वयंचलित वाढ (Automatic Revision) :
• विधेयकानुसार, जर एखाद्या कायद्यात वेगळी तरतूद नसेल, तर किमान दंडाच्या रकमेत दर तीन वर्षांनी 10% वाढ आपोआप केली जाईल.
⚖️ यासाठी न्यायनिवाडा यंत्रणा कशी आहे ? (Adjudication Mechanism) -
• दंड निश्चित करण्यासाठी विशेष 'अधिनिर्णय अधिकारी' (Adjudicating Officers) नेमले जातील.
• त्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी 'अपीलीय अधिकारी' देखील असतील, ज्यामुळे न्यायालयांवरील खटल्यांचा भार कमी होईल.
✍️ 'जन विश्वास (तरतुदींमध्ये सुधारणा) विधेयक, 2026 चे महत्त्व (Significance) :
• Ease of Doing Business : किरकोळ तांत्रिक चुकांसाठी तुरुंगात जाण्याची भीती नसल्यामुळे उद्योजकता वाढेल.
• प्रशासकीय पारदर्शकता : ब्रिटीशकालीन कालबाह्य कायदे रद्द करून न्यायव्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे.
• विश्वासावर आधारित शासन : सरकार आणि नागरिक यांच्यातील विश्वास वाढवणे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : 'जन विश्वास (तरतुदींमध्ये सुधारणा) विधेयक, 2026
• विधेयक — संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर
• तत्त्व — Minimum Government, Maximum Governance
• कव्हरेज — 80 केंद्रीय कायदे
• तरतुदी — 1000+ गुन्ह्यांचे पुनरावलोकन
• मुख्य बदल — गुन्हेगारी → दिवाणी (Civil Penalty)
• तुरुंगवास — किरकोळ गुन्ह्यांसाठी रद्द














