
चालू घडामोडी | कर साथी
Kar Saathi
📚 Subject : GS - अर्थशास्त्र, सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'कर साथी' (Kar Saathi) या नुकत्याच चर्चेत असलेल्या प्लॅटफॉर्मबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(अ) हा प्राप्तिकर विभागाने सुरू केलेला एक AI-आधारित डिजिटल सहाय्यक आहे.
(ब) हा प्लॅटफॉर्म नवीन 'प्राप्तिकर कायदा, 2025' च्या अंमलबजावणीसाठी मदत करतो.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?
1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ आणि ब दोन्ही बरोबर
4. अ आणि ब दोन्ही चूक
उत्तर : अ आणि ब दोन्ही बरोबर
📰 बातमी काय ?
• भारताच्या आयकर विभागाने (Income Tax Department) कर साथी (Kar Saathi) हा AI-आधारित (कृत्रिम बुद्धिमत्ता) डिजिटल सहाय्यक प्लॅटफॉर्म सुरू केला आहे.
🤔 कर साथी (Kar Saathi) म्हणजे काय ?
• ‘कर साथी’ हा आयकर विभागाचा एक एआय-चॅटबॉट (AI-Powered Chatbot) किंवा डिजिटल सहाय्यक (Digital Assistant) आहे.
• तो करदात्यांसाठी एक One-Stop Platform म्हणून काम करतो, जिथे कर भरणे, माहिती मिळवणे, e-verification आणि तक्रार निवारण यांसारख्या सेवा एका ठिकाणी उपलब्ध होतात.
⚙️ कर साथीचे उद्दिष्टे :
• या उपक्रमाचा मुख्य उद्देश करदात्यांसाठी कर भरण्याची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक करणे हा आहे.
• तसेच 24 तास (24×7) उपलब्ध असलेली AI-आधारित मदत देऊन करदात्यांचा अनुभव सुधारण्यावर भर दिला जातो.
• नवीन 'प्राप्तिकर कायदा, 2025' (Income Tax Act, 2025) मध्ये सहज संक्रमण (Smooth Transition) व्हावे, हेही या उपक्रमाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
💻 ‘कर साथी’ कसे काम करते ?
• हा प्लॅटफॉर्म सुधारित आयकर पोर्टलवर उपलब्ध असून, करदात्यांना विविध सेवांची माहिती सहज मिळते.
• कर विवरणपत्र (ITR) भरणे, कर कपात (Deductions), नोटीस, रिफंड, फॉर्म्स आणि Compliance यासंबंधी प्रश्नांची उत्तरे AI च्या माध्यमातून लगेच दिली जातात. यामुळे प्रक्रिया जलद आणि सोपी होते.
• मार्गदर्शन : करदात्यांच्या मदतीसाठी 2,200 पेक्षा जास्त 'FAQs' (नेहमी विचारले जाणारे प्रश्न) तयार करण्यात आले आहेत.
🎯 ‘कर साथी’ उपक्रमाचे महत्त्व :
• ‘कर साथी’ मुळे करदात्यांना दैनंदिन प्रश्नांसाठी मध्यस्थांवर अवलंबून राहावे लागत नाही.
• तसेच हा उपक्रम भारतातील AI-आधारित डिजिटल शासन (Digital Governance) मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि नागरिक-केंद्रित बनते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Kar Saathi
• ‘कर साथी’ — आयकर विभागाचा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सहाय्यक
• उद्देश — कर भरणे (ITR) सुलभ करणे आणि करदात्यांना मदत
• 24×7 सेवा — कर संबंधित प्रश्नांना तत्काळ उत्तर
• नवीन आयकर कायदा 2025 — अंमलबजावणीसाठी सहाय्य
• वैशिष्ट्य — चॅटबॉटद्वारे स्वयंचलित मार्गदर्शन
• महत्त्व — डिजिटल शासन मजबूत करणे व करदात्यांचा अनुभव सुधारणा














