
चालू घडामोडी | गुरू तेग बहादूर जी
Guru Teg Bahadur Ji
📚 Subject : GS - व्यक्ती विशेष, इतिहास - मध्ययुगीन भारतीय इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) खालीलपैकी कोणत्या कारणास्तव गुरू तेग बहादूर जी यांना 'हिंद दी चादर' म्हटले जाते ?
1. त्यांनी शीख सैन्याचे आधुनिकीकरण केले.
2. त्यांनी मुघल साम्राज्याला भारतातून हद्दपार केले.
3. त्यांनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि काश्मिरी ब्राह्मणांच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली.
4. त्यांनी शीख धर्माचा जगभर प्रचार केला.\
उत्तर : त्यांनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी आणि काश्मिरी ब्राह्मणांच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली.
📰 बातमी काय ?
• शीख धर्माचे नववे गुरु गुरू तेग बहादूर जी यांच्या प्रकाश पर्वानिमित्त सर्वांना शुभेच्छा.
• या दिना निमित्ताने गुरु तेग बहादूर यांच्या त्याग, बलिदान आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या मूल्यांची आठवण करून दिली जाते.

🤔 प्रकाश पर्व म्हणजे काय ?
• प्रकाश पर्व (प्रकाश पूरब) हे शीख धर्मातील सर्वात पवित्र सण मानले जातात, जे प्रामुख्याने शीख गुरूंच्या जन्मदिनानिमित्त साजरे केले जातात.
• हे पर्व 'ज्ञानाचा प्रकाश' आणि 'अंधकार दूर करणे' यांचे प्रतीक आहे.
✍️ प्रारंभिक जीवन आणि गुरु पद :
• गुरू तेग बहादूर जी यांचा जन्म 1 एप्रिल 1621 रोजी अमृतसर येथे झाला.
• त्यांचे मूळ नाव त्याग मल होते.
• ते 6 वे शीख गुरू, गुरू हरगोविंद जी यांचे पुत्र होते.
⚔️ 'तेग बहादूर' उपाधी केव्हा आणि का मिळाली ?
• 1634 मध्ये मुघलांविरुद्ध झालेल्या 'करतारपूरच्या लढाईत' त्यांनी अभूतपूर्व शौर्य गाजवले.
• त्यांच्या या पराक्रमामुळे त्यांना 'तेग बहादूर' (तलवारीचा महान योद्धा) म्हणून ओळखू लागले.
✍️ शीखांचे 9वे गुरू :
• 8 वे गुरू, गुरू हरकिशन जी यांच्यानंतर गुरू तेग बहादूर जी हे शीखांचे 9 वे आध्यात्मिक गुरु बनले.
📜 आध्यात्मिक विचारधारा (Philosophy & Teachings) :
• गुरू तेग बहादूर जी यांनी गुरू नानक देवजींचा 'एक ओंकार' (ईश्वर एक आहे) हा मूळ शिकवण पुढे नेली.
• त्यांच्या शिकवणुकीचे दोन मुख्य आधारस्तंभ होते - 1) 'निर्भय' (कुणालाही घाबरू नका) आणि 2) 'निर्वैर' (कुणाशीही शत्रुत्व ठेवू नका).
• त्यांच्यावर वडिलांच्या 'मिरी-पिरी' (लौकिक सत्ता आणि आध्यात्मिक शक्ती यांचा संगम) या तत्त्वाचा प्रभाव होता.
📜 ऐतिहासिक योगदान (Major Contributions) :
• प्रवास - त्यांनी शीख धर्माचा प्रसार करण्यासाठी उत्तर आणि पूर्व भारत (आसाम, ढाका) येथे मोठा प्रवास केला.
• शहर स्थापना - त्यांनी शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी 'चक नानकी' नावाचे शहर वसवले, जे आज 'आनंदपूर साहिब' या नावाने जगप्रसिद्ध आहे.
• साहित्य - त्यांनी 15 रागांमध्ये 59 शब्द आणि 57 श्लोक रचले, जे नंतर 10 वे गुरू, गुरू गोविंद सिंग जी यांनी 'गुरू ग्रंथ साहिब' मध्ये समाविष्ट केले.
🛡️ सर्वोच्च बलिदान आणि 'हिंद दी चादर' :
• मुघल सम्राट औरंगजेबाच्या धार्मिक छळवणुकीच्या काळात, काश्मिरी ब्राह्मणांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी गुरू तेग बहादूर जी पुढे आले.
• बलिदान (1675) - औरंगजेबाने त्यांना इस्लाम स्वीकारण्याची सक्ती केली, परंतु त्यांनी ती नाकारली. परिणामी, दिल्लीत त्यांचा सार्वजनिकरित्या शिरच्छेद करण्यात आला.
• त्यांच्या या योगदान आणि बलिदानामुळे त्यांना 'हिंद दी चादर' (भारताचे संरक्षण कवच) ही उपाधी मिळाली.
• त्यांच्या बलिदानामुळे त्यांचे पुत्र गुरू गोविंद सिंग जी यांनी पुढे खालसा पंथाची स्थापना करून शीख समाजाला संघटित केले.
🛕 धार्मिक स्थळे :
• गुरुद्वारा शीशगंज (दिल्ली) - या ठिकाणी त्यांचा शिरच्छेद (शीश कापणे) करण्यात आला, म्हणून या स्थानाला 'शीशगंज' असे नाव पडले
• गुरुद्वारा रकाबगंज (दिल्ली) - जिथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• गुरु तेग बहादूर: 9वे शीख गुरु
• जन्म : 1 एप्रिल 1621, अमृतसर
• शिकवण : 'निर्भय' आणि 'निर्वैर'
• शहर स्थापना : चक नानकी (आनंदपूर साहिब)
• उपाधी: “हिंद दी चादर”
• बलिदान: 1675, दिल्ली (औरंगजेब काळ)
• वैशिष्ट्य: धार्मिक स्वातंत्र्यासाठी बलिदान












