
चालू घडामोडी | अरब लीग चे पुढील महासचिव कोण ?
Arab League Appoints New Secretary-General
📚 Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'लीग ऑफ अरब स्टेट्स' (अरब लीग) चे पुढील महासचिव (Secretary-General') म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ?
1. अहमद अबुल घैत
2. मोहम्मद बिन सलमान
3. नबील फहमी
4. यांपैकी नाही
उत्तर : नबील फहमी (Nabil Fahmy)
📰 बातमी काय ?
• 2026 मध्ये अरब लीगच्या परिषदेनं (Council) इजिप्तचे माजी परराष्ट्रमंत्री नबील फहमी (Nabil Fahmy) यांची पुढील महासचिव (Secretary-General') म्हणून निवड मंजूर केली आहे.
• ही निवड संघटनेतील नेतृत्व बदल आणि प्रादेशिक राजकारणातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जाते.
• त्यांचा कार्यकाळ 1 जुलै 2026 पासून 5 वर्षांसाठी सुरू होईल.
• ते विद्यमान महासचिव अहमद अबुल घैत (Ahmed Aboul Gheit) यांची जागा घेणार आहेत.

🌍 अरब लीग म्हणजे काय ?
• अरब लीग (Arab League) ही एक प्रादेशिक संघटना असून तिची स्थापना 1945 मध्ये झाली.
• यात सध्या 22 अरब देशांचा समावेश आहे, जे मुख्यतः पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिका या भागात आहेत.
📜 ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि स्थापना :
• अरब लीगची स्थापना दुसऱ्या महायुद्धानंतरच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत झाली.
• 1944 मधील अलेक्झांड्रिया प्रोटोकॉलच्या (Alexandria Protocol) आधारे ही संघटना उभी राहिली.
• स्थापना : 22 मार्च 1945 (कैरो, इजिप्त येथे)
• मुख्यालय : कैरो (इजिप्त)
• त्या काळात वसाहतवादातून मुक्त होणाऱ्या अरब देशांना एकत्र आणणे आणि पॅलेस्टाईन प्रश्नावर एकसंध भूमिका घेणे हे मुख्य उद्दिष्ट होते.
🎯अरब लीग ची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती कशी आहे ?
• सहकार्य (Cooperation) - राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सदस्य देशांमध्ये समन्वय वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
• विवाद निवारण (Mediation) - सदस्य देशांमधील व बाह्य देशांबरोबरचे वाद शांततेने सोडवण्यासाठी मध्यस्थीची भूमिका निभावते.
• सुरक्षा व्यवस्था (Collective Security) - 1950 च्या 'संयुक्त संरक्षण आणि आर्थिक सहकार्य करारा' नुसार सदस्य देशांनी एकत्रित संरक्षणासाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे.
⚠️ मुख्य समस्या आणि मर्यादा :
• सैल संरचना (Loose Confederation) - ही संघटना खूपच सैल प्रकारची असल्यामुळे निर्णयांची अंमलबजावणी कमकुवत राहते.
• अंतर्गत मतभेद - सदस्य देशांमधील राजकीय मतभेदांमुळे एकसंध भूमिका घेणे कठीण जाते.
• प्रभाव कमी होणे - संघर्ष निवारणात मर्यादित यश आणि जागतिक स्तरावर कमी होत चाललेला प्रभाव ही मोठी समस्या आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : अरब लीग
• स्थापना : 22 मार्च 1945 (कैरो, इजिप्त येथे)
• आधार : 1944 अलेक्झांड्रिया प्रोटोकॉल
• मुख्यालय : कैरो (इजिप्त)
• सदस्य देश : 22 (पश्चिम आशिया + उत्तर आफ्रिका)
• मुख्य उद्दिष्ट: अरब एकता आणि सहकार्य















