
चालू घडामोडी | मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना
Chief Minister Rural Livestock Entrepreneurship Scheme
📚 Subject : GS - सरकारी योजना - महाराष्ट्र, अर्थशास्त्र - कृषी
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ कोणत्या राज्य सरकारने सुरू केली ?
1. मध्य प्रदेश
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. राजस्थान
उत्तर : महाराष्ट्र
📰 बातमी काय ?
• ग्रामीण भागातील पशुपालकांना उद्योजक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना ही महत्त्वकांक्षी योजना जाहीर झाली आहे.
• या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पशुपालकांना मिळावा, यासाठी यंत्रणांनी पशुपालकांपर्यंत योजनेची माहिती पोहचवावी, असे निर्देश पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
🔍 योजना नेमकी काय आहे?
• ही योजना ग्रामीण भागातील पशुपालन व्यवसायाला पारंपरिक उपजीविकेपासून व्यावसायिक उद्योजकतेकडे नेणारी एक महत्त्वाची राज्य सरकारची योजना आहे.
• दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन यांसारख्या क्षेत्रांमध्ये आर्थिक मदत आणि तांत्रिक मार्गदर्शन देऊन शेतकरी आणि युवकांना उद्योजक बनवणे हा योजनेचा केंद्रबिंदू आहे.
ऐतिहासिक व धोरणात्मक पार्श्वभूमी :
• महाराष्ट्र हे पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य आहे.
• राज्याच्या ‘Vision Document’ मध्ये कृषी आणि पशुसंवर्धन या दोन्ही क्षेत्रांचा एकत्रित विचार करून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे.
• त्याचाच पुढील टप्पा म्हणून ही योजना राबवली जात आहे.
⚙️ योजनेची कार्यपद्धती :
• आर्थिक व तांत्रिक सहाय्य - लाभार्थ्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी निधी, प्रशिक्षण आणि तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते.
• आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर - कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) व आधुनिक पद्धतींच्या साहाय्याने उत्पादनक्षमता वाढवण्यावर भर.
• किसान क्रेडिट कार्ड (KCC) - पशुपालकांना सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे.
• पायाभूत सुविधा व मनुष्यबळ - पशुवैद्यकीय सेवा, पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षित मनुष्यबळ वाढवणे.
🤝 अंमलबजावणी यंत्रणा -
• जिल्हा व तालुका स्तरावर शिबिरे
• लाभार्थी निवड प्रक्रिया
• महिनानिहाय आढावा (Monitoring)
• पारदर्शक अंमलबजावणी
🎯 योजनेची प्रमुख उद्दिष्टे :
• ग्रामीण युवकांना उद्योजक बनवणे - पशुपालनाला व्यवसायिक स्वरूप देऊन रोजगार निर्मिती.
• उत्पन्न वाढवणे - दूध, अंडी, मांस यांसारख्या नियमित उत्पन्न स्रोतांद्वारे आर्थिक स्थैर्य.
• स्थानिक रोजगार निर्माण करणे - गावातच रोजगार उपलब्ध करून स्थलांतर कमी करणे.
• “एक जिल्हा – एक उत्पादन” (ODOP) - प्रत्येक जिल्ह्यात विशिष्ट पशुधन उत्पादन विकसित करणे.
• ब्रँडिंग व मूल्यवर्धन (Value Addition) - उदा. अंड्याचा ब्रँड तयार करणे, दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया.
📊 महत्त्वाची वैशिष्ट्ये (Features) :
• बहुविध पशुधन व्यवसायांचा समावेश - दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन तसेच वराहपालनावर भर.
• तंत्रज्ञान-आधारित पशुपालन - AI चा वापर करून उत्पादकता वाढवणे.
• योजनांची पुनर्रचना - पशुसंवर्धन विभागातील सुमारे 27 योजनांचे पुनर्गठन.
• आर्थिक तरतूद - अर्थसंकल्पात पशुसंर्वधन विभागाकरिता सुमारे 4552 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना
• राज्य → महाराष्ट्र
• उद्देश → पशुपालनातून उद्योजकता + रोजगार
• क्षेत्रे → दुग्ध, कुक्कुट, शेळी-मेंढी, वराहपालन
• बजेट → ₹4552 कोटी
• महाराष्ट्र → पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा देणारे पहिले राज्य
















