
चालू घडामोडी | जागतिक होमिओपॅथी दिन
World Homoeopathy Day
📚 Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक होमिओपॅथी दिन केव्हा साजरी करतात ?
1. 26 फेब्रुवारी
2. 20 मार्च
3. 10 एप्रिल
4. 24 एप्रिल
उत्तर : 10 एप्रिल
📰 बातमी काय ?
• जगभरात दरवर्षी 10 एप्रिल या दिवशी जागतिक होमिओपॅथी दिन साजरी करतात.
• 10 एप्रिल रोजी होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन (Dr. Samuel Hahnemann) यांचा जन्म झाला.
• त्यांचा जन्मदिवस हा जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो.

🧐 होमिओपॅथिक म्हणजे काय ?
• होमिओपॅथी (Homeopathy) हा शब्द दोन ग्रीक शब्दांपासून बनलेला आहे, होमिओज् (Homois) म्हणजे सारखा आणि पॅथोज् (Pathos) म्हणजे पीडित.
• होमिओपॅथी पद्धतीला ‘समचिकित्सा पद्धती’ असेही म्हणतात.
• या उपचारपद्धतीचे सूत्र ‘सिमिलिया सिमिलिबस क्युरेंटर’ (Similia Similibus Curentur) म्हणजेच ‘काट्याने काटा काढणे’ हे आहे.
• होमिओपॅथिकनुसार, शरीरात स्वतःला बरे करण्याची क्षमता असते.
• होमिओपॅथी ही जगातील दुसरी सर्वात मोठी वैद्यकीय प्रणाली आहे.
• होमिओपॅथिक औषध पद्धतीच्या तत्त्वानुसार, होमिओपॅथिक औषधे शरीराची स्व-उपचार क्षमता वाढवतात.
• यामध्ये, रोगाची लक्षणे शरीराकडून पुन्हा निरोगी होण्यासाठी मिळालेली प्रतिक्रिया मानली जातात.
• होमिओपॅथी रुग्णाची जीवनशैली सुधारण्यावर लक्ष केंद्रित करते.
• ही पद्धत कोणत्याही दुष्परिणामांशिवाय उपचार मानली जाते.
• होमिओपॅथिक औषधे प्राणी, वनस्पती, खनिज आणि इतर नैसर्गिक पदार्थांच्या अवशेषांपासून तयार केली जातात.
👨⚕️ डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• Dr. Samuel Hahnemann
• डॉ. सॅम्युअल हॅनिमन हे जर्मन वैद्य आणि रसायनशास्त्रज्ञ होते.
• त्यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी जर्मनी मध्ये झाला.
• डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांनी होमिओपॅथीचा सिद्धांत विकसित केला आणि या पद्धतीचा प्रसार करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित केले.
• डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांना होमिओपॅथी या चिकित्सा पद्धतीचे जनक मानले जाते.
• त्यांचा 'ऑर्गॅनॉन ऑफ मेडिसिन' (Organon of Medicine) हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आजही जगभरातील होमियोपॅथीचे उपचार करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरतो.
• डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या कार्याचा स न्मान करण्यासाठी दरवर्षी त्यांचा जन्मदिवस 10 एप्रिल हा जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
📜 भारतातील होमियोपॅथीचा इतिहास :
• भारताला 19 व्या शतकाच्या सुरुवातीला होमियोपॅथीची ओळख झाली, तीच तिच्या हळूहळू विस्ताराची सुरुवात ठरली.
• सन 1810 च्या आसपास, सॅम्युअल हॅनेमान यांचे शिष्य जॉन मार्टिन होनिगबर्गर यांनी भारतात वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.
• 1839 मध्ये त्यांनी महाराजा रणजीत सिंग यांच्यावर केलेल्या यशस्वी उपचारामुळे उच्चभ्रू तसेच सामान्य जनतेमध्येही या उपचारपद्धतीचा अंगिकार करण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
🎯 स्वातंत्र्योत्तर काळात, भारत सरकारने होमियोपॅथीला संस्थात्मक स्वरूप देण्यासाठी उचललेली पावले पुढीलप्रमाणे -
• 1973 : केंद्रीय होमिओपॅथी परिषदेची (Central Council of Homoeopathy) स्थापना करण्यात आली.
• 1978 : होमियोपॅथी संशोधनासाठी केंद्रीय परिषदेची (Central Council for Research in Homoeopathy) स्थापना करण्यात आली.
✍️ या उपक्रमांमुळे या क्षेत्रातील नियमन, शिक्षण आणि संशोधनाच्या कामाला अधिक बळकटी मिळाली आहे.
🏛️ सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमियोपॅथी :
🏛️ Central Council for Research in Homoeopathy (CCRH) :
• नवी दिल्ली येथील सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमियोपॅथी, वैद्यकीय पद्धती अधिक मजबूत करण्यासाठी आणि होमिओपॅथीच्या जागतिक स्वीकृतीला पाठिंबा देण्यासाठी वैज्ञानिक आणि नैतिक संशोधनाला प्रोत्साहन देते.
• भारतभरातील 33 संस्था/युनिट्सच्या नेटवर्कद्वारे होमिओपॅथीमधील वैज्ञानिक संशोधन केले जाते.
🎯2026 साठी जागतिक होमियोपॅथी दिनाची संकल्पना (थीम) कोणती ?
• "शाश्वत आरोग्यासाठी होमियोपॅथी" (Homoeopathy for Sustainable Health) ही 2026 च्या जागतिक होमियोपॅथी दिनाची मुख्य संकल्पना आहे.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• जागतिक होमिओपॅथी दिन — 10 एप्रिल
• कारण — डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांचा जन्मदिवस
• डॉ. सॅम्युअल हॅनेमन — जर्मन वैद्य व रसायनशास्त्रज्ञ
• जन्म — 10 एप्रिल 1755 (जर्मनी)
• ओळख — होमिओपॅथीचे जनक
• ग्रंथ — Organon of Medicine
• होमिओपॅथी — जगातील दुसरी सर्वात मोठी वैद्यकीय प्रणाली
















