
चालू घडामोडी | मुंबईत सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहीम
Universal Parsi Registration Drive
📚 Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) 'जियो पारशी' (Jiyo Parsi) या योजनेचा मुख्य उद्देश कोणता आहे ?
1. पारशी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देणे.
2. पारशी समुदायातील वयोवृद्धांना पेन्शन देणे.
3. भारतातील पारशी समुदायाची घटती लोकसंख्या रोखणे.
4. पारशी मंदिरांच्या संवर्धनासाठी निधी देणे.
उत्तर : भारतातील पारशी समुदायाची घटती लोकसंख्या रोखणे.
📰 बातमी काय ?
• अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने (Ministry of Minority Affairs) मुंबईत आयोजित केलेल्या 'सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहिमे'ला (Universal Parsi Registration Drive) पारशी समुदायाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
• या विशेष शिबिरात 'जियो पारशी' (Jiyo Parsi) योजनेअंतर्गत सुमारे 300 हून अधिक नवीन नोंदणी करण्यात आल्या.
'सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहिमे संदर्भातमहत्वाचे मुद्दे (Key Points) :
• आयोजक - केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालय आणि बॉम्बे पारशी पंचायत (BPP) यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले होते.
• उद्देश - पारशी समुदायातील जास्तीत जास्त लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे आणि त्यांच्या लोकसंख्येच्या समस्यांवर तोडगा काढणे.
• उपक्रम - या मोहिमेत पात्र लाभार्थ्यांची 'जियो पारशी' पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आणि त्यांना योजनेची माहिती देण्यात आली.
🧬 ‘जियो पारशी’ योजना म्हणजे काय ? योजना केव्हा सुरू करण्यात आली ?
• ‘जियो पारशी’ ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना असून तिचा मुख्य उद्देश भारतातील पारशी समाजाची घटणारी लोकसंख्या स्थिर ठेवणे आणि वाढवणे हा आहे.
• यासाठी वैज्ञानिक उपाययोजना आणि आरोग्य सहाय्याद्वारे पारशी लोकसंख्या वाढीस चालना दिली जाते.
• सुरुवात - ही योजना 2013–14 मध्ये सुरू करण्यात आली.
• स्वरूप - ही एक केंद्रीय क्षेत्र योजना (Central Sector Scheme) आहे. (म्हणजे १००% केंद्र सरकारद्वारे वित्तपुरवठा).
योजनेचे 3 प्रमुख घटक पुढीलप्रमाणे :
1) वैद्यकीय सहाय्य (Medical Assistance) - वंध्यत्व उपचार (infertility treatment) आणि गर्भधारणेसंबंधित काळजीसाठी विशेष वैद्यकीय सहाय्य दिले जाते.
2) आरोग्य व समुदाय सहाय्य (Health of Community) - बालसंगोपन आणि वृद्ध व्यक्तींच्या देखभालीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते.
3) जनजागृती (Advocacy) - समाजामध्ये जागरूकता वाढवण्यासाठी तसेच लवकर विवाह आणि एकापेक्षा जास्त मुलांसाठी प्रोत्साहन यासाठी समुपदेशन, जनजागृती मोहीम आणि संपर्क कार्यक्रम राबवले जातात.
🎯 ही मोहीम का महत्त्वाची आहे ?
• पारशी समाजाची लोकसंख्या सातत्याने घटत असल्याने ही योजना त्यांच्या अस्तित्वासाठी महत्त्वाची ठरते.
• या नोंदणी मोहिमेमुळे पात्र लाभार्थ्यांना योजनांचा थेट फायदा मिळतो आणि सरकारला अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करता येते.
• यामुळे पारशी समाजाचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यास मदत होते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• योजनेचे नाव - जियो पारशी योजना
• प्रारंभ - 2013–14
• उद्दिष्ट - पारशी लोकसंख्या वाढवणे
• सहाय्य - वैद्यकीय + आर्थिक + समुपदेशन
• अंमलबजावणी - अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय
• योजनेचे स्वरूप - केंद्रीय क्षेत्र योजना


















