
चालू घडामोडी | 🚀 इस्रोची 'मित्रा' मोहीम

ISRO's 'MITRA' mission
📚 Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) एप्रिल 2026 मध्ये 'मित्रा' (MITRA) ही विशेष मोहीम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केली ?
1. श्रीहरीकोटा, आंध्र प्रदेश
2. थुंबा, केरळ
3. जयपूर, राजस्थान
4. लेह, लडाख
उत्तर : लेह, लडाख
📰 बातमी काय ?
• भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) 2 ते 9 एप्रिल 2026 या कालावधीत लेह (लडाख) येथे 'मित्रा' (MITRA) मोहिमेचे आयोजन केले आहे.
• मानवी अंतराळ मोहिमांमधील सुरक्षा आणि कामगिरी तपासण्यासाठी ही एक महत्त्वाची चाचणी आहे.
🔍 'मित्रा' (MITRA) मोहीम नक्की काय आहे ?
• MITRA पूर्ण नाव : मॅपिंग ऑफ इंटरऑपरेबल ट्रेड्स अँड रिस्पॉन्स असेसमेंट (Mapping of Interoperable Traits and Response Assessment).
• स्थळ : लेह, लडाख (समुद्रसपाटीपासून सुमारे 3,500 मीटर उंचीवर).

🧐 लेह-लडाखची निवड का ? (Scientific Reason)
• लेह हे समुद्रसपाटीपासून सुमारे 3,500 मीटर उंचीवर आहे.
• येथील वातावरणामध्ये 'अल्प प्राणवायू' (Hypoxia), कडाक्याची थंडी आणि विलगता (Isolation) असते, जी अंतराळातील परिस्थितीशी जुळती मिळती आहे.
• म्हणूनच वैज्ञानिक भाषेत याला मानवी अंतराळ उड्डाणासाठी 'नैसर्गिक अनुरूप' (Natural Analogue) असे म्हटले जाते.
🎯 मोहिमेची मुख्य उद्दिष्टे (Main Objectives) :
🛰️ संवाद चाचणी : अंतराळवीर आणि 'ग्राउंड टीम' (Ground Teams) मधील समन्वय तपासणे.
🧠 निर्णयक्षमता : तणाव आणि एकाकीपणात मानवी निर्णय घेण्याच्या क्षमतेचे मूल्यमापन करणे.
🤝 सांघिक कार्य : टीम म्हणून काम करण्याची क्षमता आणि कामगिरीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे.
🎓 प्रशिक्षण : गगनयान मोहिमेसाठी मानवी घटकांवर आधारित प्रशिक्षण धोरणे विकसित करणे.
🤝 सहकार्य आणि संघटना (Collaboration)
• डिझाइन : ही मोहीम ISRO आणि 'इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन' (भारतीय हवाई दल) यांनी संयुक्तपणे राबवली आहे.
🇮🇳 गगनयान मोहिमेसाठी महत्त्व (Significance for Gaganyaan)
'गगनयान' ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. त्यादृष्टीने 'मित्रा' मोहिमेतून मिळणारा डेटा खालील बाबींसाठी निर्णायक ठरेल:
1. मानवी अनुकूलन : तणाव आणि एकाकीपणात अंतराळवीर स्वतःला कसे जुळवून घेतात ?
2. कामगिरी : शारीरिक आणि 'संज्ञानात्मक कामगिरी' (Cognitive Performance) कशी राहते ?
3. भूमिका वाटप : अंतराळवीरांच्या निवडीसाठी आणि त्यांच्या जबाबदाऱ्या ठरवण्यासाठी या माहितीचा वापर होईल.
🚀 गगनयान मोहिमे बद्दल रिव्हिजन पॉईंट्स :
• गगनयान : भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम, ज्यामध्ये 3 अंतराळवीरांना 400 किमी कक्षेत 3 दिवसांसाठी पाठवले जाणार आहे.
• LVM3 रॉकेट : या मोहिमेसाठी LVM3 हे प्रक्षेपक वाहन वापरले जाईल.
• या मोहिमेच्या यशानंतर भारत मानवी अंतराळ मोहिमा राबवणारा जगातील 4 था देश ठरेल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• मोहीम : मित्रा (MITRA)
• उद्देश : अंतराळात मानवी प्रतिसाद अभ्यास करणे
• स्थळ : लेह, (लडाख)
• सहकार्य : इस्रो + भारतीय हवाई दल
















