
चालू घडामोडी | स्टार्टअप्ससाठी 10,000 कोटी रुपयांचा ‘स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0’ अधिसूचित
Government notifies Startup India Fund of Funds 2.0 with ₹10,000 crore corpus
📚 Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘Startup India Fund of Funds (FoF) 2.0’ योजनेची अंमलबजावणी कोणती संस्था करणार आहे ?
1. NABARD
2. RBI
3. SIDBI
4. NITI Aayog
उत्तर : SIDBI
📰 बातमी काय ?
• 13 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 ची अधिसूचना जारी केली आहे.
• एकूण 10,000 कोटी रुपयांच्या निधीसह हा उपक्रम देशातल्या स्टार्टअप परिसंस्थेसाठी उद्यम आणि वाढीव भांडवल गोळा करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे.
🚀 " स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 " म्हणजे काय ?
‘Startup India Fund of Funds 2.0’
• ‘Startup India Fund of Funds 2.0’ हा सरकारद्वारे समर्थित निधी आहे, जो थेट स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करत नाही/
• SEBI-नोंदणीकृत वैकल्पिक गुंतवणूक निधी (Alternative Investment Funds - AIFs) मध्ये गुंतवणूक करतो.
• AIFs पुढे स्टार्टअप्समध्ये पैसा गुंतवतात.
• म्हणून याला “Fund of Funds” मॉडेल म्हणतात.
📜 ऐतिहासिक पार्श्वभूमी :
• ही योजना Startup India उपक्रमाचा भाग असून,
• याआधी 2016 मध्ये Fund of Funds for Startups (FFS 1.0) सुरू करण्यात आला होता.
• FoF 2.0 हा त्याचाच पुढील टप्पा आहे, जो स्टार्टअप क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी आणला आहे.
✍️ योजनेची वैशिष्ट्ये :
• या योजनेअंतर्गत सरकारने ₹10,000 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
• हा निधी विशेषतः Deep-tech, नवोन्मेष (Innovation) आणि उत्पादन क्षेत्रातील (Manufacturing) स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी वापरला जाईल.
• या माध्यमातून लहान शहरांतील स्टार्टअप्सनाही निधी मिळावा आणि देशभरात गुंतवणूक वाढावी, यावर भर दिला आहे.
• तसेच प्रारंभिक टप्प्यात (Early-Stage) भांडवलाच्या कमतरतेमुळे होणारे अपयश कमी करण्याचा प्रयत्न या योजनेत केला आहे.
🤔 योजनेची अंमलबजावणी कोणत्या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे ?
• अंमलबजावणी संस्था - भारतीय लघु उद्योग विकास बँक (Small Industries Development Bank of India - SIDBI) ही संस्था योजनेची अंमलबजावणी करेल.
🚀 " स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंड्स 2.0 " योजनेचा फायदा (महत्त्व) :
• भारतामध्ये स्टार्टअप परिसंस्था (Startup Ecosystem) वेगाने वाढत असले तरी अनेक नव्या कंपन्यांना सुरुवातीला निधी मिळण्यात अडचणी येतात.
• ही योजना -
1. स्टार्टअपना भांडवल उपलब्ध करून देईल
2. नवकल्पनांना चालना देईल
3. रोजगार निर्मिती वाढवेल
4. ‘Make in India’ आणि तंत्रज्ञान विकासाला बळ देईल
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• Startup India FoF 2.0 — 10,000 कोटी निधी
• उद्देश — स्टार्टअपसाठी भांडवल उपलब्ध करणे
• अंमलबजावणी — भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI)
• गुंतवणूक पद्धत — AIFs मार्फत अप्रत्यक्ष गुंतवणूक
• कालावधी — 16 वी व 17 वी वित्त आयोग चक्र


















