
चालू घडामोडी | वनतारा विद्यापीठ
Vantara University
📚 Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जगातील पहिले एकात्मिक वन्यजीव संवर्धन आणि पशुवैद्यकीय विद्यापीठ कोठे स्थापन करण्यात येत आहे ?
1. नागपूर, महाराष्ट्र
2. इडुक्की, केरळ
3. जामनगर, गुजरात
4. देहरादून उत्तराखंड
उत्तर : जामनगर, गुजरात
📰 बातमी काय ?
• वन्यजीव संवर्धन क्षेत्रातील ‘वनतारा' या वन्यजीव संवर्धन संस्थेने’ गुजरातमधील जामनगर येथे ‘Vantara University’ सुरू करण्याची घोषणा केली आहे.

🏛️ वनतारा संस्था स्थापना, संस्थापक , वैशिष्ट्ये :
• स्थापना - रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक श्री. अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखालील 'वनतारा' या वन्यजीव संवर्धन संस्थेद्वारे या वनतारा विद्यापीठाची (Vantara University) स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
• स्थान - वनतारा विद्यापीठ गुजरात राज्यातील जामनगर येथे स्थापन केले जाणार आहे, जिथे वनताराची विशाल वन्यजीव पुनर्वसन परिसंस्था आधीच कार्यरत आहे.
• वैशिष्ट्य - वनतारा विद्यापीठ हे वन्यजीव संवर्धन, पशुवैद्यकीय औषध आणि प्राणी कल्याण यासाठी समर्पित जगातील पहिले एकात्मिक जागतिक विद्यापीठ (World’s First Integrated Global University) असेल.

✍️ शैक्षणिक व्याप्ती आणि अभ्यासक्रम :
वनतारा विद्यापीठ केवळ पारंपारिक पशुवैद्यकीय शिक्षण न देता, वन्यजीवांच्या सर्वांगीण अभ्यासासाठी खालील क्षेत्रांत कार्यक्रम प्रदान करेल -
1. वन्यजीव वैद्यक आणि शस्त्रक्रिया (Wildlife Medicine and Surgery)
2. संवर्धन विज्ञान आणि धोरण (Conservation Science and Policy)
3. अनुवंशशास्त्र (Genetics) आणि महामारी विज्ञान (Epidemiology)
4. वर्तणूक विज्ञान (Behavioural Science)
🎯 प्रमुख उद्दिष्टे (Objectives) :
• व्यावसायिक मनुष्यबळ - भविष्यातील कुशल पशुवैद्य, संवर्धन शास्त्रज्ञ आणि वन्यजीव तज्ञ तयार करणे.
• पुनर्वसन - आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जखमी आणि लुप्तप्राय प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे.
• जागतिक केंद्र - वन्यजीव आणि पशुवैद्यकीय शिक्षणासाठी भारताला जगाचे केंद्र (Global Hub) म्हणून प्रस्थापित करणे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Vantara University
• नाव - वंतारा विद्यापीठ
• ठिकाण - जामनगर, गुजरात
• संस्था - वनतारा
• संस्थापक - श्री. अनंत अंबानी (Reliance).
• जागतिक दर्जा - जगातील पहिले एकात्मिक वन्यजीव विद्यापीठ.
• अभ्यासक्रम - वन्यजीव शस्त्रक्रिया, संवर्धन धोरण, अनुवंशशास्त्र इ.
• महत्त्व - वन्यजीव शिक्षणात भारताचे जागतिक नेतृत्व.














