
चालू घडामोडी | उपग्रह तंत्रज्ञान दिन
Satellite Technology Day
📚 Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतात उपग्रह तंत्रज्ञान दिन (Satellite Technology Day) केव्हा साजरी करतात ?
1. 26 जानेवारी
2. 13 एप्रिल
3. 19 एप्रिल
4. 1 मे
उत्तर : 19 एप्रिल
🛰️ उपग्रह तंत्रज्ञान दिन केव्हा आणि का साजरी करण्यात येतो ?
भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट अवकाशात प्रक्षेपित (लॅान्च) करण्यात आला.
• या दिवशी भारताच्या अंतराळ संप्रेषण, वैज्ञानिक संशोधन आणि उपग्रह तंत्रज्ञान परिसंस्थेचा पाया रचला गेला.
• या ऐतिहासिक दिवसाचे महत्त्व ओळखून दरवर्षी 19 एप्रिल हा दिवस भारतात उपग्रह तंत्रज्ञान दिन (Satellite Technology Day) म्हणून साजरी करतात.
✍️ भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• या उपग्रहाचे नाव 5 व्या शतकातील भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ आर्यभट्ट यांच्या नावावरून ठेवण्यात आले.
• भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) ने हा उपग्रह बनवला होता आणि सोव्हिएट युनियनच्या (रशियाच्या) मदतीनं रशियातील कापुस्तिन यार (Kapustin Yar) येथून 19 एप्रिल 1975 रोजी अवकाशात प्रेक्षपित (लॅान्च) करण्यात आला.
• भारताकडे त्यावेळी स्वतःचे प्रक्षेपक (रॉकेट) नसल्यामुळे, सोव्हिएत युनियनच्या मदतीने तेथील 'कॉसमॉस-3 एम' (Kosmos-3M) या रॉकेटद्वारे आर्यभट्टचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
• याचबरोबर आकाशात उपग्रह सोडणारा भारत जगातील 11 वा देश बनला.
• आर्यभट्ट उपग्रहाचे वजन 360 किलो ग्रॅम होते.

🧐 आर्यभट्ट उपग्रह काय काम करणार होता ?
🤔 आर्यभट्ट उपग्रहाचा उद्देश कोणता ?
• आर्यभट्ट उपग्रहाचा उद्देश एक्स-रे खगोलशास्त्र (X-ray Astronomy), वैमानिकीशास्त्रातील (Aeronomics) आणि सौर भौतिकशास्त्र (Solar Physics) यांवरील संशोधन करणे हा होता. जसे की,
• पृथ्वीच्या आयनोस्फीअरमधील परिस्थितीचा शोध घेण्यासाठी,
• सूर्यापासून येणारे न्यूट्रॉन आणि गॅमा किरणांचे मोजमाप करण्यासाठी आणि
• एक्स-रे खगोलशास्त्रातील तपास करण्यासाठी हा उपग्रह प्रेक्षपित करण्यात आला होता.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Satellite Technology Day
• उपग्रह तंत्रज्ञान दिन — 19 एप्रिल
• कारण — आर्यभट्ट उपग्रहाचे प्रक्षेपण (भारताचा पहिला उपग्रह)
• प्रक्षेपण दिनांक — 19 एप्रिल 1975
• विकसित संस्था — Indian Space Research Organisation (ISRO)
• प्रक्षेपण मदत — सोव्हिएत युनियन (USSR)
• प्रक्षेपण स्थळ — Kapustin Yar (रशिया)
• प्रक्षेपण रॉकेट — Kosmos-3M
















