
चालू घडामोडी | संरक्षण मंत्रालयाचे ₹5,083 कोटींचे करार

Defence Ministry contracts worth ₹5,083 Crore
Subject : GS - संरक्षण, आंतरराष्ट्रीय करार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडे संरक्षण मंत्रालयाने ₹5,083 कोटींचे महत्त्वाचे संरक्षण करार केले. त्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान कोणते ?
1. ALH Mk-III हेलिकॉप्टर रशियाकडून खरेदी केले जाईल.
2. श्तिल (Shtil) प्रणाली भारताने विकसित केली आहे.
3. श्तिल (Shtil) प्रणाली जमिनीवरील संरक्षणासाठी आहे.
4. ALH MK-III हेलिकॉप्टर पूर्णपणे भारतात डिझाइन व तयार केलेले आहे.
उत्तर : ALH MK-III हेलिकॉप्टर पूर्णपणे भारतात डिझाइन व तयार केलेले आहे.
📰 बातमी काय ?
• भारताच्या संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defence) ने मार्च 2026 रोजी ₹5,083 कोटींचे महत्त्वाचे संरक्षण करार केले.
🧐 हे संरक्षण करार कोणासोबत झाले ?
1) हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड : या करारांतर्गत भारतीय तटरक्षक दलासाठी 6 प्रगत हलकी हेलिकॉप्टर (Advanced Light Helicopter – ALH MK-III) खरेदी करण्यात येणार आहेत.
• ही हेलिकॉप्टर Hindustan Aeronautics Limited (HAL) या भारतीय कंपनीकडून घेतली जाणार आहेत.
2) रशिया : तसेच, भारतीय नौदलासाठी श्तिल (Shtil) हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीसाठी रशियाच्या जेएससी रोसोबोरोन एक्सपोर्ट सोबतही (JSC Rosoboronexport) करार करण्यात आला आहे.

🚁 एएलएच एमके-III (ALH MK-III) म्हणजे काय?
• एएलएच एमके-III हे एक दुहेरी इंजिन असलेले आधुनिक हेलिकॉप्टर आहे.
• हे हेलिकॉप्टर समुद्रातील विविध मोहिमा पार पाडण्यासाठी तयार केले गेले आहे.
• किनाऱ्यावरून तसेच जहाजावरून उड्डाण करण्याची त्याची क्षमता असल्यामुळे ते सागरी सुरक्षेसाठी खूप उपयुक्त ठरते.
• हा करार “Buy (Indian–IDDM)” या श्रेणीत येतो, म्हणजेच हे हेलिकॉप्टर पूर्णपणे भारतात डिझाइन व तयार केलेले आहे.
• त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ (Make in India) आणि ‘आत्मनिर्भर भारत’ (Aatmanirbhar Bharat) या उपक्रमांना मोठी चालना मिळते.
• या हेलिकॉप्टरचा उपयोग मच्छीमारांचे संरक्षण, अपतटीय प्रतिष्ठापनांची सुरक्षा आणि सागरी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी होतो.
🚀 श्तिल (Shtil) क्षेपणास्त्र प्रणाली म्हणजे काय ?
• श्तिल ही एक जहाजावरून कार्य करणारी मध्यम पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली (medium-range air defence system) आहे.
• सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर ही प्रणाली समुद्रातील युद्धनौकांचे हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करते.
• ही प्रणाली विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन (UAV) आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करण्यास सक्षम आहे.
• ही प्रणाली रशियाने विकसित केली असून ती Buk क्षेपणास्त्र प्रणालीवर (Buk Missile System) आधारित आहे.
• यामध्ये Vertical Launch System (VLS) तंत्रज्ञान वापरले जाते, ज्यामुळे क्षेपणास्त्र कोणत्याही दिशेने आणि कोणत्याही हवामानात जलद गतीने प्रक्षेपित करता येते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• मार्च 2026 – ₹5,083 कोटींचे संरक्षण करार
• संरक्षण मंत्रालय → दोन करार (HAL + रशिया)
• ALH Mk-III → हलकी हेलिकॉप्टर- HAL या भारतीय कंपनीकडून घेतली जाणार
• श्तिल (Shtil) हवाई संरक्षण क्षेपणास्त्र → रशियाच्या JSC रोसोबोरोन एक्सपोर्ट कडून घेतली जाणार

















