
चालू घडामोडी | SEBI सोशल नवीन मीडिया नियम – वैशिष्ट्ये, उद्देश आणि परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे

SEBI Social Media Disclosure Rule – Key Features, Purpose & Exam Notes
Subject : GS - अर्थशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडे सोशल मीडियावर गुंतवणूक संबंधित माहिती देताना ओळख उघड करणे अनिवार्य करणारे निर्देश कोणत्या संस्थेने जारी केले ?
1. RBI
2. NITI आयोग
3. वित्त मंत्रालय
4. SEBI
उत्तर : SEBI
📰 बातमी काय ?
• अलिकडे भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ (Securities and Exchange Board of India - SEBI) ने एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करून, सर्व नोंदणीकृत बाजार मध्यस्थांना (Market Intermediaries) सोशल मीडियावर गुंतवणूक संबंधित माहिती देताना आपले नोंदणीकृत नाव आणि नोंदणी क्रमांक अनिवार्यपणे दर्शविण्याचे निर्देश दिले आहेत.
🤔 हा निर्णय नेमका काय सांगतो ?
• या निर्देशानुसार, SEBI अंतर्गत नोंदणीकृत संस्था किंवा त्यांचे प्रतिनिधी सोशल मीडियावर कोणतीही गुंतवणूक किंवा शेअर बाजाराशी संबंधित माहिती देताना आपले नोंदणीकृत नाव आणि SEBI नोंदणी क्रमांक स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
• या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना अधिक विश्वासार्ह माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
🧐 हा नियम का आणण्यात आला ?
• सध्या सोशल मीडियावर अनेक अप्रमाणित (Unregistered) वित्तीय सल्लागार किंवा Influencer चुकीची माहिती देतात.
• त्यामुळे गुंतवणूकदारांची फसवणूक होण्याची शक्यता वाढते.
✍️ यावर उपाय म्हणून SEBI ने - अधिक पारदर्शकता, योग्य ओळख पडताळणी, विश्वासार्हता वाढवणे - या उद्देशाने हा नियम लागू केला आहे.
⚙️ या नियमाची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत ?
• हा नियम शेअर दलाल (Stockbrokers), म्युच्युअल फंड संस्था, गुंतवणूक सल्लागार, संशोधन विश्लेषक, पोर्टफोलिओ व्यवस्थापक (Portfolio Managers) इत्यादी सर्वांवर लागू होतो.
• सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये YouTube, Instagram, WhatsApp, Telegram, Facebook, X, LinkedIn यांसारख्या सर्व माध्यमांचा समावेश आहे, अगदी बंद ग्रुपमध्ये (Closed Groups) देखील हा नियम लागू आहे.
• जर एखाद्या संस्थेकडे एकापेक्षा जास्त नोंदणी असतील, तर सर्व नोंदणींची माहिती एका वेब लिंकद्वारे द्यावी लागते.
या निर्णयाचे महत्त्व काय आहे ?
• या नियमामुळे गुंतवणूकदारांना खऱ्या आणि नोंदणीकृत संस्थांची ओळख पटवणे सोपे होईल.
• चुकीच्या सल्ल्यांपासून संरक्षण मिळेल
• डिजिटल गुंतवणूक क्षेत्रात पारदर्शकता वाढेल
• वित्तीय व्यवहारांमध्ये विश्वासार्हता मजबूत होईल
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• SEBI → सोशल मीडिया disclosure नियम
• आवश्यक → नोंदणीकृत नाव + नोंदणी क्रमांक
• उद्देश → गुंतवणूकदार संरक्षण
• लागू → सर्व Market Intermediaries
• प्लॅटफॉर्म → YouTube ते WhatsApp (सर्व)
• समस्या → Fake Financial Influencers

























