
चालू घडामोडी | ऑपरेशन क्रॅकडाऊन

Operation Crackdown
Subject : GS - संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडे ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन (Operation Crackdown)’ हा उपक्रम कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केला आहे ?
1. महाराष्ट्र
2. कर्नाटक
3. गुजरात
4. तेलंगणा
उत्तर : तेलंगणा
📰 बातमी काय ?
• तेलंगणा पोलिसांनी ‘ऑपरेशन क्रॅकडाऊन (Operation Crackdown)’ हा विशेष उपक्रम सुरू केला आहे.
🤔 ‘ ऑपरेशन क्रॅकडाऊन (Operation Crackdown)’ म्हणजे नेमकं काय ?
• ‘Operation Crackdown’ ही एक समन्वित (Coordinated) सायबर गुन्हेगारीविरोधी मोहीम आहे.
• या मोहिमेद्वारे सायबर फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या “Mule Bank Accounts” वर कारवाई करून सायबर गुन्हेगारी नेटवर्क मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
म्युल खाती म्हणजे काय ?
What are Mule Bank Accounts ?
• म्युल खाती म्हणजे अशी बँक खाती ज्यांचा वापर गुन्हेगारांकडून बेकायदेशीर पद्धतीने पैसा (निधी) प्राप्त करण्यासाठी आणि वेगवेगळ्या अकाउंट मध्ये हस्तांतरित करण्यासाठी केला जातो.
• म्युल बॅंक खाती ही गुन्हेगारी संस्था आणि बेकायदा निधी यांच्यातील मध्यस्थ म्हणून काम करते.
• ही खाती सामान्यत: अशा व्यक्तींद्वारे उघडली जातात ज्यांना एकतर सहज पैसे देण्याचे आश्वासन देऊन फसवले जाते किंवा अशा व्यक्तींना सहभागी होण्यासाठी दबाव आणला जातो.
• नंतर त्यांच्या बँक खात्याचा वापर मनी लॉन्ड्रींग, बेकायदेशीर सट्टेबाजी, दुसऱ्या देशात व्यापार, कर चोरी
यांसारख्या बेकायदेशीर गोष्टींसाठी केला जातो.
🧐 ही मोहीम का आवश्यक आहे ?
• आजकाल सायबर गुन्ह्यांमध्ये खरे गुन्हेगार थेट समोर येत नाहीत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण होते.
• म्हणून पोलिसांनी नवा मार्ग स्वीकारला आहे — “पैशाचा मागोवा घ्या आणि संपूर्ण नेटवर्क मोडा”
💡 सोप्या शब्दात सांगायचे तर, - सायबर गुन्ह्यांमध्ये जो पैसा फिरतो, तो थांबवला तर गुन्हेगारी आपोआप कमी होते.
👉 म्हणजेच या मोहिमेचा मुख्य उद्देश सायबर गुन्ह्यांचा आर्थिक आधार (financial backbone) तोडणे हा आहे.
🤔 ही मोहीम कोण राबवते ?
• ही मोहीम तेलंगणाच्या - Telangana Cyber Security Bureau (TGCSB) द्वारे राबवली जात आहे.
• यामध्ये विविध सरकारी संस्था आणि बँकिंग यंत्रणा एकत्र काम करतात
⚙️ या मोहिमेची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत ?
• या मोहिमेत डेटा विश्लेषणाच्या मदतीने विविध राज्ये/क्षेत्रांमध्ये (Multiple Jurisdictions) सायबर गुन्ह्यांशी संबंधित 4,775 Mule Accounts ओळखण्यात आले.
• मोठ्या प्रमाणावर समन्वित कारवाई करत 137 पोलिस पथके आणि 500 पेक्षा जास्त कर्मचारी यांनी एकाच वेळी 16 जिल्ह्यांतील 137 बँक शाखांची तपासणी केली.
• KYC नोंदींची पडताळणी करून खातेधारक, एजंट आणि काही बँक अधिकाऱ्यांमध्ये संभाव्य संगनमत (Collusion) आहे का याची चौकशी करण्यात आली.
• या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश म्हणजे सायबर गुन्हेगारीच्या आर्थिक साखळी (Financial Network) मोडून काढणे हा आहे
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
✍️ ऑपरेशन क्रॅकडाऊन → सायबर गुन्हेगारीविरोधी विशेष मोहीम
📍 राज्य → तेलंगणा
🏢 अंमलबजावणी संस्था → तेलंगणा सायबर सुरक्षा ब्युरो
🎯 कार्य → सायबर फसवणुकीत वापरली जाणारी म्यूल (Mule) बँक खाती
💰 मुख्य फोकस → सायबर गुन्ह्यांची आर्थिक साखळी खंडित करणे



















