
चालू घडामोडी | महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता (MahaAgri-AI) धोरण

Maharashtra Agriculture-Artificial Intelligence (MahaAgri-AI) Policy
Subject : GS - अर्थशास्त्र - कृषी, सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न ) फेब्रुवारी 2026 मध्ये ‘जागतिक कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद’ कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली ?
1. मुंबई
2. पुणे
3. नागपूर
4. नाशिक
उत्तर : मुंबई
📰 बातमी काय ?
• ‘महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025–2029’ अंतर्गत फेब्रुवारी 2026 मध्ये मुंबई येथे ‘जागतिक कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’ आयोजित करण्यात आले.
• या परिषदेत जागतिक तज्ज्ञ, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार आणि वित्तीय संस्था सहभागी झाल्या.
🤔 महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता (MahaAgri-AI) धोरण 2025-2029’ काय आहे ?
• हे धोरण म्हणजे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक कार्यक्षम, शाश्वत आणि नफा देणारी बनवण्याचा एक महत्त्वाकांक्षी आराखडा आहे.
• 17 जून 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाने यास मंजुरी दिली
• कृषी क्षेत्रात AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
🤔 या धोरणाची मुख्य उद्दिष्टे काय आहेत ?
• शेतीची उत्पादकता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे
• हवामान बदलाशी जुळवून घेण्यासाठी डेटा-आधारित उपाययोजना करणे
• कृषी क्षेत्रात डिजिटल पायाभूत सुविधा (Digital Public Infrastructure) निर्माण करणे
🤖 या धोरणात शेतीसाठी कोणते तंत्रज्ञान वापरले जाते ?
1. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि जनरेटिव्ह AI (GenAI) : पीक देखरेख आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी.
2. ड्रोन आणि रोबोटिक्स : अचूक फवारणी आणि शेतीकामांच्या सुलभतेसाठी.
3. इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) : जमिनीतील ओलावा आणि इतर घटकांच्या रिअल-टाइम माहितीसाठी.
4. प्रिडिक्टिव ॲनालिटिक्स (Predictive Analytics) : हवामानाचा अंदाज आणि पीक नुकसानीचे पूर्वानुमान लावण्यासाठी.
⚙️ अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे प्रकल्प आणि भांडवल :
• महा-अॅग्रीस्टेक (Maha-AgriStack) : विविध कृषी डेटा एकत्र करण्यासाठी ही डिजिटल प्रणाली विकसित केली जाईल.
• अॅग्रो डेटा एक्सचेंज ( Agro Data Exchange (A-DeX)): सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील डेटाचे आदानप्रदान करण्यासाठी हा एक्सचेंज प्लॅटफॉर्म असेल.
• महावेध प्रकल्प : राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे (Automated Weather Stations) उभारून अचूक हवामान माहिती दिली जाईल.
• आर्थिक तरतूद : या धोरणाच्या सुरुवातीच्या अंमलबजावणीसाठी सुमारे ₹500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
🧐 शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होणार ?
• व्हर्च्युअल सल्लागार : चॅटबॉट आणि व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टमद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे स्थानिक भाषेत मिळतील.
• अचूक मार्गदर्शन : खतांचा वापर, फवारणीची वेळ आणि पीक नियोजनाबाबत अचूक माहिती मिळाल्याने उत्पादन खर्च कमी होईल.
• बाजारपेठ उपलब्धता : शेतमालाच्या ट्रेसिबिलिटी (Traceability) मुळे निर्यातीला आणि चांगल्या भावाला चालना मिळेल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : MahaAgri-AI धोरण
• फेब्रुवारी 2026, मुंबई → ‘जागतिक कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलन’
• धोरण → महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता (MahaAgri-AI) धोरण 2025-2029’
• मंजुरी → 17 जून 2025
• आर्थिक तरतूद → ₹500 कोटी
• प्रमुख प्रकल्प → Maha-AgriStack, A-DeX, महावेध



















