
चालू घडामोडी | कार्बन कॅप्चर, उपयोग आणि साठवण तंत्रज्ञान
Carbon Capture and Utilisation (CCU) Technologies
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडील केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये औद्योगिक कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी ₹20,000 कोटींची तरतूद कोणत्या प्रकारच्या तंत्रज्ञानासाठी करण्यात आली आहे ?
1. हरित हायड्रोजन तंत्रज्ञान
2. कार्बन कॅप्चर, उपयोग आणि साठवण तंत्रज्ञान
3. सौर ऊर्जा साठवण प्रणाली
4. जैवइंधन उत्पादन तंत्रज्ञान
उत्तर : कार्बन कॅप्चर, उपयोग आणि साठवण तंत्रज्ञान
📰 बातमी काय ?
• केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये पुढील पाच वर्षांसाठी कार्बन कॅप्चर, उपयोग आणि साठवण (Carbon Capture, Utilisation, and Storage - CCUS) तंत्रज्ञानाच्या विस्तारासाठी सुमारे ₹20,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
• याचा उद्देश औद्योगिक क्षेत्रातील कार्बन उत्सर्जन कमी करून पर्यावरणपूरक विकासाला चालना देणे हा आहे.
🤔 कार्बन कॅप्चर व उपयोग (CCU) म्हणजे नेमकं काय ?
• कार्बन कॅप्चर व उपयोग (Carbon Capture and Utilisation - CCU) ही अशी तंत्रज्ञान प्रणाली आहे ज्यामध्ये औद्योगिक स्रोतांमधून किंवा वातावरणातून कार्बन डायऑक्साइड (CO₂) वेगळा करून त्याचे विविध प्रक्रियांद्वारे उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतर केले जाते.
👉 म्हणजेच CO₂ ला कचरा न मानता संसाधन (resource) म्हणून वापरले जाते.
🧐 ही प्रक्रिया कशी कार्य करते ?
👉 ही प्रक्रिया तीन महत्त्वाच्या टप्प्यांत पार पडते :
1. पकड (Capture) : औद्योगिक वायू किंवा वातावरणातून CO₂ इतर वायूंमधून वेगळा केला जातो
2. दाब व वाहतूक (Compression & Transport) : CO₂ ला द्रवरूपासारख्या स्थितीत दाबून पाइपलाइन किंवा टँकरद्वारे वाहतूक केली जाते.
3. उपयोग/रूपांतरण (Utilisation) : CO₂ चे रासायनिक, जैविक किंवा भौतिक प्रक्रियेद्वारे उपयुक्त उत्पादनांमध्ये रूपांतर केले जाते.
🤔 CCU चे प्रकार कोणते आहेत ?
• थेट उपयोग (Direct Utilisation): CO₂ चा थेट वापर (उदा. कार्बोनेटेड पेये, तेल उत्खनन)
• रासायनिक रूपांतरण (Chemical Conversion): CO₂ पासून रसायने किंवा इंधन तयार करणे (उदा. युरिया, मेथेनॉल)
• जैविक रूपांतरण (Biological Conversion): शैवाल/जीवाणूंच्या मदतीने CO₂ चे जैवउत्पादन जसे की जैवइंधन किंवा जनावरांचे खाद्य तयार करण्यासाठी.
• खनिजीकरण (Mineralisation): CO₂ ला खनिजांशी प्रतिक्रिया देऊन विटा किंवा ग्रीन काँक्रीट तयार करणे

🧐 या तंत्रज्ञानाचा उद्देश काय आहे ?
• कार्बनला टाकाऊ न समजता त्याचा कच्चा माल म्हणून वापर करून, CO₂ उत्सर्जन वाढू न देता आर्थिक विकास साधणे.
• उद्योगांना नेट झिरो उद्दिष्ट गाठण्यास मदत करणे आणि चक्रीय कार्बन अर्थव्यवस्था निर्माण करणे — हे CCU चे मुख्य ध्येय आहे.
⚙️ या तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये आणि उपयोग :
• विद्यमान औद्योगिक प्रकल्पांमध्येही (Retrofit) बसवता येते
• कचऱ्याचा पुनर्वापर करून चक्रीय अर्थव्यवस्थेला चालना मिळते
• विविध क्षेत्रांमध्ये उपयोग (उड्डाण, बांधकाम, शेती)
• CO₂ पासून उत्पादने तयार करून आर्थिक मूल्य निर्माण होते
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
⭐ अर्थसंकल्प 2026 → ₹20,000 कोटी (CCUS विस्तारासाठी)
🌍 CCU → CO₂ पकडून त्याचा उपयोग करणे
⚙️ प्रक्रिया → पकड (Capture) → दाब व वाहतूक → उपयोग (Utilisation)
🔬 प्रकार → थेट उपयोग, रासायनिक, जैविक, खनिजीकरण
🎯 उद्देश → Net Zero + चक्रीय अर्थव्यवस्था




















