
चालू घडामोडी | जागतिक श्रवण दिन

World Hearing Day
Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक श्रवण दिन केव्हा साजरी करतात ?
1. 13 ऑगस्ट
2. 3 मार्च
3. 28 फेब्रुवारी
4. 2 जानेवारी
उत्तर : 3 मार्च
बातमी काय आहे ?
• जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) 3 मार्च 2026 रोजी जागतिक श्रवण दिन म्हणजेच World Hearing Day आयोजित केला.
जागतिक श्रवण दिना बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• बहिरेपणा आणि श्रवणशक्ती कमी होण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि श्रवण आरोग्याची काळजी ला प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक श्रवण दिन हा दिवस दरवर्षी 3 मार्च रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो.
• बहिरेपणा आणि श्रवणशक्ती कमी होणे (ऐकू कमी येणे) कसे रोखायचे आणि कानाची काळजी कशी घ्यावी याबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस समर्पित आहे.
• WHO च्या मते, जगभरात 46.6 कोटींहून अधिक लोक श्रवणशक्तीच्या समस्येने ग्रस्त आहेत, ही संख्या 2050 पर्यंत 90 कोटींपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.
• 60 ते 65 डेसिबल पर्यंतचा आवाज मानवी कानांसाठी योग्य असतो.
• या पातळीपेक्षा जास्त आवाज कानांना नुकसान पोहोचवू शकतो.
• 100 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या अचानक संपर्कात आल्याने तात्काळ बहिरेपणा येऊ शकतो.
जागतिक श्रवण दिन 2026 ची संकल्पना ( थीम ) काय आहे ?
• जागतिक श्रवण दिन 2026 ची संकल्पना (थीम) "समुदायांपासून वर्गांपर्यंत : सर्व मुलांसाठी श्रवण काळजी" (From Communities to Classrooms: Hearing Care for All Children) ही आहे.
• जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यावर्षीच्या मोहिमेत विशेषतः मुलांच्या श्रवण आरोग्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

🎯 या संकल्पनेचे मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहेत :
• बालपणीचा बहिरेपणा रोखणे : मुलांमध्ये टाळता येण्याजोगा श्रवणदोष कमी करण्यासाठी जनजागृती करणे.
• लवकर ओळख आणि उपचार : कानाच्या समस्यांचे वेळीच निदान करून मुलांवर योग्य उपचार सुनिश्चित करणे.
• शाळा आणि समुदायांचा सहभाग : मुलांच्या आरोग्यासाठी शाळा आणि स्थानिक समुदायांना श्रवण काळजी कार्यक्रमांशी जोडणे, जेणेकरून मुले अडथळ्यांविना शिकू शकतील आणि प्रगती करू शकतील.
























