
चालू घडामोडी | नायसेरिया मेनिन्जिटिडिस

Neisseria Meningitidis
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडे एका सैनिकी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थींच्या मृत्यूशी संबंधित संसर्गाच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा :
अ) हा संसर्ग नायसेरिया मेनिन्जिटिडिस (Neisseria Meningitidis) या जीवाणूमुळे होतो
ब) हा संसर्ग नायसेरिया मेनिन्जिटिडिस (Neisseria Meningitidis) या विषाणूमुळे होतो
क) हा संसर्ग मुख्यतः हवेतील तुषारांद्वारे पसरतो
योग्य पर्याय निवडा :
1. फक्त अ
2. फक्त ब
3. फक्त अ आणि क
4. फक्त ब आणि क
उत्तर : फक्त अ आणि क
बातमी काय ?
• मेघालय राज्याने शिलाँग येथील Assam Regimental Centre मध्ये दोन अग्निवीर प्रशिक्षणार्थींच्या मृत्यूनंतर उच्चस्तरीय आरोग्य सल्ला (Health Advisory) जारी केला.
• प्राथमिक तपासात हा मृत्यू मेनिंगोकोकल जीवाणू संसर्गामुळे (Meningococcal infection) झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
🦠 मेनिन्गोकोकल संसर्ग म्हणजे काय ?
कारक (Pathogen):
• हा आजार 'नायसेरिया मेनिन्जिटिडिस' (Neisseria Meningitidis) या जीवाणूमुळे (Bacteria) होतो.
प्रकार :
• हा एक गंभीर संसर्ग असून तो प्रामुख्याने मेंदूच्या आवरणाला (Meninges) सूज आणतो, ज्याला 'मेनिंजायटिस' म्हणतात.
• जर हा संसर्ग रक्तात पसरला, तर त्याला 'मेनिन्गोकोसेमिया' म्हणतात.
प्रसार :
• हा आजार हवेतील तुषारांद्वारे (Respiratory Droplets), म्हणजे खोकणे, शिंकणे किंवा जवळच्या संपर्कातून पसरतो.
✍️ मुख्य लक्षणे (Symptoms) :
• अतिशय जास्त ताप आणि तीव्र डोकेदुखी.
• मान जखडणे (Stiff Neck) -हे या आजाराचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
• उजेडाचा त्रास होणे (Photophobia).
• उलट्या होणे आणि गोंधळलेली अवस्था (Confusion).
🦠 संसर्गाचा धोका कोणाला ?
1) दाट लोकवस्तीत राहणारे लोक :
• लष्करी छावण्या (Barracks), वसतिगृहे (Hostels), आणि तुरुंग अशा ठिकाणी राहणाऱ्यांना धोका जास्त असतो (उदा. शिलाँगची 'अग्निवीर' घटना).
2) वयोगट :
• 5 वर्षांखालील लहान मुले आणि 15 ते 24 वयोगटातील तरुण.
3) प्रवास :
• ज्या देशांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणावर आहे (उदा. आफ्रिकेतील 'मेनिंजायटिस बेल्ट'), तिथे प्रवास करणाऱ्यांना.
4) कमकुवत प्रतिकारशक्ती :
• ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती (Immunity) कमी आहे, त्यांना संसर्गाचा धोका सर्वाधिक असतो.
💉 लस (Vaccine) –
• जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शिफारस केलेली मेनिन्जायटीस लस, Men5CV, ही मेनिन्जोकोकल मेनिन्जायटीसच्या पाच मुख्य कारणांपासून संरक्षण देणारी पहिली कॉन्जुगेट लस आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• शिलाँग (मेघालय) – अग्निवीर प्रशिक्षणार्थी मृत्यू घटना (2026)
• ठिकाण → Assam Regimental Centre
• कारण → मेनिंगोकोकल जीवाणू संसर्ग (Meningococcal Infection)
• प्रसार → खोकणे, शिंकणे व जवळचा संपर्क
• मुख्य लक्षण → मान जखडणे (Stiff Neck)


















