
चालू घडामोडी | राष्ट्रीय सुरक्षा दिन

National Safety Day
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिन केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 28 फेब्रुवारी
2. 4 मार्च
3. 8 मार्च
4. 12 मार्च
उत्तर : 4 मार्च
राष्ट्रीय सुरक्षा दिन (National Safety Day) बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• दरवर्षी 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला जातो.
• 4 मार्च ते 10 मार्च हा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा केला जातो.
• 2026 या वर्षी आपण 55 वा राष्ट्रीय सुरक्षा दिन/राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा करत आहोत.
राष्ट्रीय सुरक्षा दिन का साजरी केला जातो ?
• सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षा आणि सावधगिरीच्या उपायांचे महत्त्व सांगण्यासाठी
• कामाच्या ठिकाणी सुरक्षा तसेच सुरक्षित वातावरणाची खात्री करण्यासाठी,
• सुरक्षा उपायांचे समर्थन करण्यासाठी आणि या प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी
• तसेच लोकांमध्ये यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो.
राष्ट्रीय सुरक्षा दिवस 4 मार्चलाच का साजरी करतात ?
• 4 मार्च 1966 रोजी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची (National safety Council) स्थापना करण्यात आली.
• या दिवसाचे महत्व ओळखून दरवर्षी 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला जातो.
राष्ट्रीय सुरक्षा दिन केव्हापासून साजरी करण्यात सुरुवात झाली ?
पहिला राष्ट्रीय सुरक्षा दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• 4 मार्च 1972 रोजी पहिला राष्ट्रीय सुरक्षा दिवस साजरी करण्यात आला.
राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2026 ची संकल्पना (थीम ) काय आहे ?
• "सुरक्षा वाढवण्यासाठी लोकांना सहभागी करा, शिक्षित करा आणि सक्षम करा" ("Engage, Educate & Empower People to Enhance Safety") ही राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2026 ची संकल्पना आहे.





















