
चालू घडामोडी | रायसीना संवाद 2026
Raisina Dialogue 2026
Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडे नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘रायसीना संवाद 2026’ (Raisina Dialogue 2026) च्या संदर्भात खालीलपैकी योग्य विधान ओळखा :
1. हा भारताचा प्रमुख बहुपक्षीय भू-राजकीयआणि भू-अर्थशास्त्रावरील संवाद मंच आहे
2. हा कार्यक्रम संयुक्त राष्ट्र संघ आयोजित करतो
3. हा दर 5 वर्षांनी आयोजित केला जातो
4. हा केवळ आशियाई देशांपुरता मर्यादित आहे
उत्तर : हा भारताचा प्रमुख बहुपक्षीय भू-राजकीयआणि भू-अर्थशास्त्रावरील संवाद मंच आहे
📰 बातमी काय ?
• भारताचे पंतप्रधान यांनी 5 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे ‘रायसीना संवाद 2026’ चे उद्घाटन केले.
• या परिषदेत फिनलँड चे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब (Alexander Stubb) प्रमुख पाहुणे होते.

रायसीना संवाद म्हणजे काय ?
• रायसीना संवाद हा भारताचा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय मंच आहे.
• रायसीना संवाद ही भारतीय दृष्टिकोनातून भू-राजकीय (Geopolitics) आणि भू-अर्थशास्त्रावरील (Geo-Economics) एक प्रमुख परिषद आहे.
• रायसीना संवाद जागतिक नेते, धोरणकर्ते, शिक्षणतज्ज्ञ, उद्योग तज्ञ या क्षेत्रांतील तज्ञांना आंतरराष्ट्रीय समुदायासमोरील सर्वात आव्हानात्मक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि संवाद आणि वादविवादाद्वारे त्यांचे निराकरण करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते.
• उदाहरणार्थ - यात युद्ध, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, हवामान बदल यांसारख्या विषयांवर चर्चा होते.
रायसीना संवाद कोण आणि कोण आयोजित केला जातो ?
• ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ORF) च्या सहकार्याने भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाद्वारे (Ministry of External Affairs) दरवर्षी रायसीना संवाद आयोजित केले जातो.
पहिला रायसीना संवाद केव्हा आयोजित करण्यात आला ?
• पहिला रायसीना संवाद 2016 मध्ये आयोजित करण्यात आला होता आणि तेव्हापासून दरवर्षी हा संवाद आयोजित केला जातो.
या व्यासपीठाला रायसीना संवाद का म्हटले जाते ?
• या संवादाचे नाव नवी दिल्लीतील रायसीना टेकडी (Raisina Hills) वरून ठेवण्यात आले आहे.
• रायसीना हिल्स हे सामान्यतः भारत सरकारच्या सत्तेचे केंद्र मानले जाते.
• हे नवी दिल्लीतील एक क्षेत्र आहे, जिथे भारतातील काही महत्त्वाच्या इमारती आहेत.
• रायसीना टेकडीवर भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.
• तसेच भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान असलेले राष्ट्रपती भवन आणि सचिवालय इमारत, ज्यामध्ये पंतप्रधान कार्यालय आणि इतर अनेक महत्त्वाची मंत्रालये येथेच आहेत.
🌍 रायसीना संवाद भारतासाठी का महत्त्वाचा आहे ?
• हा मंच भारतासाठी जागतिक पातळीवर आपली भूमिका मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
✍️ यामुळे भारत -
• जागतिक धोरणात्मक चर्चांमध्ये सक्रिय भूमिका घेतो
• इतर देशांशी सहकार्य वाढवतो
• स्वतःला “Global Leader” म्हणून सादर करतो
👉 म्हणूनच याची तुलना म्युनिक सुरक्षा परिषद (Munich Security Conference) सारख्या मोठ्या जागतिक परिषदांशी केली जाते.
🧩 रायसीना संवाद 2026 – प्रमुख वैशिष्ट्ये
• 11 वे संस्करण (11th Edition)
• कालावधी → 5 ते 7 मार्च 2026
• सुमारे 110 देशांतील 2700 प्रतिनिधी सहभागी
• चर्चेचे प्रकार → Panel Discussion + Closed-Door Meetings
2026 च्या 11 व्या रायसीना संवाद कार्यक्रमाची संकल्पना (थीम) काय आहे ?
• " संस्कार - प्रतिपादन, समायोजन आणि प्रगती " ("Samskara – Assertion, Accommodation, Advancement,") ही 11 व्या रायसीना संवादाची संकल्पना आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : रायसीना संवाद 2026
• रायसीना संवाद → भारताचा प्रमुख बहुपक्षीय मंच
• सुरुवात → 2016
• आयोजक → Observer Research Foundation + MEA
• ठिकाण → नवी दिल्ली
• 2026 → 11वे संस्करण
• प्रमुख पाहुणे → फिनलँड चे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब
• Theme 2026 → " संस्कार - प्रतिपादन, समायोजन आणि प्रगती "


















