
चालू घडामोडी | 16व्या शतकातील कांस्य मूर्ती भारतात परत

16th Century Bronze Statue Returned to India
Subject : GS - प्राचीन इतिहास - कला आणि संस्कृती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच, इंग्लंडमधील अश्मोलियन संग्रहालयाने --------- यांची 16 व्या शतकातील कांस्य मूर्ती भारताला परत केली आहे.
1. संत थिरुमंगाई अल्वार
2. संत थिरुज्ञान संबंदर
3. रामानुजाचार्य
4. आदि शंकराचार्य
उत्तर : संत थिरुमंगाई अल्वार (Saint Thirumangai Alvar)
📰 बातमी काय ?
• अलीकडेच, इंग्लंडमधील अश्मोलियन संग्रहालयाने (Ashmolean Museum) संत थिरुमंगाई अल्वार (Saint Thirumangai Alvar) यांची 16 व्या शतकातील कांस्य मूर्ती भारताला परत केली आहे.
मूळ ठिकाण :
• ही मूर्ती तामिळनाडूतील दिंडीगुल जिल्ह्यातील, श्री सौंदराज पेरुमल मंदिरातील (Soundararaja Perumal Temple) आहे, हे संशोधनातून स्पष्ट झाले.
• ही ओळख India Pride Project या संस्थेने 1957 मधील French Institute of Pondicherry च्या छायाचित्रांशी तुलना करून पटवून दिली.

संत थिरुमंगाई अल्वार कोण होते ?
• संत थिरुमंगाई अल्वार हे अल्वार संतांपैकी 12 वे आणि शेवटचे संत मानले जातात.
• अल्वार हे तामिळ कवी-संत होते, ज्यांनी भगवान विष्णूच्या भक्तीला आपले जीवन अर्पण केले.
• त्यांचा काळ साधारण 8 व्या शतकातील असून वैष्णव परंपरेत त्यांना विशेष स्थान आहे.
⚔️ प्रारंभीचे जीवन – योद्धा ते संत
• संत थिरुमंगाई अल्वार यांचे मूळ नाव ‘कालियन’ होते.
• ते कालार समुदायात (kallar community) जन्मले आणि चोल साम्राज्यात लष्करी सेनापती म्हणून काम केले.
• त्यामुळे त्यांना “थिरुमंगाई मन्नन” ही उपाधी मिळाली.
• ते एक कुशल धनुर्धर (Archer) होते. पण पुढे त्यांच्या जीवनात आध्यात्मिक परिवर्तन होऊन ते भक्तीमार्गाकडे वळले.
📜 साहित्यिक योगदान :
• संत थिरुमंगाई अल्वार यांना “नर्कवि पेरुमळ” (उत्कृष्ट कवी) असेही म्हटले जाते.
• त्यांनी 1000 पेक्षा अधिक भक्तीपर पदे लिहिली.
✍️ त्यांच्या प्रमुख रचनांमध्ये -
• पेरिया तिरुमडल (Periya Thirumadal)
• तिरुनेदुनतांडकम (Thiruneduntandakam)
• तिरुकुरुनतांडकम (Thirukuruntandakam)
• सिरीया तिरुमडल (Siriya Thirumadal)
✍️ ही सर्व रचना ‘नालयिर दिव्य प्रबंधम्’ (Nalayira Divya Prabandham) या पवित्र ग्रंथाचा भाग आहेत.
🛕 मंदिर व धार्मिक योगदान
• त्यांनी श्रीरंगम मंदिराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
• असे मानले जाते की त्यांनी 108 दिव्य देशम् (Divya Desams) या विष्णूच्या पवित्र मंदिरांना भेट दिली.
• तसेच त्यांनी श्री रंगनाथ स्वामी मंदिराच्या भिंती बांधण्यातही योगदान दिले आणि भगवान रंगनाथावर स्तोत्रे लिहिली.
🌟 आध्यात्मिक महत्त्व :
• संत थिरुमंगाई अल्वार यांना विष्णूच्या “शारंग धनुष्याचे अवतार” मानले जाते.
• त्यांच्या जीवनातून भौतिक जीवनातून भक्तीकडे झालेल्या परिवर्तनाचा संदेश मिळतो.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• संत थिरुमंगाई अल्वार → अल्वार संतांपैकी 12 वे आणि शेवटचे संत
• अल्वार → हे तामिळ कवी-संत
• पंथ → वैष्णव पंथ (भगवान विष्णू भक्ती)
• काळ → साधारण 8 व्या शतकातील


















