
चालू घडामोडी | आईकडून बाळाकडे होणाऱ्या HIV आणि सिफिलिस संक्रमणाचे निर्मूलन करणारा देश
A Country that has eliminated Mother-to-Child transmission of HIV and syphilis
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) युरोपियन युनियनमधील आईकडून बाळाकडे होणाऱ्या HIV आणि सिफिलिस संक्रमणाचे निर्मूलन करणारा पहिला देश कोणता ?
1. स्वीडन
2. डेन्मार्क
3. नॉर्वे
4. फिनलंड
उत्तर : डेन्मार्क
📰 बातमी काय ?
• डेन्मार्कला🇩🇰 World Health Organization कडून आईकडून बाळाकडे होणाऱ्या HIV आणि सिफिलिस संक्रमणाच्या निर्मूलनासाठी प्रमाणपत्र मिळाले आहे.
• त्यामुळे डेन्मार्क हा युरोपियन युनियनमधील पहिला देश ठरला आहे.

आईकडून बाळाकडे होणाऱ्या HIV आणि सिफिलिस संक्रमण आणि त्याचे निर्मूलना -
• आईला जर HIV किंवा सिफिलिसचा संसर्ग असेल, तर तो बाळालाही होऊ शकतो.
• हा संसर्ग प्रामुख्याने तीन वेळा होतो — बाळ आईच्या पोटात असताना, जन्माच्या वेळी किंवा स्तनपान करताना.
✍️ उदाहरणार्थ - एखादी गर्भवती महिला HIV पॉझिटिव्ह असेल आणि तिची वेळेवर तपासणी झाली नाही, तर बाळालाही तो संसर्ग होऊ शकतो.
• पण जर वेळेवर तपासणी करून औषधे दिली, तर बाळ पूर्णपणे सुरक्षित जन्माला येऊ शकते.
• म्हणूनच गर्भवती महिलांची नियमित तपासणी, संसर्ग चाचणी आणि योग्य उपचार ही या संपूर्ण प्रक्रियेची किल्ली आहे.
📊 WHO हे यश कसं मोजतं ?
✍️ जागतिक आरोग्य संघटनेचे (World Health Organization) यासाठी स्पष्ट निकष दिले आहेत. -
• आईकडून बाळाकडे संसर्ग दर 1 लाख जन्मांमागे 50 पेक्षा कमी असावा.
• 95% पेक्षा जास्त गर्भवती महिलांची तपासणी आणि उपचार झालेले असावेत.
• तरच त्या देशाला संक्रमणाच्या निर्मूलनासाठी प्रमाणपत्र दिले जाते.
🌍 संक्रमणाच्या निर्मूलनाचे महत्त्व -
• हे यश म्हणजे पुढील पिढीला गंभीर आजारांपासून वाचवणे होय.
• त्यामुळे बालमृत्यू कमी होतो आणि आरोग्यदायी समाज तयार होतो.
🔗 HIV आणि सिफिलिस बद्दल थोडक्यात माहिती :
🦠 HIV -
• HIV म्हणजे असा विषाणू आहे जो शरीराची रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू कमी करतो.
• म्हणजेच शरीराला आजारांशी लढण्याची ताकद कमी होते.
• जर उपचार घेतले नाहीत, तर पुढे AIDS होऊ शकतो.
🦠 सिफिलिस -
• सिफिलिस हा एक जीवाणूमुळे होणारा आजार आहे.
• सुरुवातीला तो साधा वाटतो, पण वेळेवर उपचार न घेतल्यास हृदय आणि मेंदूसारख्या महत्त्वाच्या अवयवांवर गंभीर परिणाम करू शकतो.
WHO ची स्ट्रॅटर्जी -
• यासाठीच World Health Organization “Triple Elimination Strategy” राबवते.
• यात तीन संसर्गांवर एकत्रित नियंत्रण ठेवले जाते — HIV, सिफिलिस आणि हेपेटायटिस B.
• उदाहरणार्थ - गर्भवती महिलेची एकाच वेळी या तिन्ही आजारांसाठी तपासणी केली, तर भविष्यात बाळाला होणारा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : HIV + सिफिलिस संक्रमण
• HIV + सिफिलिस - आईकडून बाळाकडे संक्रमण → (गर्भावस्था + प्रसूती + स्तनपान)
• डेन्मार्क → संक्रमणाच्या निर्मूलन करणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश
• प्रमाणपत्र देणारी संस्था → World Health Organization
• मुख्य फोकस → गर्भवती महिलांची वेळेवर तपासणी + उपचार
• HIV → रोगप्रतिकारक शक्ती कमी करणारा विषाणू
• सिफिलिस → Treponema Pallidum जीवाणूमुळे होणारा आजार
• WHO Strategy → Triple Elimination (HIV + सिफिलिस + हेपेटायटिस B)


















