
चालू घडामोडी | खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026

Khelo India Tribal Games
Subject : GS - खेळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पहिली ‘खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026’ स्पर्धा कोठे आयोजित करण्यात येणार आहे ?
1. दिल्ली
2. महाराष्ट्र
3. छत्तीसगड
4. आंध्र प्रदेश
उत्तर : छत्तीसगड
📰 बातमी काय ?
• युवा व्यवहार व क्रीडा मंत्र्यांनी जाहीर केले की ‘खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026’ चे आयोजन छत्तीसगडमध्ये 25 मार्च ते 6 एप्रिल 2026 दरम्यान करण्यात येणार आहे.
• हा भारतातील पहिलीच (First-Ever) राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा आहे जी फक्त आदिवासी खेळाडूंकरिता आयोजित केला जात आहे.
‘खेलो इंडिया ट्रायबल गेम्स’ :
• ‘खेलो इंडिया ट्रायबल गेम्स’ हा एक विशेष क्रीडा उपक्रम आहे जो आदिवासी भागातील खेळाडूंना संधी देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.
• दुर्गम आदिवासी भागात अनेक खेळाडू चांगले खेळतात, पण त्यांना योग्य प्रशिक्षण आणि मंच मिळत नाही.
• ही स्पर्धा त्यांना राष्ट्रीय स्तरावर येण्याची संधी देते.
पहिल्या ‘खेलो इंडिया ट्रायबल गेम्स आयोजन कुठे करण्यात येणार आहे ?
• यजमान राज्य → छत्तीसगड
• प्रमुख ठिकाणे → रायपूर, जगदलपूर आणि सरगुजा
🏅 कोणते खेळ समाविष्ट आहेत ?
• या स्पर्धेत विविध खेळांचा समावेश करण्यात आला आहे.
1) पदक स्पर्धा (Medal Sports -7) :
• अॅथलेटिक्स, फुटबॉल, हॉकी, वेटलिफ्टिंग, आर्चरी, स्विमिंग, कुस्ती
2) प्रात्यक्षिक खेळ (Demonstration Sports -2) :
• मल्लखांब आणि कबड्डी
🎯 याचा मुख्य उद्देश काय आहे ?
• या स्पर्धेमागचा मुख्य हेतू म्हणजे आदिवासी युवकांमधील क्रीडा प्रतिभा ओळखणे आणि विकसित करणे.
यामुळे -
• अधिकाधिक युवक खेळाकडे वळतील
• ग्रामीण आणि आदिवासी भागातील खेळाडूंना संधी मिळेल
• भारताला भविष्यात चांगले खेळाडू मिळतील
ही स्पर्धा का महत्त्वाचं आहे ?
• ही स्पर्धा केवळ क्रीडा कार्यक्रम नसून सामाजिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे.
• आदिवासी समाजाचा सशक्तीकरण (Empowerment)
• सामाजिक समावेशन (Inclusion) वाढवणे
• दुर्गम भागातील प्रतिभेला ओळख मिळवून देणे
👉 म्हणूनच हा उपक्रम “विकसित भारत 2047” या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे
‘खेलो इंडिया’ योजनेबद्दल थोडक्यात माहिती :
‘खेलो इंडिया’ ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना आहे जी देशात क्रीडा संस्कृती वाढवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
• या अंतर्गत विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात ज्यातून नवीन खेळाडू शोधले जातात.
👉 ‘खेलो इंडिया’ उपक्रमाला 2020 मध्ये “राष्ट्रीय महत्त्वाचा कार्यक्रम” (Event of National Importance) म्हणून घोषित करण्यात आले आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• खेलो इंडिया ट्रायबल गेम्स → पहिल्यांदाच आयोजित (First-ever)
• यजमान राज्य → छत्तीसगड
• कालावधी → 25 मार्च ते 6 एप्रिल 2026
• सहभागी → फक्त आदिवासी खेळाडू
• प्रमुख उद्देश → प्रतिभा शोध + क्रीडा प्रोत्साहन
• उपक्रम → खेलो इंडिया योजना अंतर्गत


















