
चालू घडामोडी | भारताचा सागरी खाद्यपदार्थ निर्यात विक्रम
India’s Seafood Exports Reached an All-time High
📚 Subject : GS - अर्थशास्त्र - व्यापार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) आर्थिक वर्ष 2025-26 मधील भारतीय सागरी खाद्यपदार्थांचा जगातील सर्वात मोठा आयातदार (खरेदीदार) देश _________ हा ठरला आहे.
- अमेरिका
- जपान
- इराण
- फ्रान्स
उत्तर : अमेरिका
📰 बातमी काय ?
• आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची सागरी खाद्यपदार्थ (Seafood) निर्यात वजन आणि मूल्य या दोन्ही बाबतीत आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर (All-time High) पोहोचली आहे.
• जागतिक बाजारपेठेतील आव्हानात्मक परिस्थिती असूनही भारताने हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे.
🎯 परकीय व्यापारातील ऐतिहासिक आकडेवारी :
• एकूण निर्यात मूल्य - आर्थिक वर्ष 2025-26 दरम्यान भारताची एकूण सागरी खाद्यपदार्थ निर्यात 8.46 अब्ज अमेरिकन डॉलर्स (USD 8.46 Billion) वर पोहोचली आहे.
• एकूण वजन (Volume) - भारताने या वर्षात एकूण 19.72 लाख मेट्रिक टन (MT) सागरी अन्नाची यशस्वी परदेशात निर्यात केली आहे.
🚢 प्रमुख निर्यात श्रेणी (Top Export Categories):
परदेशात पाठवल्या जाणाऱ्या सागरी अन्नामध्ये खालील उत्पादनांचा वाटा सर्वाधिक आहे:
1) प्रथम क्रमांक : गोठवलेले कोळंबी (Frozen Shrimp) - भारताच्या एकूण सागरी अन्न निर्यातीमध्ये गोठवलेल्या कोळंबीचा वाटा सर्वाधिक आहे.
एकूण परकीय चलनापैकी जवळपास दोन-तृतीयंश (2/3) वाटा एकट्या गोठवलेले कोळंबी या घटकाचा आहे.
2) द्वितीय क्रमांक : गोठवलेले मासे (Frozen Fish) - हा निर्यातीमधील दुसरा सर्वात मोठा प्रवर्ग ठरला आहे.
3) तृतीय क्रमांक : वाळवलेले सागरी खाद्यपदार्थ (Dried Seafood) - हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्रवर्ग आहे. विशेष म्हणजे, वाळवलेल्या सागरी अन्न उत्पादनांच्या निर्यातीने रुपयाच्या मूल्याच्या दृष्टीने तब्बल 78.05% ची अफाट वाढ नोंदवली आहे.
🤝 प्रमुख आयातदार देश (Top Export Destinations):
• भारतातून सागरी अन्न खरेदी करणारे जगातले सर्वात मोठे देश खालीलप्रमाणे आहेत:
1) अमेरिकन बाजारपेठ (United States) - भारतीय गोठवलेल्या कोळंबीचा आणि एकूण सागरी अन्नाचा जगातील सर्वात मोठा आयातदार देश अमेरिका आहे.
2) चीन (China) - या यादीमध्ये चीन हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.
3) युरोपियन युनियन (European Union) - निर्यात बाजारपेठेत तिसरा मोठा वाटा युरोपियन युनियनचा आहे.
⛳️ अव्वल कामगिरी करणारे प्रमुख 3 भारतीय बंदरे (Top 3 Ports):
• आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये सर्वाधिक सागरी अन्न माल हाताळणारी (Handling Cargo) भारतातील पहिली 3 बंदरे अनुक्रमे खालीलप्रमाणे आहेत :
1) विशाखापट्टणम बंदर (Visakhapatnam Port - आंध्र प्रदेश)
2) जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT - मुंबई, महाराष्ट्र)
3) कोची बंदर (Kochi Port - केरळ)

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : भारताचा सागरी खाद्यपदार्थ निर्यात विक्रम
• सागरी खाद्यपदार्थ निर्यातीचे विक्रमी मूल्य (FY 2025-26) → 8.46 अब्ज अमेरिकन डॉलर्स
• एकूण निर्यातीचे वजन (Volume) → 19.72 लाख मेट्रिक टन (MT)
• निर्यातीत सर्वाधिक वाटा असणारा घटक → गोठवलेली कोळंबी (Frozen Shrimp - २/३ वाटा)
• भारतातून सर्वाधिक आयात करणारा देश → युनायटेड स्टेट्स (USA)
• सागरी मालवाहतूक हाताळणारे अव्वल बंदर → विशाखापट्टणम बंदर



















