
चालू घडामोडी | मिशन "सेनेहजोरी"
Mission Senehjori
📚 Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम, अर्थशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) केंद्र सरकार आणि आसाम सरकारने संयुक्तपणे सुरू केलेले मिशन "सेनेहजोरी" (Mission Senehjori) खालीलपैकी कोणत्या उत्पादनाच्या जागतिक ब्रँडिंग आणि विकासाशी संबंधित आहे ?
1. आसामी चहा
2. बांबू हस्तकला
3. मुगा रेशीम
4. एकशिंगी गेंडा संवर्धन
उत्तर : मुगा रेशीम (Muga Silk)
📰 बातमी काय ?
• केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनी संयुक्तपणे 'मिशन सेनेहजोरी' (Mission Senehjori) या विशेष मोहिमेचे उद्घाटन केले.
• अधिकृत सुरुवात: या मिशनची अधिकृत सुरुवात 2 जून 2026 रोजी करण्यात आली असून, हा ईशान्य भारताच्या स्वावलंबनासाठीचा ('आत्मनिर्भर नॉर्थ ईस्ट') एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

🧐 मिशन "सेनेहजोरी" नेमकं काय आहे ?
• आसाममधील प्रसिद्ध 'मुगा रेशीम' (Muga Silk) उत्पादक शेतकरी आणि विणकरांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू केलेली एक मोठी आर्थिक व वस्त्रोद्योग योजना आहे.
• 'सेनेहजोरी' (Senehjori) हा एक आसामी शब्द आहे, ज्याचा अर्थ 'स्नेहाचा किंवा आपुलकीचा बंध' असा होतो.
आसामचे वैशिष्ट्य असणाऱ्या ऐतिहासिक 'मुगा सिल्क'ला (Muga Silk) जागतिक पातळीवर एक 'लक्झरी ब्रँड' म्हणून प्रस्थापित करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.
• हा प्रकल्प केंद्रीय ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय , कापड मंत्रालय (Ministry of Textiles) आणि आसाम सरकार यांच्या संयुक्त समन्वयातून राबवला जात आहे.

🧐 मिशन "सेनेहजोरी" चे उद्दिष्टे :
• मुगा सिल्कचे उत्पादन करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांचे आणि विणकरांचे वार्षिक उत्पन्न वाढवणे.
• दलालांची साखळी मोडीत काढून या प्रीमियम रेशमाचा पूर्ण नफा थेट उत्पादकांना मिळवून देणे हा यामागचा हेतू आहे.
🎯 मिशन "सेनेहजोरी" चे प्रमुख वैशिष्ट्ये :
1) क्लस्टर-आधारित विकास -
• आसाममधील प्रमुख उत्पादन केंद्रे जसे की जोरहाट, शिवसागर, लखीमपूर, धेमाजी, सुआलकुची आणि माजुली या भागांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल.
2) पायाभूत सुविधा व पर्यावरण -
• मुगा रेशीम कीटकांचे अन्न असणाऱ्या 'सोम' (Som) आणि 'सोआलू' (Soalu) वनस्पतींची 5,000 हेक्टर क्षेत्रावर पुनर्निर्मिती केली जाईल.
• तसेच 5 आधुनिक रीलिंग युनिट्स आणि एक विशेष 'मुगा स्पन मिल' स्थापन केली जाईल.
3) डिजिटल पारदर्शकता -
सुमारे 8,000 पेक्षा जास्त कुटुंबांसाठी क्यूआर (QR) कोड आधारित डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम लागू केली जाईल.
या व्यापारामध्ये होणाऱ्या एकूण मुगा सिल्क पैकी 80% रेशीम हे अधिकृत भौगोलिक मानांकन (GI Tag) प्रमाणीकृत असेल.
4) निर्यातीचे उद्दिष्ट -
वर्ष 2028 पर्यंत दरवर्षी 2,000 किलो पेक्षा जास्त मुगा सिल्कची जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
✍️ मुगा सिल्कचे महत्त्व आणि 'सिल्क टुरिझम' :
• नैसर्गिक सुवर्ण रेशीम - मुगा सिल्क हे जगातील एकमेव नैसर्गिकरीत्या सोनेरी रंगाचे रेशीम (Naturally Golden Silk) आहे, जे प्रामुख्याने आणि केवळ आसाममध्येच आढळते. याच्या अद्वितीय दर्जा मुळे जागतिक लक्झरी कापड बाजारात भारताचे स्थान मजबूत होणार आहे.
• रेशीम पर्यटन (Silk Tourism) - या मोहिमेअंतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी एक विशेष 'मुगा सिल्क ट्रेल' (Muga Silk Trail) आणि 'सिल्क टुरिझम पार्क' विकसित केले जाईल, तसेच दरवर्षी 'मुगा उत्सव' आयोजित केला जाईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : मिशन "सेनेहजोरी"
• मुख्य उद्देश →
ㅤㅤㅤ1. आसामच्या मुगा सिल्कला जागतिक लक्झरी ब्रँड बनवणे
ㅤㅤㅤ2. शेतकऱ्यांचे आणि विणकरांचे वार्षिक उत्पन्न वाढवणे.
• मोहिमेची अधिकृत लाँचिंग तारीख → 2 जून 2026
• मुगा रेशीम → आसामचे GI Tag उत्पादन
• मुगा सिल्कचे जागतिक वैशिष्ट्य → जगातील एकमेव नैसर्गिक सोनेरी रेशीम
• निर्यात उद्दिष्ट (वर्ष 2028 पर्यंत) → प्रतिवर्ष 2,000 किलोपेक्षा जास्त



















