
चालू घडामोडी | ‘प्रगती’ लष्करी सराव 2026
Exercise PRAGATI 2026
📚 Subject : GS - संरक्षण - युद्ध सराव
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय लष्कराने (Indian Army) वर्ष 2026 मध्ये 'शेजारी प्रथम' (Neighbourhood First) धोरणांतर्गत 12 मित्र देशांच्या सहभागासह 'प्रगती-2026' ('Exercise PRAGATI') या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले ?
1. महाजन फील्ड फायरिंग रेंज, राजस्थान
2. उमरोई मिलिटरी स्टेशन, मेघालय
3. बकलोह मिलिटरी स्टेशन, हिमाचल प्रदेश
4. औंध मिलिटरी स्टेशन, पुणे
उत्तर: उमरोई मिलिटरी स्टेशन, मेघालय
📰 बातमी काय ?
• भारतीय लष्कराच्या (Indian Army) यजमानपदाखाली 'प्रगती-2026' (PRAGATI 2026) या पहिल्या मोठ्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.
• 'हिंदी महासागर क्षेत्रात' (Indian Ocean Region - IOR) प्रादेशिक सुरक्षा आणि परस्पर सहकार्य वाढवणे हा या सरावाचा मुख्य हेतू आहे.

🧐 'प्रगती' सराव काय आहे ?
• पूर्ण नाव - Partnership of Regional Armies for Growth and Transformation in the Indian Ocean Region (PRAGATI).
• यजमान देश व स्थान - हा सराव भारत (भारतीय लष्कर) द्वारे मेघालय राज्यातील उमरोई मिलिटरी स्टेशन, येथे आयोजित करण्यात आला.
• सहभागी देश : यामध्ये भारतासह एकूण 13 देश समाविष्ट आहेत.
• भारताव्यतिरिक्त पुढील 12 मित्र देशांचे लष्कर यात सहभागी झाले आहे :
➔ भूतान 🇧🇹, कंबोडिया 🇰🇭, इंडोनेशिया 🇮🇩, लाओस 🇱🇦, मलेशिया 🇲🇾, मालदीव 🇲🇻, म्यानमार 🇲🇲, नेपाळ 🇳🇵, फिलीपिन्स 🇵🇭, सेशेल्स 🇸🇨, श्रीलंका 🇱🇰 आणि व्हिएतनाम 🇻🇳.
🎯 'प्रगती' सरावाचे मुख्य उद्दिष्टे कोणती ?
• सहभागी देशांच्या लष्करामध्ये युद्धभूमीवरील अनुभवांची देवाणघेवाण करणे.
• तांत्रिक आणि युद्धशास्त्रातील सिद्धांतांमध्ये सुसूत्रता आणणे.
• हिंदी महासागर क्षेत्रातील अपारंपरिक सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी संयुक्त यंत्रणा उभारणे.
✍️सरावाची प्रमुख वैशिष्ट्ये (Key Features)
विशेष भूप्रदेश आणि कालावधी -
• हा सराव एकूण दोन आठवडे चालणारा असून, यामध्ये मुख्यत्वे निम-पर्वतीय (Semi-Mountainous) आणि जंगल भूप्रदेशात दहशतवादविरोधी (Counter-Terrorism) मोहिमांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
युद्ध सराव प्रात्यक्षिके -
• या उपक्रमात संयुक्त कमांड नियोजन, रणनीतिक पातळीवरील क्षेत्रीय सराव आणि थेट गोळीबाराचे (Live-fire) सिम्युलेशन सराव यांचा समावेश आहे.
इंटेलिजन्स सिंक्रोनायझेशन -
• बहुराष्ट्रीय मोहिमेदरम्यान सुरक्षा माहितीचे (Intelligence) विश्लेषण करणे, व्यवस्थापन करणे आणि ती सुरक्षितपणे एकमेकांसोबत सामायिक करणे यासाठीच्या आधुनिक संकल्पनांवर यात काम केले जाईल.
आत्मनिर्भर भारत प्रदर्शन :
• या सरावादरम्यान एक विशेष संरक्षण-तंत्रज्ञान प्रदर्शन आयोजित केले गेले आहे.
• यामध्ये भारतीय देशांतर्गत कंपन्यांकडून भारतात उत्पादित झालेली स्वदेशी शस्त्रे, तांत्रिक गियर आणि संरक्षण क्षेत्रातील नवनवीन संशोधनांचे प्रदर्शन केले जाईल.
'प्रगती' सरावाचे धोरणात्मक महत्त्व (Strategic Significance)
🌍 शेजारी प्रथम धोरण (Neighbourhood First) – हा सराव भारताच्या 'नेबरहुड फर्स्ट' मुत्सद्देगिरीला बळ देतो आणि हिंदी महासागर क्षेत्रात भारताची 'प्राधान्यकृत सुरक्षा भागीदार' (Preferred Security Partner) म्हणून असलेली भूमिका अधोरेखित करतो.
🤝 इंटरऑपरेबिलिटी (Interoperability) - 13 देशांच्या लष्कराने एकत्र सराव केल्यामुळे, भविष्यात निर्माण होणाऱ्या कोणत्याही खऱ्या जागतिक किंवा प्रादेशिक संकटाच्या वेळी हे देश एकमेकांच्या सहकार्याने एकत्र काम करू शकतील.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Exercise PRAGATI 2026
• प्रगती (PRAGATI) चे पूर्ण नाव → Partnership of Regional Armies for Growth and Transformation in the Indian Ocean Region
• यजमान देश → भारत (Indian Army)
• सरावाचे अधिकृत स्थान → उमरोई मिलिटरी स्टेशन, मेघालय
• एकूण सहभागी देशांची संख्या → 13 देश (भारत + 12 मित्र देश)
• सरावाचे मुख्य क्षेत्र → निम-पर्वतीय आणि जंगल भूप्रदेशात दहशतवादविरोधी मोहीम
• विशेष आकर्षण → स्वदेशी शस्त्रास्त्रांचे 'आत्मनिर्भर भारत प्रदर्शन'

























