
चालू घडामोडी | 'इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' 150 वर्षे पूर्ण
150-year Celebrations of Indian Association for the Cultivation of Science (IACS)
📚 Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच स्थापनेची 150 वर्षे पूर्ण केलेली 'इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' (IACS) ही आशियातील पहिली संशोधन संस्था 1876 मध्ये खालीलपैकी कोणी स्थापन केली होती ?
- डॉ. महेंद्रलाल सरकार
- सर सी. व्ही. रामन
- जगदीश चंद्र बोस
- मेघनाद सहा
उत्तर : डॉ. महेंद्रलाल सरकार (Dr. Mahendralal Sircar)
📰 बातमी काय ?
• कोलकाता येथील 'इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' (IACS) या भारताच्या अत्यंत प्रतिष्ठित संशोधन संस्थेने आपल्या स्थापनेची 150 वर्षे (1876 to 2026) यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत.
✍️ दोन नवीन प्रगत उपक्रम :
याचे औचित्य साधून सरकारने IACS मध्ये खालील दोन महत्त्वाच्या सुविधा देशासाठी सुरू केल्या आहेत.
1) PECVD प्रणाली (Plasma Enhanced Chemical Vapor Deposition) - ही संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची तांत्रिक प्रणाली आहे.
• याचा वापर भारताचा पहिला 'अमॉर्फस सिलिकॉन सोलर सेल' (Amorphous Silicon Solar Cell) तयार करण्यासाठी (Fabrication) केला जाईल.
2) रेटीना केंद्र (RETINA - Research Entrepreneurship for Translation, Innovation and NAvigation) - हे एक असे केंद्र आहे जे प्रयोगशाळेतील मूलभूत संशोधनाला थेट नवीन स्टार्ट-अप्स, उद्योग आणि सामाजिक उपयोगांशी (Societal Applications) जोडण्याचे काम करेल.
🏛️ 'इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' (IACS) संस्थेचा गौरवशाली इतिहास -
1) स्थापना - या संस्थेची स्थापना 29 July 1876 रोजी झाली.
2) संस्थापक - डॉ. महेंद्रलाल सरकार (Dr. Mahendralal Sircar) यांनी या संस्थेची स्थापना केली आणि तेच या संस्थेचे पहिले मानद सचिव (First Honorary Secretary) होते.

3) आशिया खंडातील पहिली - आधुनिक विज्ञानाचा प्रसार आणि मूळ संशोधनाला चालना देण्यासाठी भारतीयांनी स्वतः स्थापन केलेली ही आशिया खंडातील पहिली संशोधन संस्था मानली जाते.
4) पहिले विश्वस्त मंडळ (First Trustee Board) - पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि केशवचंद्र सेन हे या संस्थेच्या पहिल्या विश्वस्त मंडळाचे प्रमुख सदस्य होते.

5) IACS या संस्थेशी जोडलेले महान भारतीय शास्त्रज्ञ -
IACS या संस्थेला भारतामधील अनेक दिग्गज शास्त्रज्ञांचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे, ज्यांनी येथे आपले संशोधन पूर्ण केले.
• जगदीश चंद्र बोस (Jagadish Chandra Bose)
• मेघनाद सहा (Meghnad Saha)
• सत्येंद्रनाथ बोस (S.N. Bose)
• सर सी. व्ही. रमन (Sir C.V. Raman)

🧐 विज्ञान संकल्पना - 'रमन इफेक्ट' (The Raman Effect):
• ऐतिहासिक शोध - सर सी. व्ही. रमन यांनी त्यांच्या जगप्रसिद्ध 'रमन इफेक्ट' (Raman Effect) चा शोध याच IACS संस्थेच्या प्रयोगशाळेत काम करताना लावला होता.
• नोबेल पुरस्कार - या क्रांतिकारी शोधासाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील (Physics) नोबेल पुरस्कार मिळाला.
विज्ञान क्षेत्रात भारताला मिळालेला हा पहिलाच नोबेल पुरस्कार होता.
🧐 रमन इफेक्ट म्हणजे काय ?
• रमन इफेक्ट' (Raman Effect) म्हणजे प्रकाशाच्या तरंगलांबीमध्ये (Wavelength) आणि ऊर्जेमध्ये होणारा बदल.
• जेव्हा एखादा एकरंगी प्रकाश (Monochromatic Light) (उदा. लेझर) कोणत्याही पारदर्शक पदार्थातून जातो, तेव्हा प्रकाशकण आणि पदार्थातील रेणू यांच्यातील परस्परसंवादांमुळे विखुरलेल्या प्रकाशाची तरंगलांबी मूळ प्रकाशापेक्षा बदललेली असते.

✍️ रमन इफेक्टचे महत्त्वाचे पैलू -
• प्रकाशाचे विकिरण (Scattering) - जेव्हा एकरंगी प्रकाश (Monochromatic Light) धूळविरहित पारदर्शक माध्यमातून जातो, तेव्हा प्रकाशकण रेणूंवर आदळून सर्व दिशांना विखुरले जातात.
• विखुरलेल्या प्रकाशाचा मोठा भाग मूळ प्रकाशकिरणांसारखाच असतो.
• अतिशय लहान भागाची तरंगलांबी व ऊर्जा मूळ प्रकाशापेक्षा कमी किंवा जास्त होते. या बदलाला 'इलास्टिक स्कॅटरिंग' (Inelastic Scattering of Light) म्हणजेच रमन इफेक्ट म्हणतात.
• उपयोग - या प्रक्रियेमुळे पदार्थाची कोणतीही तोडफोड न करता, आतील अणू-रेणूंची रचना समजणे शक्य होते.
• याचा उपयोग औषध निर्माणशास्त्र (Pharmacy), रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होतो.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : 'इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स' (IACS)
• IACS ची स्थापना - 1876 (स्थापनेला 150 वर्षे पूर्ण)
• संस्थेचे मुख्य संस्थापक - डॉ. महेंद्रलाल सरकार (कोलकता)
• वैशिष्ट्ये - आशिया खंडातील पहिली संशोधन संस्था
• ऐतिहासिक शोध - जगप्रसिद्ध 'रमन इफेक्ट' चा शोध याच IACS संस्थेच्या प्रयोगशाळेत काम करताना लावला




























