
चालू घडामोडी | क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 2026
Quad Foreign Ministers’ Meeting 2026
📚 Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'क्वाड' (QUAD) या प्रभावशाली आंतरराष्ट्रीय गटामध्ये भारत, अमेरिका आणि जपान व्यतिरिक्त खालीलपैकी कोणत्या चौथ्या देशाचा समावेश होतो ?
- ऑस्ट्रेलिया
- ब्रिटन
- फ्रान्स
- दक्षिण कोरिया
उत्तर : ऑस्ट्रेलिया
📰 बातमी काय ?
नवी दिल्ली येथे भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची 11वी क्वाड परराष्ट्र मंत्री बैठक (11th Quad Foreign Ministers' Meeting) यशस्वीरीत्या पार पडली आहे.

🤝 क्वाड 2026 बैठकीतील सर्वात महत्त्वाचे निर्णय व हायलाइट्स :
1) IPMSC उपक्रमाची सुरुवात (Indo-Pacific Maritime Surveillance Collaboration):
• क्वाड भागीदारांनी पहिल्यांदाच IPMSC या नवीन सागरी देखरेख सहकार्य उपक्रमाची घोषणा केली.
• उद्देश - इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सागरी क्षेत्राची जागरूकता (Maritime Domain Awareness) वाढवणे.
• याचा सुरुवातीचा भर संयुक्त पाळत ठेवणे, तज्ज्ञांची देवाणघेवाण आणि सराव याद्वारे हिंद महासागर क्षेत्रावर (Indian Ocean Region) असेल.
2) IPMDA चा विस्तार आणि COP आराखडा :
• आधीपासून सुरू असलेल्या 'इंडो-पॅसिफिक पार्टनरशिप फॉर मॅरीटाईम डोमेन अवेअरनेस' (IPMDA) उपक्रमाचा विस्तार करण्यात आला.
• रिअल-टाइम सागरी माहिती सामायिक करण्यासाठी एक सर्वसमावेशक 'कॉमन ऑपरेटिंग पिक्चर' (COP - Common Operating Picture) विकसित करण्याची योजना जाहीर करण्यात आली.
3) दहशतवादविरोधी सहकार्य (Counter-Terrorism):
• जून 2026 मध्ये ऑस्ट्रेलिया एक विशेष 'क्वाद काउंटर-टेररिझम टेबलटॉप सराव' (Quad Counterterrorism Tabletop Exercise) आयोजित करणार आहे.
• याचा मुख्य भर राज्य-पुरस्कृत दहशतवाद (State-sponsored terrorism) आणि अत्याधुनिक अनमॅन्ड एरियल व्हेइकल्स (Drones) व नवीन तंत्रज्ञानाचा होणारा गैरवापर रोखण्यावर असेल.
4) महत्त्वपूर्ण खनिजे आणि ऊर्जा सुरक्षा (Critical Minerals & Energy):
• Quad Critical Minerals Initiative Framework चे अनावरण करण्यात आले.
• याद्वारे महत्त्वपूर्ण खनिजांच्या खाणकाम, प्रक्रिया आणि पुनर्वापरासाठी (Recycling) पुरवठा साखळी मजबूत केली जाईल.
• इंडो-पॅसिफिक ऊर्जा सुरक्षेसाठी धोरण, तंत्रज्ञान आणि आपत्कालीन सराव यावर एकत्रित काम केले जाईल.
5) पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्रासाठी 'AI' चा वापर:
• क्वाड देश भविष्यात फिजी (Fiji) सरकारच्या सहकार्याने तेथील बंदर पायाभूत सुविधांचा (Port Infrastructure) विकास करणार आहेत.
6) AI-ENGAGE उपक्रम:
• या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स आणि सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे उत्पादन वाढवणे, कीड व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी 6 आंतरराष्ट्रीय संशोधन प्रकल्पांना 6 दशलक्ष डॉलर्स (USD 6 million) पेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे.
7) भारताचे यजमानपद :
• बेकायदेशीर सागरी कारवायांना आळा घालण्यासाठी आणि परस्पर समन्वय वाढवण्यासाठी भारत पुढील 'क्वाड-एट-सी शिप ऑब्झर्वर मिशन' (Quad-at-Sea Ship Observer Mission) चे यजमानपद भूषवणार आहे.
🧐 क्वाड (Quad) म्हणजे नेमकं काय ?
• क्वाड चा फूल फॅार्म 'क्वॉड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग' (Quadrilateral Security Dialogue) असा आहे.
• क्वाड हे 4 देशांचा समावेश असलेला एक धोरणात्मक मंच आहे.
• क्वाड मध्ये भारत, संयुक्त अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांचा समावेश आहे.
• 2007 मध्ये, तत्कालीन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी या युतीला क्वाड संघटना असे नाव दिले.
• उद्दिष्ट्ये : क्वाड चे प्राथमिक उद्दिष्टांमध्ये सागरी सुरक्षा, हवामान बदलाच्या जोखमींना तोंड देणे, प्रदेशात गुंतवणुकीसाठी परिसंस्था (इकोसिस्टम) तयार करणे आणि तांत्रिक नवकल्पनांना चालना देणे यांचा समावेश आहे.
परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 2026
• क्वाड सदस्य देश - भारत, संयुक्त अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया
• 11व्या क्वाड परराष्ट्र मंत्री बैठकीचे ठिकाण ➔ नवी दिल्ली (2026)
• नवीन सागरी सुरक्षा उपक्रम ➔ इंडो-पॅसिफिक मॅरिटाईम सर्व्हिलन्स कोलॅबोरेशन (IPMSC)
• दहशतवादविरोधी सराव यजमान देश (जून 2026) ➔ ऑस्ट्रेलिया
• पायाभूत सुविधा विकासासाठी निवडलेला देश ➔ फिजी (Fiji) सरकार
• क्वाडच्या स्थापनेची संकल्पना (2007) ➔ माजी जपानी पंतप्रधान शिंझो आबे





























