
चालू घडामोडी | PM-AJAY पोर्टल आणि AJAY मोबाईल अॅप लाँच
PM-AJAY Portal and AJAY Mobile App
📚 Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच चर्चेत आलेले 'PM-AJAY' पोर्टल खालीलपैकी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाद्वारे लाँच करण्यात आले आहे ?
- केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय
- केंद्रीय शिक्षण मंत्रालय
- केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
- केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय
उत्तर : केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय
📰 बातमी काय ?
• केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 'प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना' (PM-AJAY) अंतर्गत संपूर्ण कामांचे डिजिटल सक्षमीकरण करण्यासाठी अधिकृत PM-AJAY पोर्टल आणि AJAY मोबाईल अॅप लाँच केले आहे.
🧐 पी.एम. अजय योजना काय आहे ?
• PM-AJAY योजना पूर्ण नाव - प्रधानमंत्री अनुसूचित जाती अभ्युदय योजना (Pradhan Mantri Anusuchit Jaati Abhyuday Yojana)
• योजनेचे स्वरूप - ही केंद्र सरकारद्वारे पुरस्कृत (Centrally Sponsored Scheme) असलेली एक अत्यंत महत्त्वाची सामाजिक कल्याण योजना आहे.
• मंत्रालय - पी.एम. अजय योजना ही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (Ministry of Social Justice and Empowerment) अंतर्गत राबविण्यात येते.
• मुख्य उद्दिष्ट - अनुसूचित जाती (SC Communities) मधील नागरिकांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारणे, रोजगार निर्मिती व कौशल्य विकासाच्या माध्यमातून गरिबी निर्मूलन करणे आणि अनुसूचित जाती लोकसंख्या असलेल्या गावांचा सर्वांगीण विकास करणे.
✍️ PM-AJAY पोर्टल आणि डॅशबोर्डची वैशिष्ट्ये (Portal & Dashboard) :
1) डिजिटल केंद्रीय डेटाबेस - हे पोर्टल संपूर्ण देशातील PM-AJAY योजनेच्या प्रगतीवर लक्ष ठेवणारा एक मध्यवर्ती डिजिटल डेटाबेस आणि समन्वय मंच (Coordination Platform) म्हणून काम करेल.
2) व्याप्ती - या डॅशबोर्डवर देशभरातील 47,000 पेक्षा जास्त अनुसूचित जाती बहुसंख्या असलेल्या गावांच्या (SC-majority villages) सामाजिक-आर्थिक विकासाची आणि 40 लाखां पेक्षा जास्त लाभार्थ्यांची रिअल-टाइम माहिती नोंदवली जाईल.
हा डॅशबोर्ड राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा अशा तिन्ही स्तरांवर उपलब्ध असेल.

🤝 नवीन पोर्टल PM-AJAY या योजनेच्या खालील 3 मुख्य घटकांच्या डिजिटल व्यवस्थापनाचे काम करेल -
A) आदर्श ग्राम (Adarsh Gram):
• या घटकांतर्गत जुनी कागदावर आधारित गाव नियोजन पद्धती बंद करून थेट डिजिटल 'ग्राम विकास आराखडा' (Village Development Plans) तयार केला जाईल.
• या गावांच्या प्रगतीचे मूल्यमापन 50 सामाजिक-आर्थिक संकेतक (Indicators) आणि 10 विकास क्षेत्रांच्या (Development Domains) आधारे थेट डिजिटल पद्धतीने केले जाईल.
B) कौशल्य आणि रोजगारासाठी साहाय्य अनुदान (Grant-in-Aid for Skilling & Employment):
• हे पोर्टल एक केंद्रीय 'मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम' (MIS) म्हणून कार्य करेल.
• याच्या माध्यमातून वित्तीय तरतूद, उपजीविका निधी (Livelihood Funding), लाभार्थ्यांची नोंदणी, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या प्रगतीचा थेट मागोवा (Track) घेतला जाईल.
C) शैक्षणिक संस्थांमधील वसतिगृहे (Hostels Component):
• पोर्टल आणि अॅपद्वारे वसतिगृह बांधणी किंवा दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करणे आणि त्यांच्या प्रगतीचा मागोवा घेणे सोपे होईल.
• विशेष म्हणजे, बांधकामाची खरी प्रगती तपासण्यासाठी 'जिओ-टॅग्ड' (Geo-tagged) आणि 'टाइम-स्टँप्ड' (Time-stamped) फोटो थेट अॅपवर अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे, जेणेकरून भ्रष्टाचाराला आळा बसेल.
⛳️✍️ PM-AJAY मोबाईल अॅपचे महत्त्व :
• हे अॅप आधीच्या सर्व पोर्टल्सच्या सेवा थेट मोबाईल वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवणारे एक युनिफाइड डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.
• यामुळे क्षेत्रीय पातळीवरील देखरेख (Field-level monitoring), तातडीने अहवाल सादर करणे (Real-time reporting), पारदर्शकता आणि डिजिटल गव्हर्नन्समध्ये मोठी सुधारणा होईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• PM-AJAY योजनेचे मुख्य लक्ष्य → अनुसूचित जाती (SC) समुदायाचा सामाजिक-आर्थिक विकास
• PM-AJAY पोर्टल आणि ॲप → प्रशासकीय कामांचे डिजिटल साधन
• PM-AJAY पोर्टल व ॲप लाँच करणारे मंत्रालय → सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय
• PM-AJAY पोर्टल व ॲप कशासाठी ? -
ㅤㅤㅤ1. डिजिटल 'ग्राम विकास आराखडा' तयार केला जाईल
ㅤㅤㅤ2. कौशल्य आणि रोजगारासाठी साहाय्य अनुदानाचा थेट मागोवा (Track) घेतला जाईल
ㅤㅤㅤ3. शैक्षणिक संस्थांमधील वसतिगृहांच्या कामाचा जिओ-टॅग्ड फोटोंद्वारे मागोवा (Track) घेतला जाईल

















