
चालू घडामोडी | नवीन सदाहरित वृक्षप्रजातीचा शोध

New Evergreen Tree Species Discovered
📚 Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलीकडेच शास्त्रज्ञांनी शोधलेली 'हंबोल्टिया नायरियाना' (Humboldtia nairiana) ही नवीन सदाहरित वृक्षाची प्रजाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळली आहे ?
- महाराष्ट्र
- गोवा
- कर्नाटक
- केरळ
उत्तर : केरळ
📰 बातमी काय ?
• संशोधकांनी केरळच्या दक्षिण पश्चिम घाटातील 'शेंदुर्णी वन्यजीव अभयारण्यात' (Shendurney Wildlife Sanctuary) एका नवीन सदाहरित (Evergreen) वृक्षप्रजातीचा शोध लावला आहे.

🧐 शोध कोणी लावला ?
• हा शोध 'जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बोटॅनिक गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट' (Jawaharlal Nehru Tropical Botanic Garden and Research Institute) या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी लावला आहे.

🌳 'हंबोल्टिया नायरियाना' बद्दल माहिती :
या नवीन प्रजातीला 'हम्बोटिया नायरिएना' (Humboldtia Nairiana) असे नाव देण्यात आले आहे.
1) प्रकार - हा मध्यम आकाराचा एक सदाहरित वृक्ष (Evergreen Tree) आहे.
2) शास्त्रीय वर्गीकरण - हा वृक्ष 'हंबोल्टिया' (Humboldtia) वंशातील (Genus) असून, तो 'फॅबेसी' (Fabaceae) या वनस्पती कुटुंबाशी (Family) संबंधित आहे.
3) उंची - हा वृक्ष साधारणपणे 5 ते 8 मीटर उंचीपर्यंत वाढतो.
4) शारीरिक वैशिष्ट्ये - या वृक्षाची साल फिकट तपकिरी रंगाची असून त्यावर गाठी (Warty bark) असतात.
याला लांब देठाची मोठी फुले आणि लंबगोलाकार फळे (Elliptic-oblong fruits) येतात.
5) स्थानिक प्रजाती (Endemism) - ही प्रजाती केवळ आणि केवळ केरळ राज्यापुरतीच मर्यादित (Strictly Endemic to Kerala)असून, सध्यातरी ती फक्त अगस्त्यमला बायोस्फीअर रिझर्व्हमध्ये सुमारे 300 मीटर उंचीवर आढळते.
6) संवर्धनाची चिंता (Conservation Concern) - या वृक्षाची वन्य लोकसंख्या अत्यंत नाजूक स्थितीत आहे.
याचा अधिवास अवघ्या 2 चौ. किमी पेक्षा कमी क्षेत्रात पसरलेला असून, सध्या जंगलात याचे 10 पेक्षाही कमी पूर्ण वाढ झालेले वृक्ष जिवंत आहेत.

🌳🌴🐘 शेंदुर्णी वन्यजीव अभयारण्य कोठे आहे ?
• शेंदुर्णी वन्यजीव अभयारण्य हे केरळ राज्यात असून ते त्याच्या समृद्ध उष्णकटिबंधीय सदाहरित जैवविविधतेसाठी ओळखले जाते.
हा भाग अगस्त्यमला बायोस्फीअर रिझर्व्हचा मुख्य भाग आहे.
• अगस्त्यमला बायोस्फीअर रिझर्व्ह (Agasthyamala Biosphere Reserve) हे दक्षिण पश्चिम घाटात केरळ आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या सीमाभागात पसरलेले आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : नवीन सदाहरित (Evergreen) वृक्षप्रजाती
• नवीन शोधलेली वृक्षप्रजाती → हम्बोटिया नायरिएना (Humboldtia nairiana)
• शोध लागलेले मुख्य ठिकाण → शेंदुर्णी वन्यजीव अभयारण्य (केरळ)
• प्रजातीची सद्यस्थिती → अतिशय नाजूक, जंगलात 10 पेक्षा कमी वृक्ष शिल्लक
• वृक्षाचे वनस्पतीशास्त्र कुळ → फॅबेसी (Fabaceae family)
• शोध लावणारी संस्था → 'जवाहरलाल नेहरू ट्रॉपिकल बोटॅनिक गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट'






















