
चालू घडामोडी | 🌩️ वीज कशी तयार होते ? ⛈️
"How is Lightning Generated? The Science of How It Forms"
📚 Subject : GS - भूगोल - हवामान, आपत्ती व्यवस्थापन
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतात वीज कोसळण्याच्या (Lightning) आपत्तीचे अचूक 'रिअल-टाइम' अॅलर्ट देण्यासाठी IITM पुणे या संस्थेने खालीलपैकी कोणते मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केले आहे ?
- मेघदूत
- वज्रपात
- मौसम
- दामिनी
उत्तर : दामिनी (Damini)
📰 बातमी काय ?
• भारतात नैसर्गिक कारणांमुळे होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एकट्या विजेमुळे किमान 50 % मृत्यू होतात.
• हे प्रमाण चक्रीवादळ (Cyclones) आणि पूर (Floods) यांच्यापेक्षा खूप जास्त आहे.
🗂️ NCRB चा 50 वर्षांचा अहवाल -
1) 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो' (NCRB) च्या अहवालानुसार, भारतात 1975 ते 2024 या 50 वर्षांच्या कालावधीत विजेमुळे एकूण 1,02,263 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
2) चिंताजनक बाब म्हणजे, यापैकी निम्म्याहून अधिक मृत्यू हे गेल्या 20 वर्षांत (2005 ते 2024 दरम्यान) झाले आहेत.
3) सर्वाधिक प्रभावित 5 राज्ये (60% मृत्यू) -
वर्ष 2024 च्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण मृत्यूंपैकी जवळपास 60% मृत्यू फक्त - मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, आणि छत्तीसगड या 5 राज्यांमध्ये झाले आहेत.
🌩️⛈️ वीज कशी तयार होते ?
• वीज ही ढग, हवा किंवा जमीन यांच्या दरम्यान वातावरणात निर्माण होणारा एक प्रचंड मोठा विद्युत ठिणगीचा (Giant Spark of Electricity) प्रकार आहे.
• विद्युत प्रभार (Electrical Charge) - वादळी ढगांमध्ये (Thunderclouds) लाखो व्होल्टचा विद्युत प्रभार आणि वेगवेगळ्या प्रकारची ध्रुवीयता - धन आणि ऋण प्रभार (Positive & Negative Polarity) असते.
• हवेचे कार्य - सुरुवातीच्या काळात, हवा ही ढगांमधील धन (+) आणि ऋण (-) प्रभारांमध्ये, तसेच ढग आणि जमिनीच्या दरम्यान एक विद्युत 'विसंवाहक' (Insulator - वीज प्रवाहाचा अडथळा) म्हणून काम करते.
• वीज कोसळण्याची प्रक्रिया - जेव्हा विरुद्ध प्रभार (Opposite Charges) खूप जास्त प्रमाणात वाढतात, तेव्हा हवेची ही रोखण्याची क्षमता (Insulating Capacity) संपुष्टात येते आणि हवेतून विजेचा वेगाने विसर्ग होतो, ज्याला आपण 'वीज कोसळणे' म्हणतो.

⚡️विजेचे दोन मुख्य प्रकार :
1) इंट्रा-क्लाउड वीज (Intra-Cloud Lightning) - वादळाच्या ढगामध्येच अंतर्गत भागात धन व ऋण प्रभारांमध्ये चमकणारी वीज.
2) क्लाउड-टू-ग्राउंड वीज (Cloud-to-Ground Lightning) - ढगांमधील प्रभार आणि जमिनीवरील विरुद्ध प्रभार यांच्यात होणारा विसर्ग (हा प्रकार मानवी जीवनासाठी सर्वात घातक असतो).

🇮🇳 भारतात वीज निर्मितीचा अनुकूल काळ -
• मोसमी पाऊस सुरू होण्यापूर्वीच्या काळात (Pre-Monsoon Season) तीव्र वादळे आणि वीज निर्मितीसाठी वातावरणात अत्यंत अनुकूल परिस्थिती असते.
⛳️ अंदाज, तंत्रज्ञान आणि जनजागृती (Forecasts & Awareness) :
• हवामान अंदाज - भारतीय हवामान विभाग (IMD - India Meteorological Department) सध्या वादळांचे आगाऊ अंदाज जारी करतो.
• दामिनी ॲप (Damini App) - 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी' (IITM) द्वारे विकसित केलेल्या 'दामिनी' मोबाईल ॲपद्वारे विजेचा अचूक रिअल-टाइम (Real-time) अलर्ट दिला जातो.
• प्रादेशिक उपलब्धता - हे ॲप देशातील 23 प्रादेशिक भाषांमध्ये सुरक्षेच्या मार्गदर्शक सूचना आणि खबरदारीचे उपाय पुरवते, जेणेकरून तळागाळातील लोकांपर्यंत ही माहिती सहज पोहोचेल.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• भारतातील सर्वात घातक नैसर्गिक आपत्ती → वीज कोसळणे (Lightning)
• नैसर्गिक मृत्यूंमधील विजेचा वाटा (2016 पासून) → किमान 50% मृत्यू.
• सर्वाधिक प्रभावित 5 राज्ये (60% मृत्यू) → मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड.
• वीज कोसळण्याचा अनुकूल काळ → मान्सूनपूर्व काळ
• रिअल-टाईम अलर्ट देणारे ॲप व संस्था → दामिनी ॲप (IITM द्वारे विकसित)



















