
चालू घडामोडी | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
Punyashlok Ahilyadevi Holkar
📚 Subject : GS - इतिहास - मराठ्यांचा इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म खालील पैकी कोणत्या ठिकाणी झाला ?
(महाराष्ट्र पोलीस भरती, सरळसेवा भरती, तलाठी भरती, RRB 2025)
- नाशिक
- चौंडी
- पैठण
- महेश्वर
उत्तर : चौंडी
⛳️जन्म :
• पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील, (आत्ताचे अहिल्यानगर) जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला.
🤝 विवाह :
• सरदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव मल्हाराव होळकरांशी अहिल्यादेवी यांचा विवाह 1733 मध्ये वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी झाला. मल्हारराव होळकर हे मावळ प्रांताचे जहागीरदार होते.

⛳️ मल्हारराव होळकर यांचे मार्गदर्शन :
• 1754 मध्ये कुम्हेरच्या लढाईत अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर धारातीर्थी पडले.
• पतीच्या मृत्यूनंतर अहिल्यादेवी सती जाण्यास निघाली परंतु सासरे मल्हारराव होळकर आणि त्यांना सती जाऊ दिले नाही.
• 11 डिसेंबर 1767 मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मावळाच्या सिंहासनावर बसल्या.
🏹 सामाजिक आणि राजकीय कारकीर्द :
• 1767 ते 1795 पर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी मावळाचा राज्यभार सांभाळला.,त्यांनी अनेक सुधारणाही केल्या त्या पुढील प्रमाणे -
1) पायाभूत सुविधांचा विकास:
• प्रजेचे जीवनमान उंचावण्यासाठी मंदिरे, घाट, विहिरी, रस्ते यांचे बांधकाम व नूतनीकरण करण्यात आले.
• लोकांना रोजगार निर्माण करण्यासाठी औद्योगिक धोरण राबविण्यात आले.
2) सामाजिक विकास :
• विधवा, अनाथ, सामाजिक दृष्ट्या व आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांना त्यांनी आधार दिला.
3) न्यायिक सुधारणा :
• पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या उचित न्यायाधनासाठी प्रसिद्ध होत्या.
• न्यायला प्राधान्य देणारी आणि व्यक्ती हक्कांचे संरक्षण करणारी निष्पक्ष न्यायव्यवस्था त्यांनी स्थापन केली.
4) मंदिरांचे जीर्णोद्धार व कला आणि संस्कृतीचे संरक्षण :
• पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केला.
• त्यांनी अनेक तीर्थस्थानी धर्मशाळांचे बांधकाम केले.
• त्यांनी महेश्वर, इंदौर अशा गावांचा विकास करून कला आणि संस्कृतीचे संरक्षण केले.
5) निधन :
• 13 ऑगस्ट 1795 मध्ये वयाच्या 70व्या वर्षी इंदोर (मध्य प्रदेश) येथे त्यांचे निधन झाले.
✍️ पदव्या :
• ब्रिटिश इतिहासकार जॉन की यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना द फिलॉसॉफर क्वीन असे म्हटले आहे.
• इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना भारताच्या कॅथिन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट असे म्हटले आहे.
ㅤㅤㅤ➔ कॅथिन द ग्रेट - रशियाची राणी
ㅤㅤㅤ➔ एलिझाबेथ - इंग्लंडची राणी
ㅤㅤㅤ➔ मार्गारेट - डेन्मार्कची राणी
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
• जन्म - 31 मे 1725
• जन्मस्थान - चौंडी (अहिल्यानगर)
• पती - खंडेराव मल्हाराव होळकर
• राज्यकारभार - मावळ प्रांताचे जहागीरदार
• निधन - 13 ऑगस्ट 1795, इंदोर (मध्य प्रदेश)
• पदव्या - पुण्यश्लोक, राजमाता, धर्मरक्षक, द फिलॉसॉफर क्वीन




























