
चालू घडामोडी | 'PM-WANI' योजने अंतर्गत अनेक महत्त्वाच्या सुधारणा लागू
PM-WANI Gets Major Citizen-Friendly Upgrade
📚 Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) केंद्र सरकारने वर्ष २०२० मध्ये सुरू केलेल्या 'PM-WANI' या महत्त्वाकांक्षी डिजिटल उपक्रमाचे पूर्ण नाव (Full Form) खालीलपैकी कोणते आहे ?
- Prime Minister’s Wireless Area Network Internet
- Prime Minister’s Wi-Fi Access Network Interface
- Public Mobile Wireless Advanced Network Integration
- Prime Minister’s Wide Area Network Infrastructure
उत्तर : Prime Minister’s Wi-Fi Access Network Interface
📰 बातमी काय ?
• दूरसंचार विभागाने (DoT - Department of Telecommunications) देशातील सार्वजनिक वाय-फाय व्यवस्था अधिक सोपी, सुरक्षित आणि नागरिक-अनुकूल करण्यासाठी 'PM-WANI' फ्रेमवर्क अंतर्गत अनेक महत्त्वाच्या सुधारणा लागू केल्या आहेत.
• या सुधारणांमुळे भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (Digital Public Infrastructure) अधिक बळकट होणार आहे.
🧐 नवीन सुधारणांची प्रमुख वैशिष्ट्ये :
• सार्वजनिक ठिकाणी वाय-फाय वापरताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी खालील ३ प्रमुख तांत्रिक उपाय जाहीर करण्यात आले आहेत -
1) QR-कोड आधारित ऑथेंटिकेशन (QR-Based Authentication) -
आता लॅपटॉप किंवा इतर दुय्यम उपकरणांवर (Secondary devices) इंटरनेट कनेक्ट करण्यासाठी लॉगिन पेजवरील QR कोड मोबाईलद्वारे स्कॅन करावा लागेल.
यामुळे पासवर्ड टाकण्याचा त्रास वाचून कनेक्टिव्हिटी अधिक जलद, सुलभ आणि सुरक्षित होईल.
2) कमी कालावधीचे साशे-स्टाईल प्लॅन्स (Short-Duration Plans) -
प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी 15, 30 आणि 60 मिनिटांचे छोटे आणि लवचिक वाय-फाय प्लॅन्स उपलब्ध करून दिले जातील.
मॉल किंवा रेल्वे स्थानकांसारख्या ठिकाणी तात्पुरत्या इंटरनेट वापरासाठी हे अत्यंत फायदेशीर ठरेल.
3) हॉटस्पॉटचे प्रमाणित नाव (Standardised Hotspot Names) -
सर्व अधिकृत सार्वजनिक वाय-फाय नेटवर्क ओळखण्यासाठी 'PMWANI' ब्रँडिंगसह 'सर्व्हिस सेट आयडेंटिफायर' (SSID) म्हणजेच वाय-फायचे नाव प्रमाणित (Standardise) केले जाईल.
यामुळे नागरिकांना बनावट वाय-फाय नेटवर्कपासून संरक्षण मिळेल आणि विश्वासार्हता वाढेल.
🧐 PM-WANI योजना म्हणजे काय ?
• स्थापना व मंत्रालय - हे फ्रेमवर्क दूरसंचार विभागातर्फे (DoT) वर्ष 2020 मध्ये लाँच करण्यात आले होते.
• मुख्य उद्देश - संपूर्ण भारतात, विशेषतः ग्रामीण भागांमध्ये सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉटचा विस्तार करणे.
• स्थानिक रोजगाराला चालना - या अंतर्गत स्थानिक छोटे व्यावसायिक, दुकानदार किंवा चहाच्या टपऱ्यांचे मालक देखील स्वतःचे वाय-फाय हॉटस्पॉट (PDO) उभारू शकतात.
• यामुळे सर्वसामान्यांना स्वस्त इंटरनेट मिळते आणि राष्ट्रीय डिजिटल दळणवळण धोरण, 2018 (NDCP) ची उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• PM-WANI चे पूर्ण नाव → Prime Minister’s Wi-Fi Access Network Interface.
• अंमलबजावणी करणारा विभाग → दूरसंचार विभाग (Department of Telecommunications)
• मंत्रालय → दळणवळण मंत्रालय (Ministry of Communications)
• मूळ योजनेचे लाँचिंग वर्ष → वर्ष 2020
• मुख्य उद्देश → संपूर्ण भारतात, विशेषतः ग्रामीण भागांमध्ये सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉटचा विस्तार करणे
• लॅपटॉप कनेक्टिव्हिटीसाठी नवीन पद्धत → QR-कोड आधारित ऑथेंटिकेशन
• वाय-फाय नेटवर्क ओळखण्यासाठी नवीन नियम → PMWANI ब्रँडिंगसह प्रमाणित SSID नाव






























