
चालू घडामोडी | शांग्री-ला डायलॉग म्हणजे काय ?
Shangri-La Dialogue
📚 Subject : GS - आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक करार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी प्रसिद्ध 'शांग्री-ला डायलॉग' (Shangri-La Dialogue) चे आयोजन खालीलपैकी कोणत्या देशात केले जाते ?
1. भारत
2. सिंगापूर
3. जपान
4. इंडोनेशिया
उत्तर : सिंगापूर
📰 बातमी काय ?
• सिंगापूर येथे पार पडलेल्या 'शांग्री-ला डायलॉग'मध्ये संरक्षण सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने व्हिएतनाम (Vietnam) सोबत अधिकृतपणे 'ब्राह्मोस क्षेपणास्त्र' पुरवठ्याचा करार स्वाक्षरित केला आहे. तसेच, इंडोनेशिया (Indonesia) सोबतचा असाच एक करार मार्च 2026 मधील प्राथमिक संमतीनंतर आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

🧐 ब्राह्मोस क्षेपणास्त्र आणि संरक्षण निर्यात धोरण :
• पहिले ग्राहक - फिलिपिन्स - दक्षिण-पूर्व आशियामध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली आयात करणारा फिलिपिन्स (Philippines) हा पहिला परदेशी देश होता.
• त्यांनी वर्ष 2022 मध्ये $375 million (375 दशलक्ष डॉलर) चा ऐतिहासिक करार केला होता.
🎯 तंत्रज्ञान सामायिकरण धोरण (Technology Sharing Policy):
• भारत आपल्या धोरणात्मक भागीदारी आणि विश्वासू संबंधांवर आधारित आसियान (ASEAN) सदस्य देशांसह इतर मित्र राष्ट्रांना प्रगत संरक्षण तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याचे धोरण राबवत आहे.
🤝 ब्राह्मोस क्षेपणास्त्र (BrahMos Missile) कोणी तयार केले ?
• हे भारताची 'ब्रह्मपुत्रा' (Brahmaputra) आणि रशियाची 'मोस्कव्हा' (Moskva) या नद्यांच्या नावावरून बनवलेले सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र (Supersonic cruise missile) आहे.
• हे भारत (DRDO) आणि रशिया (NPOM) यांनी संयुक्तपणे विकसित केले असून, यात रशियन प्रॉपल्शन (Propulsion) तंत्रज्ञान आणि भारताची प्रगत गायडन्स-कंट्रोल यंत्रणा एकत्र करण्यात आली आहे.

प्रादेशिक महत्त्व :
• दक्षिण चीन समुद्र वाद (South China Sea) - फिलिपिन्स आणि व्हिएतनामसह अनेक आसियान देशांचे दक्षिण चीन समुद्रात चीनसोबत सागरी सीमांवरून वाद (Overlapping maritime claims) सुरू आहेत. अशा परिस्थितीत भारताकडून ब्राह्मोसची होणारी निर्यात या देशांचे संरक्षण बळकट करण्यासाठी आणि प्रादेशिक संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
🧐 शांग्री-ला डायलॉग म्हणजे काय ?
• शांग्री-ला डायलॉग' (Shangri-La Dialogue) ला अधिकृतपणे 'आशिया सुरक्षा शिखर परिषद' (Asia Security Summit) म्हणून ओळखले जाते.
• ही आशिया-पॅसिफिक (Asia-Pacific) प्रदेशातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची आंतरराष्ट्रीय संरक्षण व सुरक्षा परिषद आहे.
• आयोजन ठिकाण - ही परिषद दरवर्षी सिंगापूर मधील 'शांग्री-ला' या प्रसिद्ध हॉटेलमध्ये आयोजित केली जाते. याच हॉटेलच्या नावावरून या परिषदेला 'शांग्री-ला डायलॉग' हे नाव पडले आहे.
• सुरुवात - या परिषदेची सुरुवात 2002 मध्ये झाली.
• आयोजक संस्था - 'इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज' (IISS) ही लंडन मधील स्वतंत्र थिंक टँक (संशोधन संस्था) या परिषदेचे आयोजन करते.
• सहभागी सदस्य - या परिषदेत आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील देशांचे संरक्षण मंत्री, लष्करप्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि संरक्षण तज्ज्ञ अधिकृतपणे एकत्र येतात.


🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• नुकताच ब्राह्मोस करार स्वाक्षरित करणारा देश ➔ व्हिएतनाम (2026)
• ब्राह्मोस खरेदी करणारा जगातील पहिला देश ➔ फिलिपिन्स (2022).
• ब्राह्मोसची निर्मिती ➔ भारत आणि रशिया यांचा संयुक्त उपक्रम
• ब्राह्मोस नाव ➔ 'ब्रह्मपुत्रा' आणि रशियाची 'मोस्कव्हा' (Moskva) या नद्यांच्या नावावरून
• क्षेपणास्त्राचा प्रकार ➔ सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र (Supersonic Cruise Missile).



























