
चालू घडामोडी | भारताचे नवीन नौदल प्रमुख
India’s new Chief of the Naval Staff
📚 Subject : GS - संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय नौदलाचे नवीन नौदल प्रमुख (Chief of the Naval Staff) म्हणून खालीलपैकी कोणी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे ?
- अॅडमिरल आर. हरी कुमार
- अॅडमिरल कृष्ण स्वामिनाथन
- व्हाइस अॅडमिरल दिनेश त्रिपाठी
- अॅडमिरल करमबीर सिंग
उत्तर : अॅडमिरल कृष्ण स्वामिनाथन (Krishna Swaminathan)
📰 बातमी काय ?
• अॅडमिरल कृष्ण स्वामिनाथन (Admiral Krishna Swaminathan) यांनी नवी दिल्लीत पार पडलेल्या अधिकृत सोहळ्यात भारताचे नवीन नौदल प्रमुख (Chief of the Naval Staff - CNS) म्हणून पदभार स्वीकारला आहे.
• मागील पदभार - नौदल प्रमुख बनण्यापूर्वी ते भारतीय नौदलाची 'तलवार' (Sword Arm) मानल्या जाणाऱ्या 'पश्चिम नौदल कमान' (Western Naval Command) चे ‘फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ ’म्हणून कार्यरत होते.

🇮🇳 🚢 भारतीय नौदलाची संरचना व श्रेणी (The Indian Navy Hierarchy) :
अ) सर्वोच्च पद - नौदल प्रमुख (Chief of the Naval Staff -CNS) -
• हे भारतीय नौदलाचे सर्वोच्च प्रशासकीय आणि ऑपरेशनल प्रमुख असतात.
• नौदल प्रमुखांकडे '4-स्टार' (Four-Star Rank) म्हणजेच 'अॅडमिरल' ही सर्वोच्च रँक असते.
• संरक्षण मंत्रालय (Ministry of Defence) आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) यांना अहवाल देतात.
ब) 3 मुख्य प्रादेशिक कमांड्स (3 Operational Commands) :
• संपूर्ण देशाच्या सागरी रक्षणासाठी भारतीय नौदलाची विभागणी 3 मुख्य कमांड्समध्ये करण्यात आली आहे.
या प्रत्येक कमांडचे प्रमुख 'थ्री-स्टार' रँकचे 'व्हाइस अॅडमिरल' असतात.
1) पश्चिम नौदल कमान (Western Naval Command) - याचे मुख्यालय मुंबई येथे असून, हे अरबी समुद्र आणि पाकिस्तान सीमेवरील सागरी हितांचे रक्षण करते.
2) पूर्व नौदल कमान (Eastern Naval Command) - याचे मुख्यालय विशाखापट्टणम येथे असून, हे बंगालचा उपसागर आणि मलाक्का सामुद्रधुनीतील चिनी हालचालींवर लक्ष ठेवते.
3) दक्षिण नौदल कमान (Southern Naval Command) - याचे मुख्यालय कोची येथे असून, हे प्रामुख्याने नौदलाचे मुख्य प्रशिक्षण केंद्र (Training Command) म्हणून कार्य करते.
🚢 भारतीय नौदलाची मुख्य कार्ये आणि भूमिका (Key Functions):
1) लष्करी भूमिका (Military Role) - समुद्रातील शत्रूंचे धोके नष्ट करणे, युद्ध क्षमता वाढवणे, पाळत ठेवणे (Surveillance) आणि हवाई संरक्षण देणे.
2) राजनैतिक भूमिका (Diplomatic Role) - इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारताचा प्रभाव वाढवण्यासाठी मित्र राष्ट्रांसोबत संयुक्त नौदल सराव (Naval Exercises) करणे आणि बंदरांना भेटी देणे.
3) कायदा अंमलबजावणी (Constabulary Role) - आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सागरी चाचेगिरीविरोधी (Anti-piracy), अंमली पदार्थ विरोधी आणि तस्करीविरोधी मोहिमा राबवणे.
4) मानवतावादी मदत (Humanitarian Role): नैसर्गिक आपत्ती (जसे की-चक्रीवादळ) किंवा संकटाच्या वेळी शोध व बचाव मोहीम (Search-and-rescue) राबवणे, वैद्यकीय मदत देणे आणि नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Chief of the Naval Staff
• भारताचे नवीन नौदल प्रमुख (CNS) → ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन
• नौदल प्रमुखांचा लष्करी दर्जा (Rank) → 4-Star (ॲडमिरल)
• पश्चिम नौदल कमांडचे मुख्यालय → मुंबई
• पूर्व नौदल कमांडचे मुख्यालय → विशाखापट्टणम
• दक्षिण (प्रशिक्षण) नौदल कमांडचे मुख्यालय → कोची
• नौदल प्रमुख कोणाला रिपोर्ट करतात → संरक्षण मंत्रालय आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS)






















