
चालू घडामोडी | आयुष अनुदान पोर्टल

Ayush Anudan Portal
📚 Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) आयुष मंत्रालयाच्या विविध योजनांतर्गत मिळणाऱ्या अनुदानांची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी लाँच करण्यात आलेल्या नवीन पोर्टलचे नाव काय आहे ?
- आयुष दर्पण पोर्टल
- माय आयुष सेवा पोर्टल
- आयुष अनुदान पोर्टल
- आयुष्मान ग्रिड पोर्टल
उत्तर : आयुष अनुदान पोर्टल (Ayush Anudan Portal)
📰 बातमी काय ?
• केंद्रीय आयुष मंत्रालयाने नवी दिल्लीतील 'कर्तव्य पथ' येथे 'आयुष अनुदान पोर्टल' (Ayush Anudan Portal) अधिकृतपणे लाँच केले आहे.

🧐 आयुष अनुदान पोर्टल काय आहे ?
1) स्वरूप: हे 'आयुष ग्रिड' (Ayush Grid) उपक्रमांतर्गत विकसित केलेले एक कागदविरहित (Paperless) आणि डिजिटल व्यासपीठआहे.
• याद्वारे आयुष मंत्रालयाच्या विविध केंद्रीय क्षेत्रातील योजनांतर्गत (Central Sector Schemes) मिळणाऱ्या निधी आणि अनुदानाची मंजुरी, मूल्यमापन आणि ट्रॅकिंग पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केले जाईल.
2) नोडल मंत्रालय - आयुष मंत्रालय, भारत सरकार (Ministry of Ayush).
🎯 आयुष अनुदान पोर्टल मुख्य उद्दिष्ट कोणते ?
• अनुदान वाटप प्रक्रियेमध्ये 100% पारदर्शकता (Transparency), कार्यक्षमता आणि कडक उत्तरदायित्व (Accountability) आणणे.
• तसेच केंद्र सरकारच्या 'इझ ऑफ डुइंग बिझनेस' (Ease of Doing Business) आणि 'इझ ऑफ लिविंग' (Ease of Living) या धोरणांना गती देणे.
✍️ आयुष अनुदान पोर्टलची प्रमुख वैशिष्ट्ये (Key Features) :
1) NGO दर्पण एकत्रीकरण (NGO Darpan Integration): हे पोर्टल नीति आयोगाच्या (NITI Aayog) 'NGO दर्पण' पोर्टलशी थेट जोडलेले आहे.
यामुळे अर्ज करणाऱ्या संस्थांची पार्श्वभूमी आणि सत्यता यांची स्वयंचलित व त्रुटीमुक्त पडताळणी (Authentication) केली जाते.
2) योजनानिहाय अर्ज प्रक्रिया - आयुष मंत्रालयाच्या वेगवेगळ्या योजनांच्या निकषांनुसार अर्जांचे वर्गीकरण आणि मूल्यमापन स्वतंत्रपणे केले जाते.
3) रिअल-टाइम ट्रॅकिंग (Live Tracking) - यामध्ये एक डॅशबोर्ड आहे, ज्याच्या माध्यमातून अर्जदार संस्था आणि सरकारी अधिकारी आपल्या अर्जाची सद्यस्थिती (Approval Status) थेट लाईव्ह पाहू शकतात.
4) एकल खिडकी योजना (Single-Window Access) - या पोर्टलचा वापर थेट किंवा आयुष मंत्रालयाचे मुख्य व्यासपीठ 'माय आयुष इंटिग्रेटेड सर्व्हिसेस पोर्टल' (MAISP - My Ayush Integrated Services Portal) याद्वारे सुरक्षितपणे केला जाऊ शकतो.
परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स - Ayush Anudan Portal
• पोर्टलचे नाव → आयुष अनुदान पोर्टल
• संबंधित मंत्रालय → आयुष मंत्राल
• पोर्टलचे स्वरूप → पूर्णपणे कागदविरहित (Paperless) आणि केंद्रीय डिजिटल प्लॅटफॉर्म
• मुख्य उद्दिष्ट → अनुदान व्यवस्थापनात 100% पारदर्शकता आणणे आणि 'इझ ऑफ डुइंग बिझनेस'ला चालना देणे
















